Maharashtra Breaking News Updates Today:
Maharashtra HSC Result 2026 News Marathi: महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२६ ची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज इयत्ता १२वीचा (HSC) निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची घोषणा प्रथम सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत घेण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल गेल्या वर्षी ५ मे रोजी जाहीर झाला होता. डिजीलॉकरने काही दिवसांपूर्वीच digilocker.gov.in या आपल्या वेबसाइटवर “लवकरच येत आहे” (COMING SOON) अशी सूचना प्रसिद्ध करून निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाच्या वेबसाईटवर काही बिघाड झाल्यास, विद्यार्थी डिजीलॉकर वेबसाईट किंवा ॲपद्वारे आपला निकाल तपासू शकतील. महाराष्ट्र बोर्डाच्या पत्रकार परिषदेत मुला-मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारीसुद्धा जाहीर केली जाईल.
02 May 2026 04:50 PM (IST)
परभणीत तापमान मागील एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा चार अंश डिग्री सेल्सिअस म्हणजेच तब्बल 44 अंश डिग्री सेल्सिअस एवढे वाढले आहे मे महिन्यात देखील या तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे जर ढगाळ वातावरण झाले तर मात्र काही अंशी तापमानात घट होऊ शकते पण सरासरीपेक्षा चार ते पाच टक्के तापमानात वाढ झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची देखील काळजी घ्यावी लागणार आहे केळी ऊस आणि फळबागा जपण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्या पिकांना पाणी द्यावे. त्याचबरोबर दुपारी बारा ते सायंकाळी चार पर्यंत उन्हामध्ये बाहेर फिरू नये. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे आपले पशुधन देखील शेतकऱ्यांनी जपावे होईल तेवढे सावलीमध्ये त्यांची निवाऱ्याची व्यवस्था करावी असे म्हणत हवामान तज्ञ कैलास डाखोरे यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
02 May 2026 04:45 PM (IST)
निसर्गाचा ढासळणारा समतोल आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये एका महत्त्वाकांक्षी मोहिमेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 'राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी' मोहिमेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. अहिल्यानगर महानगरपालिका आणि साईद्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात येत असून, एका वर्षात १ लाख वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याचा ऐतिहासिक संकल्प यावेळी करण्यात आला. राज्याचे महसूल, दुग्धव्यवसाय विकास व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ झाला.
02 May 2026 04:40 PM (IST)
मुंबई येथील मीरा रोडच्या नया नगर परिसरात दोन सुरक्षा रक्षकांवर झालेल्या हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराने हल्ला करण्यापूर्वी धर्म विचारून कलमा म्हणायला लावले मात्र तसे न करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. अशाच प्रकारे २०२५ मध्ये पहलगाम या ठिकाणी भारतीय पर्यटकांवर धर्म विचारून हल्ला करण्यात आला होता. तसाच हा वेगळा प्रकार मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानी मध्ये घडला काही लोक सातत्याने सांगत असतात असे काही प्रकार नसतात मात्र अशा घटना लव्ह जिहाद असेल किंवा वेगवेगळ्या मार्गाने सर्वसामान्य लोकांवर अत्याचार करणारा हा समाज जिहादी समाज असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
02 May 2026 04:35 PM (IST)
माथेरान या पर्यटन स्थळी गतवर्षी प्रत्येक वीकेंड मध्ये नेरळ माथेरान घाट जाम होण्याची आणि वाहतूक कोंडी होण्याची समस्या उद्भवत होती.मात्र नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या पुढाकाराने पार्किंग क्षेत्र मध्ये वाढ करण्यात यश आले असून आता एकाच वेळी 600 गाड्या उभ्या राहू शकतील एवढी जागा वाहनतळ येथे उपलब्ध झाली आहे.दरम्यान, जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान येथील पार्किंगची समस्या दूर झाली आहे.माथेरान हे जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळ असून या ठिकाणी विविध राज्यातून तसेच विविध देशातून पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.मात्र या ठिकाणी ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, त्यावेळी येथील पर्यटकांना पार्किंगची समस्याला सामोरे जावे लागते. आता याच पर्यटकांना एक आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे.माथेरानमध्ये ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होती,त्याच ठिकाणी आता आपल्या पर्यटकांना आपली गाडी पार्किंग करण्यासाठी अतिरिक्त वाहनांची करिता पार्किंगचे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
02 May 2026 04:30 PM (IST)
‘ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक’ अंतर्गत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कळंबोली व भिवंडी तालुक्यातील राहनाळ येथील गोदामावर केलेल्या छापामारी कारवाईत तब्बल 349 किलो उच्च प्रतीची कोकेन जप्त केली असून तिची किंमत जवळपास 1 हजार 745 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या कारवाईमुळे अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त करण्यात एन सी बी ला यश आले असून या कारवाई नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी एन सी बी चे अभिनंदन केले आहे.सहा महिन्यां च्या गुप्त तपास आणि तांत्रिक निगराणीनंतर NCB च्या पथकाने नवी मुंबईतील कलंबोली परिसरात MH-03-DV-3803 क्रमांकाची सुपर कॅरी गाडी अडवली. तपासणी दरम्यान क्रिकेट पॅड आणि ग्लोव्हज मध्ये लपवून ठेवलेले 136 किलो कोकेन जप्त करण्यात आले. त्यानंतर आरोपीच्या चौकशीतून भिवंडीतील राहनाळ गावातील लक्ष्मण कंपाऊंड या गोदामाचा तपास लागला. NCB ने तात्काळ छापा टाकत त्या ठिकाण हून आणखी 213 किलो कोकेन हस्तगत केला.
