Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News LIVE Updates Today: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! रेल्वे वाहतूक उशीराने, प्रवाशांचा खोळंबा

Today's Breaking news: मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील आठवड्यात राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2026 | 06:10 PM
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरात रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्याने रेल्वे वाहतूकीवर देखील परिणाम झाला आहे. तसेच सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे वाहतूक उशीराने सुरु असल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी होत आहे.

The liveblog has ended.
  • 20 Jul 2026 06:06 PM (IST)

    20 Jul 2026 06:06 PM (IST)

    CJP Protest: ‘मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही; जे.पी. नड्डा यांच्या भेटीनंतर सौरभ दास यांची प्रतिक्रीया

    CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान, सरन्यायाधीश सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी आज (20 जुलै) केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सौरभ आणि आशुतोष जे.पी नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीदरम्यान, आपण योग्य स्तरावरचर्चा करून यावर तोडगा काढतील, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे, अशी माहिती सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया ट्विटर एक्सवर जारी केली आहे.

  • 20 Jul 2026 05:58 PM (IST)

    20 Jul 2026 05:58 PM (IST)

    इराणमध्ये मशिदीजवळ सुन्नी धर्मगुरू मोहम्मद अन्वर रिगी यांची गोळ्या झाडून हत्या; सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात प्रचंड तणाव

    इराणच्या (Iran) सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या मिर्जावेह (Mirjaveh) शहरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सुन्नी समाजाचे प्रमुख स्थानिक नेते आणि धर्मगुरू मौलवी मोहम्मद अन्वर रिगी यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. रिगी हे शहरातील ‘अली इब्न अबी तालिब’ मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाचे मुख्य इमाम (इमाम-ए-जुम्मा) म्हणून कार्यरत होते. रॉयटर्सने इराणच्या सरकारी माध्यमांचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ च्या सुमारास घडली, जेव्हा रिगी हे मशिदीच्या परिसरात होते. या घटनेमुळे संपूर्ण सीमावर्ती भागात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.

  • 20 Jul 2026 05:45 PM (IST)

    20 Jul 2026 05:45 PM (IST)

    CJP Protest: ‘मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही; जे.पी. नड्डा यांच्या भेटीनंतर सौरभ दास यांची प्रतिक्रीया

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान, सरन्यायाधीश सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी आज (20 जुलै) केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सौरभ आणि आशुतोष जे.पी नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीदरम्यान, आपण योग्य स्तरावरचर्चा करून यावर तोडगा काढतील, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे, अशी माहिती सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया ट्विटर एक्सवर जारी केली आहे.

  • 20 Jul 2026 05:33 PM (IST)

    20 Jul 2026 05:33 PM (IST)

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा लॉटरीचे शेड्यूल लवकरच जाहीर;75 हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपणार

    मुंबईत परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (Mhada) मुंबई मंडळाद्वारे आयोजित २,६४० फ्लॅट्सच्या लॉटरीचे अधिकृत वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी पुष्टी केली आहे की, लॉटरीचे संपूर्ण वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर केले जाईल. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सोडतीच्या तारखेची वाट पाहणाऱ्या ७५,००० हून अधिक अर्जदारांची अनिश्चितता संपुष्टात येईल.

  • 20 Jul 2026 05:20 PM (IST)

    20 Jul 2026 05:20 PM (IST)

    इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना रविवारी (दि. १९ ) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. यासोबतच ३ सामन्यांची मालिका २-१ ने गमावली. या पराभवामुळे भारतीय संघाच्या आयसीसी क्रमवारीत (ICC ODI Ramkings) घसरण झाली आहे. संघ सध्या पहिल्या क्रमांकावर असला तरी, त्याचे मानांकन घसरले आहे, त्यामुळे अव्वल स्थान आता धोक्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चार एकदिवसीय मालिका खेळल्या असून, त्यापैकी केवळ एक जिंकली आहे आणि तीन गमावल्या आहेत .

  • 20 Jul 2026 05:10 PM (IST)

    20 Jul 2026 05:10 PM (IST)

    CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?

     नीट पेपर फुटीप्रकरणी आज दिल्ली सीजेपी पक्षाने जंतरमंतर मैदानापासून संसदभवनापर्यंत मोर्चा काढला आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) वतीने पुकारण्यात आलेला ‘संसद मार्च’ जंतर-मंतरवरून निघून थेट संसदेच्या आवाराजवळ पोहोचताच राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संसद भवनाबाहेर सुरक्षा यंत्रणेचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उच्चस्तरीय बैठक घेत असल्याचे समोर आले आहे.

  • 20 Jul 2026 04:59 PM (IST)

    20 Jul 2026 04:59 PM (IST)

    'विश्वगुरू झुरळांना घाबरतात'; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, 'लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे'

    राजधानी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेकडे मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. वाचा सविस्तर... 

  • 20 Jul 2026 04:47 PM (IST)

    20 Jul 2026 04:47 PM (IST)

    युद्ध कधी थांबेल? इराणच्या विदेश मंत्र्यांनी ठेवली अट; इराणी सैन्याचा ट्रम्प यांना इशारा

    अमेरिकेने सलग ९ व्या रात्री इराणच्या बऱ्याच भागात बॉम्बिंग केलं . त्याला प्रतिउत्तर म्हणून इराणने सुद्धा आखाती देशांवर हल्ले केले . इराणचे विदेश मंत्री अब्बास अरागची यांनी सांगितले की अमेरिके सोबतचे युद्ध हे तेव्हाच थांबेल जेव्हा आम्ही या युद्धात आघाडी घेऊ . इराणच्या सरकारी वृत्त वहिनी आईआरएनए दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की , चर्चा सुद्धा अश्या परिस्थिती झाल्या पाहिजेत जेव्हा इराण ला वाटेल कि युद्ध परिस्थिती इराणच्या बाजूने आहे . पुढे अरागची यांनी असे सांगितले कि कोणत्याही युद्धाचा अंत दोन पद्धतीने होतो एक म्हणजे दोन पैकी एक पक्ष हरतो किंवा दोन्ही देश मिळून वाटाघाटी आणि चर्चा करण्यास तयार होतात . परंतु चर्चा आणि वाटाघाटी तेव्हाच केल्या पाहिजेत जेव्हा आपण चांगल्या स्थितीत असू घाई गडबडी मध्ये चर्चा करण्याला काहीच अर्थ नाही .

  • 20 Jul 2026 04:37 PM (IST)

    20 Jul 2026 04:37 PM (IST)

    मान्सूनचा रौद्रावतार कायम; 20 ते 26 जुलैदरम्यान अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता

    देशातील अनेक राज्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तापमान लक्षणीयरीत्या खाली आले आहे. परिणामी, लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. आता हवामान विभागाने पुढील ६-७ दिवस देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय राहील, असा अंदाज वर्तवला आहे. अशा परिस्थितीत, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, २० जुलै रोजी देशातील १७ राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो. अनेक ठिकाणी पाणी साचणे, भूस्खलन आणि सखल भागांमध्ये पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. वाचा सविस्तर... 

  • 20 Jul 2026 04:27 PM (IST)

    20 Jul 2026 04:27 PM (IST)

    अमेरिकेत निसर्गाचा हाहाःकार! युटामध्ये अचानक आलेल्या पुरात अग्निशमन दलाच्या कॅप्टनसह 5 जणांचे कुटुंब वाहून गेले

    अमेरिकेतून (America) एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये सध्या कोसळणारा मुसळधार पाऊस आणि निर्माण झालेली पूरस्थिती अत्यंत जीवघेणी ठरत आहे. दक्षिण युटामधील (South Utah) एका खोल डोंगराळ खोऱ्यात अचानक आलेल्या महापुराने (Flash Flood) भीषण हाहाकार माजवला आहे. या निसर्गाच्या भयानक प्रकोपात एकाच सुखी आणि आनंदी कुटुंबातील पाच सदस्यांनी दुर्दैवाने आपले प्राण गमावले आहेत. मृतांमध्ये प्रोव्हो (Provo) अग्निशमन दलाचे अत्यंत प्रतिष्ठित आणि शूर कॅप्टन स्पेन्सर लाँग, त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन निष्पाप मुलांचा समावेश आहे. या भीषण आपत्तीमुळे संपूर्ण परिसरात आणि अग्निशमन विभागात तीव्र शोककळा पसरली आहे.

  • 20 Jul 2026 04:17 PM (IST)

    20 Jul 2026 04:17 PM (IST)

    ‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

    इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. त्याने एका शानदार शतकाने आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली. भारतीय संघाने २७ धावांनी हा सामना गमावला. पण रोहित शर्माच्या जबरदस्त खेळीमुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. रोहितने ११० चेंडूवर १३८ धावा केल्या. लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यापूर्वी, हा सामना रोहितचा शेवटचा असू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरु होती. परंतु, आता खुद्द ‘हिटमॅन’ने या वृत्तांवर एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. वाचा सविस्तर... 

  • 20 Jul 2026 04:10 PM (IST)

    20 Jul 2026 04:10 PM (IST)

    ‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात

    देशभरातून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून दिल्लीतील जंतर नंतर पासून संसद भवनापर्यंत चाललेल्या आंदोलनाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आंदोलनाची ताकद वाढवत असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या आंदोलनावर टीका करत मुक्ताफळे उधळली आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी भातखळकरांवर सडकून टीका असून ‘अरे मोदीजींच्या चमच्या,’ म्हणत “देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय ?” असा सवाल केला आहे. वाचा सविस्तर... 

  • 20 Jul 2026 03:55 PM (IST)

    20 Jul 2026 03:55 PM (IST)

    इराणमध्ये ५ मिनिटांच्या अंतराने दोन भूकंपांचे धक्के

    सोमवारी (२० जुलै) सकाळी इराणच्या केरमानशाह प्रदेशात कुझारन भागात पाच मिनिटांच्या अंतराने भूकंप झाले. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या भूकंपाच्या धक्क्यात तीन जण जखमी झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागने दिलेल्या माहितीनुसार, पहिला भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:१३ वाजता झाला असून याची तीव्रता ५.२ होती. तर खोली सुमारे ८ किलोमीटर खोलीवर होती. यानंतर पाच मिनिटांनी, १३ किलोमीटर खोलीवर ५.७ तीव्रतेचा दुसरा आणि अधिक शक्तिशाली धक्का नोंदवला गेला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधित भागात मदतकार्य आणि नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या तरी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

  • 20 Jul 2026 03:45 PM (IST)

    20 Jul 2026 03:45 PM (IST)

    Blackout :’अंधार कायम राहू द्या!’ आखातात तणाव शिगेला; इराणचे भीषण हल्ले; वीज निर्मिती केंद्रही उद्ध्वस्त

    अमेरिकेने इराणच्या जल शुद्धीकरणाच्या प्लांट वर हल्ला करून उध्वस्त केल्यानंतर, प्रतिहल्ल्यात इराणने कुवैत आणि बहरीनच्या जल शुद्धीकरण केंद्रावर हल्ले करून ते ही उध्वस्त केले. इराणच्या ऐकून लोकसंख्ये पैकी फक्त तीन टक्केच लोकं जल शुद्धीकरणावर अवलंबून आहेत. तर या उलट कुवैत आणि बहरीन सारखे ( GCC ) देश हे सरासरी ९० ते १०० टक्के या खाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरण केंद्रावर अवलंबून आहेत. जल शुद्धीकरणाच्या केंद्रावर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने आता वीज निर्मिती केंद्रावर हल्ले केले आहेत. यात आखातातील प्रमुख शहरे असून या ब्लॅकआउट सारखे संकट निर्माण होत आहे. वाचा सविस्तर

  • 20 Jul 2026 03:35 PM (IST)

    20 Jul 2026 03:35 PM (IST)

    अमेरिकेसोबत चर्चेचे दरवाजे खुले

    अमेरिका-इराणमधील तणाव वाढतच असताना इराणकडून दिलासादायक विधान समोर आले आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी चर्चेचे दरवाजे बंद झालेले नाहीत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी सांगितले की, देश आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि संरक्षण-विषयक अशा दोन्ही मार्गांचा अवलंब करणे सुरूच ठेवेल. त्यांनी पुढे नमूद केले की, इराण युद्ध आणि मुत्सद्देगिरी यांकडे परस्परविरोधी पर्याय म्हणून पाहत नाही.

  • 20 Jul 2026 03:25 PM (IST)

    20 Jul 2026 03:25 PM (IST)

    जागतिक संकटातही भारताची आर्थिक घोडदौड कायम

    India Economy Growth नवी दिल्ली : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक व्यावसायिक सेवा कंपनी डेलॉइट इंडियाच्या अंदाजानुसार, २०२६-२७ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.५% ते ६.८% दराने वाढू शकते. कंपनीचा विश्वास आहे की वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत आर्थिक घडामोडींना आणखी गती मिळेल. सणासुदीच्या काळात वाढलेली खरेदी, व्याजदरातील सवलत आणि जागतिक परिस्थितीत हळूहळू होणारी संभाव्य सुधारणा ही याची प्रमुख कारणे असू शकतात. वाचा सविस्तर

  • 20 Jul 2026 03:15 PM (IST)

    20 Jul 2026 03:15 PM (IST)

    होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर हल्ला

    सोमवारी(२० जुलै) होर्मुझच्या सामुद्रधुनीत, ओमानमधील कुमझार किनाऱ्याजवळ एका जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली असून कर्मचाऱ्यांना बचावासाठी जहाज सोडून बाहेर पडावे लागले. युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) ने दिलेल्या माहितीनुसार, कुमझारच्या वायव्येस ८ नॉटिकल मैल (सुमारे १५ किलोमीटर) अंतरावर ही घटना घडली. एका टगबोटच्या मदतीने जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. तर जहाजावरील आग विझलेली नसून जहाज समुद्रात तसेच वाहत आहे. या भागातून जाणाऱ्या जहाजांना सतर्क राहाण्याचा कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने कळवण्याचा सल्ला UKMTO ने दिला आहे.

  • 20 Jul 2026 03:05 PM (IST)

    20 Jul 2026 03:05 PM (IST)

    ‘विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, पण हे सरकार…’, राज्यसभेत पेपर लीक प्रकरणावर खर्गे आक्रमक

    Monsoon Session 2026: आजपासून संसदेचे पावसासाळी आधिवेशन सुरु झाले आहे. तसेच संसद भवनाजवळच्या जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुद्दा सोमवारी संसदेत उपस्थित करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. राज्यसभेत बोलताना ते म्हणाले की, नीट पेपरफुटीच्या विरोधात मोठ्या संख्येने विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करत होते, परंतु या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. ते म्हणाले की, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. ते सभागृहात देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल बोलत आहेत. खर्गे म्हणाले की, आज हजारो विद्यार्थी जंतर मंतरवर जमले आहेत आणि त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात आहे. ते म्हणाले की, सरकार त्यांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. वाचा सविस्तर

  • 20 Jul 2026 02:59 PM (IST)

    20 Jul 2026 02:59 PM (IST)

    भोंदू खरातसह 6 जणांना सोलापूर कोर्टाची नोटीस

    भोंदू अशोक खरातसह सहा जणांना सोलापूर कोर्टाने नोटीस बजावलीये. कळमण इथल्या एका शेतक-याला जादूटोण्याची भीती दाखवत जमीन व्यवहारात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली खरातसह सहा जणांना नोटीस काढण्याचे आदेस सोलापूर कोर्टाने दिलेत. शेतकरी राजाराम बनसोडे यांनी दाखल केलेल्या खासगी फिर्यादीत हा आदेश देण्यात आलाय. आरोपी अशोक खरात यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन बनसोडे यांना धमकावले. त्यांची ११ एकर ८ गुंठे शेतजमीन कमी किमतीत लाटली. त्यानंतर तीच जमीन खोटी फळबागायत दाखवून कोट्यवधी रुपयांना विकण्यात आली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे

  • 20 Jul 2026 02:51 PM (IST)

    20 Jul 2026 02:51 PM (IST)

    उद्धव ठाकरेंच्या आंदोलनानंतर 3 गुन्हे दाखल

    ठाकरेंच्या कालच्या आंदोलनानंतर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात आयोजकांवर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल. विना परवानगी आंदोलनाचे आयोजन केल्या प्रकरणी ठाकरेंच्या आंदोलन आयोजकांवर पहिला गुन्हा दाखल झाले. तर आंदोलनास परवानगी नसतानाही लोकांना आंदोलन ठिकाणी जमण्यास आवाहन केल्याप्रकरण दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आंदोलनानंतरही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून दादर परिसरात ठिक ठिकाणी आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या ही मोठ्या प्रमाणात झाल्याने पोलिसांनी तिसरा गुन्हा दाखल केला आहे. या तीनही गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • 20 Jul 2026 02:40 PM (IST)

    20 Jul 2026 02:40 PM (IST)

    'झुरळं' गिरीश महाजनांच्या मागे लागणार- संजय राऊत

    खासदार संजय राऊतांनी मंत्री गिरीश महाजनांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. महाजन महाराष्ट्रातील सगळ्यात करष्ट माणूस असून झुरळं त्यांच्या मागे लागतील अशी टीका राऊतांनी केलीय. उद्धव ठाकरेंनी रविवारी शिवाजी पार्क इथं नीट पेपरफुटी आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावर गिरीश महाजनांनी टीका केली होती.. आंदोलनं करा मात्र आधी पक्ष वाचवण्याकडे लक्ष द्या असा खोचक सल्ला महाजनांनी दिला होता.. यावरुनच राऊतांनी महाजनांवर पलटवार केलाय.

  • 20 Jul 2026 02:31 PM (IST)

    20 Jul 2026 02:31 PM (IST)

    जादूटोण्याची भीती दाखवून जमीन व्यवहारात केली फसवणूक

    उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील एका शेतकऱ्याला जादूटोण्याची भीती दाखवून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भोंदूबाबा अशोक खरातसह सहा जणांना नोटीस काढण्याचे आदेश सोलापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ऐश्वर्या सागर जाधव यांनी दिले आहेत. शेतकरी राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी दाखल केलेल्या खासगी फिर्यादीत हा आदेश देण्यात आला.

  • 20 Jul 2026 02:20 PM (IST)

    20 Jul 2026 02:20 PM (IST)

    हरिश्चंद्र गडावरून खाली उतरत असताना चार पर्यटक गंभीर जखमी

    भंडारदरा परिसरातील हरिश्चंद्र गडावरून खाली उतरत असताना घडली घटना. अचानक दरड कोसळली आणि या घटनेत चार पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.

  • 20 Jul 2026 02:09 PM (IST)

    20 Jul 2026 02:09 PM (IST)

    जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनाची धग

    दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स अधिक मजबूत करण्यासाठी वेल्डिंगचे काम सुरू केले आहे. परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

  • 20 Jul 2026 02:03 PM (IST)

    20 Jul 2026 02:03 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याने 'सीजेपी' आक्रमक 

    CJP Parliament March LIVE:  कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) संसद मार्चदरम्यान आज मोठा तणाव निर्माण झाला. संसदेच्या आवाराजवळ पोहोचलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या  फोडण्यात आल्या. या कारवाईमुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला असून 'सीजेपी'ने प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

    पक्षाने अधिकृत भूमिका मांडताना सरकारला इशारा दिला आहे की, "आपल्या हक्कांसाठी शांततेने लढणाऱ्या देशातील तरुणांवर अश्रूधुराचा मारा करणे तात्काळ बंद करा. सरकारने दडपशाहीचा (दमन) मार्ग अवलंबण्याऐवजी आंदोलकांशी संवाद साधून हा प्रश्न सोडवावा." या कारवाईनंतर जंतर-मंतर ते संसद भवन परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 20 Jul 2026 02:00 PM (IST)

    20 Jul 2026 02:00 PM (IST)

    अदानीच्या वीज करारावरून बांगलादेशात राजकीय युद्ध

    बांगलादेशातील (Bangladesh) सत्तापालट आणि राजकीय अस्थिरतेनंतर आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापारी व राजनैतिक संबंधांमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यानंतर आता बांगलादेश नॅशनल पार्टीचे (BNP) नेते तारिक रहमान यांनीही अदानी समूहाच्या (Adani Power) वीज प्रकल्पावरून तोच आक्रमक मार्ग अवलंबला आहे. बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या (BPDB) वार्षिक अहवालाचे दाखले देत बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी भारतातील अदानी समूहाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या विजेच्या दरांवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • 20 Jul 2026 01:55 PM (IST)

    20 Jul 2026 01:55 PM (IST)

    चं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss

    इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला २७ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे, टी-२० मालिकेनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही १-२ ने गमावली. मात्र, लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने शानदार १३८ धावा केल्या. आपल्या शतकादरम्यान रोहितने १७ चौकार आणि पाच षटकार मारले. तिसरा सामना हा भारतीय संघाने हरला असला तरीही शेवटपर्यंत झुंज दिली आणि त्यातही रोहित शर्माची कामगिरी ही कायम अविस्मरणीय राहील अशीच होती.

  • 20 Jul 2026 01:50 PM (IST)

    20 Jul 2026 01:50 PM (IST)

    80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास!

    भारताचा दिग्गज कुस्तीपटू आणि  मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) फायटर संग्राम सिंगने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारताला गौरव मिळवून दिला आहे. संग्रामने १९ जुलै रोजी मलेशिया येथील क्वालालंपूर येथे झालेल्या भारत – पाकिस्तान हायव्होटेज लढतीत पाकिस्तानच्या मोहम्मद आबिद अलीला अवघ्या १ मिनिट २० सेकंदात (८० सेकंदात) नॉकआउट करत प्रतिष्ठित ‘स्ट्राइक एशिया चॅम्पियनशिप’ जिंकली. संग्रामने सुरुवातीपासूनच लढतीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आणि पहिल्या फेरीतच जोरदार अटॅक करून आपल्या प्रतिस्पर्ध्याला सावरण्याची कोणतीही संधी दिली नाही. 

  • 20 Jul 2026 01:45 PM (IST)

    20 Jul 2026 01:45 PM (IST)

    साखरपुड्यात केतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा VIDEO Viral; महिनाभरानंतर नवा ट्विस्ट

    राज्यभरात गाजत असलेल्या पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात एक जुना व्हिडिओ समोर आला असून, त्यात मुख्य आरोपी सिया गोयल साखरपुड्याच्या कार्यक्रमात केतनबद्दल “He is Caring and Kind” असे म्हणत त्याच्या स्वभावाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहे. एकीकडे सिया आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली असताना, दुसरीकडे समोर आलेल्या या व्हिडिओमुळे या हत्याकांडाबाबत अनेक प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत.

  • 20 Jul 2026 01:35 PM (IST)

    20 Jul 2026 01:35 PM (IST)

    इंटरनेट स्पीडची चिंता संपली! बीएसएनएलच्या 100 Mbps प्लॅनमध्ये मिळणार मोफत ओटीटी

    भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल (BSNL) कडे त्यांच्या यूजर्ससाठी एक ब्रॉडबँड प्लॅन आहे. हा 100 Mbps वाला असा एक ब्रॉडबँड प्लॅन आहे, ज्यामध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत अधिक फायदे ऑफर केले जात आहेत. त्यामुळेच या प्लॅनने सर्व यूजर्सचं लक्ष वेधलं आहे.

  • 20 Jul 2026 01:25 PM (IST)

    20 Jul 2026 01:25 PM (IST)

    मुसळधार पावसाचा फटका! वैष्णो देवी आणि अमरनाथ यात्रा तात्पुरती बंद

    गेल्या काही दिवसापांसून राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरु आहे. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस मुसळधार पावसांचा अंदाज व्यक्त केल्यामुळे हा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरला आहे.

  • 20 Jul 2026 01:18 PM (IST)

    20 Jul 2026 01:18 PM (IST)

    Crude Oil च्या दरात मोठी वाढ! ब्रेंट क्रूड 90 डॉलर्सच्या पार पोहोचलं

    जागतिक परिस्थितीमुळे अंदाधुंदी माजली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 91 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे, तर WTI (West Texas Intermediate) देखील प्रति बॅरल ८४-८५ डॉलरच्या आसपास पोहोचला आहे. ही वाढ गेल्या काही आठवड्यांमधील सगळ्यात मोठी वाढ मानली जात आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम आता पेट्रोल- डिझेलच्या किमतींवर होणार आहे. या सगळ्या परिस्थितीचा फटका महागाईला बसणार एवढी नक्की.

  • 20 Jul 2026 01:10 PM (IST)

    20 Jul 2026 01:10 PM (IST)

    ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल

    जागतिक राजकारणात आणि मध्य-पूर्वेतील (Middle East) भू-राजकीय घडामोडींमध्ये पुन्हा एकदा प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची (Abbas Araghchi) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत आणि राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबत झालेल्या एका अत्यंत वादळी आणि रंजक संषाणाचा खुलासा केला आहे. “तुम्हाला आमच्याशी बोलायचे असेल, तर वेगळ्या पद्धतीने आणि आदराने बोलावे लागेल. इराणला धमकावणे किंवा लाच देणे अमेरिकेला कधीही जमणार नाही,” अशा कडक आणि स्पष्ट शब्दांत अराघची यांनी अमेरिकेला त्यांची जागा दाखवून दिली आहे. इराणच्या (US-Israel Iran War) मेहर न्यूज एजन्सीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

  • 20 Jul 2026 01:02 PM (IST)

    20 Jul 2026 01:02 PM (IST)

    सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?

    हडपसरमधील नामांकित खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या वैद्यकीय बिलावरून वाद झाला. या वादानंतर मात्र, बिलात सवलत मिळावी यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (सीओओ) पिस्तूलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात विलू पूनावाला रुग्णालयाचे सीओओ डॉ. आर्य लजपतराय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Jul 2026 12:48 PM (IST)

    20 Jul 2026 12:48 PM (IST)

    16 घरफोड्यांचा पोलिसांनी लावला छडा

    मागील काही दिवसात यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी घरफोड्यांचे सत्र सुरू होते. या चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. पोलिसांपुढे या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले होते. दरम्यान या चोरट्यांचा शोध घेत पोलिसांनी दोन सराईतांना अटक करून तब्बल १६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून १५ लाख ६८ हजाराचा सोन्या-चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली आहे.

  • 20 Jul 2026 12:36 PM (IST)

    20 Jul 2026 12:36 PM (IST)

    अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेल्या १० फूट उंचीचा ब्राँझ धातूपासून बनवलेल्या पुतळ्याचे लोकार्पण गुरुवार, दिनांक २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बारामती येथे होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार असून, खासदार पार्थ पवार, जय पवार तसेच पवार कुटुंबीय या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.

  • 20 Jul 2026 12:24 PM (IST)

    20 Jul 2026 12:24 PM (IST)

    केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट

    लोहगडावर झालेल्या व्यावसायिक केतन अगरवाल खून प्रकरणाला शनिवारी (१८ जुलै) रोजी एक महिना पूर्ण झाले आहे. हत्या करणारा चेतन चौधरी तसेच होणारी पत्नी सिया गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांकडून न्यायवैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे, घटनास्थळाची पुर्नरचना (सीन रिक्रएशन), तसेच अन्य तांत्रिक बाबी विचारात घेऊन केतन अगरवाल खून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सीसीटीव्ही चित्रीकरण, मोबाइलची तांत्रिक पडताळणी, मोबाइलमधील चॅट तसेच अन्य बाबींवर तपासात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. केतन अगरवाल खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात आला आहे,’ अशी माहिती ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

  • 20 Jul 2026 12:12 PM (IST)

    20 Jul 2026 12:12 PM (IST)

    बेशिस्त वाहनचालकांचा कहर!

    पुणे शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासोबतच बेशिस्तांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न होत असताना बेशिस्तांची संख्या मात्र, कमी होत नसल्याचे वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे. या कारवाईत सर्वाधिक कारवाई वन-वे तसेच नो-एंट्रीचे उल्लघंन करणाऱ्यांची असून, पोलिसांनी प्रमुख दहा प्रकारात कारवाई केली आहे. केवळ ६ महिन्यात शहरातील तब्बल ५ लाख ८९ हजार २६४ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. तर, गेल्या ५ वर्षांत २० लाख १३ हजार ९३९ वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

  • 20 Jul 2026 12:00 PM (IST)

    20 Jul 2026 12:00 PM (IST)

    प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू

    कल्याणच्या नीलकंठ सोसायटीत प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरल्याचा आरोप एका महिलेवर आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने तब्बल 24 तास बाथरूमचा नळ सुरू ठेवल्याचा संशय आहे. मात्र, आरोपीने पाठवलेल्या एका व्हॉईस मेलमुळे संपूर्ण कट उघड झाला. आरोपी महिला फरार असून पोलिसांची पथके कोलकात्यात तपास करत आहेत.

  • 20 Jul 2026 11:55 AM (IST)

    20 Jul 2026 11:55 AM (IST)

    रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला! डझनभर बॅलेस्टिक मिसाइल्स अन् क्षेपणास्त्रांचा मारा

    रशिया युक्रेन युद्ध अधिक पेटले आहे. दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले सुरुच आहे. नुकतेच रविवारी (२० जुलै) पहाटे रशियाने राजधानी कीव्हसह युक्रेनच्या अनेक भागांमध्ये हल्ले केले आहे. रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि गायडेड बॉम्बने हल्ल्या केला असून यामध्ये किमान ६ जण मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. तर डझनभर लोक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

  • 20 Jul 2026 11:50 AM (IST)

    20 Jul 2026 11:50 AM (IST)

    पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJPचा संसद मोर्चा; जंतरमंतरवर गोंधळ, पोलिसांची लाठीचार्जची कारवाई

    दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांनी जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संसद परिसरातील सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याने त्यांनी सुरक्षा बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी लाठीचार्ज केला.आरपीएफचे जवान आणि पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.

  • 20 Jul 2026 11:42 AM (IST)

    20 Jul 2026 11:42 AM (IST)

    सरकारी नोकरीची मोठी संधी! UPPSC PCS 2026 च्या ‘इतक्या’ जागांसाठी आजच अर्ज करा

    दरवर्षी यूपीपीएससी पीसीएस परीक्षेत लाखो विद्यार्थी बसतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे या परीक्षेतून मिळणारी प्रतिष्ठित पदे आणि आकर्षक वेतन. यंदाही आयोगाने गट ‘अ’ आणि ‘ब’ मधील सुमारे 500 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मात्र, पुढील काळात विभागांच्या गरजेनुसार या जागांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते.

  • 20 Jul 2026 11:20 AM (IST)

    20 Jul 2026 11:20 AM (IST)

    International Moon Day : रात्रीचा अधिपती, नभातील मोती अन् अद्भुत चमत्कार म्हणजे चंद्र

    मानवी जिज्ञासा, अथांग अवकाश आणि विज्ञानाचा अद्भुत संगम दर्शवणारा एक अत्यंत विशेष दिवस म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय चंद्र दिन’ (International Moon Day). दरवर्षी २० जुलै रोजी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या वैज्ञानिक कामगिरींपैकी एक असलेल्या ‘अपोलो ११’ (Apollo 11) मोहिमेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यंदाचा चंद्र दिन भारतासाठी आणि विशेषतः मराठी वाचकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, कारण भारताच्या चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिमेने जागतिक अंतराळ विज्ञानात भारताचा तिरंगा सर्वात उंच फडकवला आहे.

  • 20 Jul 2026 11:12 AM (IST)

    20 Jul 2026 11:12 AM (IST)

    eSIM स्मार्टफोन विकण्याचा प्लॅन करताय? केवळ Factory Reset पुरेसे नाही

    eSIM Phone Selling Tips: आजकाल अनेक स्मार्टफोन्समध्ये eSIM सपोर्ट मिळत असल्यामुळे फिजिकल सिम कार्डची गरज कमी झाली आहे. मात्र, eSIM असलेला स्मार्टफोन विकताना केवळ Factory Reset करणे पुरेसे नसते. तुमचा वैयक्तिक डेटा आणि मोबाईल नंबर सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आधी करणं आवश्यक आहे.

  • 20 Jul 2026 10:59 AM (IST)

    20 Jul 2026 10:59 AM (IST)

    साला मैं तो साहब बन गया!पोलीस चौकी रिकामी पाहून मद्यपी बनला ठाणेदार

    सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्यांचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील दारुच्या नशेत लोक कधी काय करतील सांगता येत नाही. सध्या असाच एक मद्यपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पठ्ठ्यानं दारुच्या नशेत असे काही केले आहे पाहून तुम्हालाही हसू आवरण नाही. नेमकं काय केलंय पठ्ठ्यानं? जाणून घेऊयात.

  • 20 Jul 2026 10:50 AM (IST)

    20 Jul 2026 10:50 AM (IST)

    GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा

    रॉकस्टार गेम्सने जीटीए ऑनलाईनसाठी नवीन ग्रॉटी वेलेनो जीटी सुपरकार सादर केली आहे. पण आता सर्व प्लेअर्स या कारचा वापर करू शकत नाही. प्लेयर्सना केवळ ही कार क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. मात्र लक्षात ठेवा की केवळ जीटीए+ सबस्क्रिप्शन असलेल्या प्लेयर्सना एक आठवडा ही कार मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर 12 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असणार आहे. यानंतर सर्व प्लेअर्ससाठी ही कार लेजेंडरी मोटरस्पोर्ट वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

  • 20 Jul 2026 10:40 AM (IST)

    20 Jul 2026 10:40 AM (IST)

    NMC चा मोठा निर्णय! आता मेडिकल कॉलेज स्वतःच करणार Faculty ची नियुक्ती आणि पदोन्नती

    राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (NMC) देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या नियुक्ती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर नियुक्ती प्राधिकरणे आता प्राध्यापकांच्या नियुक्ती, पदोन्नती आणि पदनामांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतील.

  • 20 Jul 2026 10:30 AM (IST)

    20 Jul 2026 10:30 AM (IST)

    सनई चौघडे’मध्ये प्रेमाची चाहूल! जय-शर्वरीच्या नात्याला मिळणार नवं वळण

    झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सनई चौघडे’ सध्या रंजक वळणावर आली असून आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना रोमँटिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सनई चौघडे या मालिकेतील परब कुटुंब आणि खानोलकर कुटुंब यांच्यातील वादविवाद कायमच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात.

  • 20 Jul 2026 10:20 AM (IST)

    20 Jul 2026 10:20 AM (IST)

    पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा! अँडीज पर्वतरांगेत हादरली जमीन; ५ जणांचा मृत्यू

    दक्षिण अमेरिकी शहर पेरुवर मोठे संकट कोसळले आहे. पेरुतील अँडीज पर्वतीय भागात शनिवारी (१९ जुलै) रात्री भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या भूकंपात ५ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी आहेत. या दुर्घटनेमुळे शेकडो नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.

  • 20 Jul 2026 10:10 AM (IST)

    20 Jul 2026 10:10 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

    समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. वर्धाच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारने अचानक पेट घेतला. यामुळे हा भीषण अपघात घडला.

Web Title: Maharashtra breaking news live updates today 20 july political sports national international crime entertainment technology automobile marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • live blog
  • Navarashtra live Upadates

संबंधित बातम्या

आधुनिक पायाभूत सुविधा राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थ व्यवस्थेसाठी आवश्यक
1

आधुनिक पायाभूत सुविधा राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थ व्यवस्थेसाठी आवश्यक

Top Marathi News Today Live : सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
2

Top Marathi News Today Live : सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.