02 May 2026 04:25 PM (IST)
कल्याण तालुक्यातील मुरबाड नगर महामार्गावर बापसई फाट्याजवळ रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडलेल्या अपघाताने बिबट्याचा मृत्यू झाला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
02 May 2026 04:20 PM (IST)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या उच्च सुरक्षा क्षेत्रातच चोरट्यांनी हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जी-12 रॅम्प ऑफिसमधून मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीस गेल्याने सुरक्षा यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अच्युत बबन पाटील (वय 31, रा. वाजे, ता. पनवेल) यांनी नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अच्युत पाटील हे इंडिगो एअरलाईन्समध्ये लोडर म्हणून कार्यरत असून, त्यांच्यासोबत अभिषेक परमेश्वर उपाडे (वय 22, रा. पारगाव) हेही काम करतात. दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजता दोघेही कामावर हजर झाले होते. सकाळी सुमारे 9.30 वाजता त्यांनी आपले अॅपल कंपनीचे मोबाईल फोन बॅगेमध्ये ठेवून जी-12 रॅम्प ऑफिसमध्ये ठेवले आणि कॅन्टीनमध्ये गेले. मात्र सुमारे 11.30 वाजता परत आल्यानंतर बॅगेतील मोबाईल फोन गायब असल्याचे उघड झाले.
02 May 2026 04:15 PM (IST)
करंजाडे-उलवे अक्सेस रोडवर वेगाचा कहर अखेर समोर आला असून, काही दिवसांपूर्वी नवराष्ट्रने व्यक्त केलेली अपघाताची भीती प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसून आले आहे. विमानतळ शेजारील या धोकादायक मार्गावर कार पलटी होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.करंजाडे-उलवे अॅक्सेस रोड बनतोय रेस ट्रॅक; अपघातांची भीती तीव्र” या मथळ्याखाली दैनिक नवराष्ट्र मध्ये वृत्त छापण्यात आले होते.मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता, उलवेहून पनवेल चिंचपाडाकडे जाणाऱ्या एअरपोर्ट लिंक रोडवर हा अपघात झाला. या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असून, वळणाजवळ रस्त्यावर पडलेली रेती आणि अपुरी सुरक्षितता यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले.
02 May 2026 04:10 PM (IST)
वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या काही दिवसांत चोरी, अपघात आणि निष्काळजीपणाच्या घटनांची मालिका उघडकीस आली असून, या सर्व घटनांमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच फेब्रुवारी 2026 ते मार्च 2026 पर्यंत ६ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून समाज माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवाल (एफ आर आई) मधून समोर आली आहे. विमानतळासारख्या अत्यंत संवेदनशील प्रकल्प परिसरात अल्पावधीतच विविध स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याने हा भाग ‘हाय रिस्क झोन’ बनत असल्याची भीती व्यक्त होत आहे. चोरी, अपघात, अंतर्गत गैरप्रकार आणि वाहतूक अडथळे या घटनांची मालिका प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या करण्यात आलेल्या पुनर्रचनेत वाशी आणि पनवेल परिमंडळाचे पुनर्वाटप करत बेलापूर हे नवीन परिमंडळ निर्माण करण्यात आले. विमानतळ परिसरातील वाढती वर्दळ आणि सुरक्षा गरज लक्षात घेता स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.
02 May 2026 04:00 PM (IST)
फ्रूट टार्ट हा एक आकर्षक, रंगीबेरंगी आणि चविष्ट डेझर्ट आहे जो पाहताच खाण्याची इच्छा होते. बाहेरून कुरकुरीत टार्ट शेल, आतमध्ये मऊ आणि क्रीमी कस्टर्ड फिलिंग आणि त्यावर ताज्या फळांची सजावट या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम म्हणजे फ्रूट टार्ट. खास प्रसंगी, वाढदिवस, गेट-टुगेदर किंवा पाहुण्यांसाठी काही खास बनवायचे असेल तर फ्रूट टार्ट उत्तम पर्याय ठरतो. या रेसिपीत तुम्ही तुमच्या आवडीची फळे वापरू शकता, त्यामुळे प्रत्येकवेळी वेगळी चव आणि लुक तयार करता येतो. बाजारात मिळणाऱ्या टार्टपेक्षा घरच्या घरी बनवलेला टार्ट अधिक फ्रेश, हेल्दी आणि चविष्ट असतो. थोडीशी मेहनत लागली तरी शेवटी मिळणारी चव मात्र नक्कीच समाधान देणारी ठरते. चला फ्रुट टार्ट बनवण्यासाठीची टेस्टी रेसिपी जाणून घेऊया.
02 May 2026 04:00 PM (IST)
Marathi Movie : नुकतेच सोशल मिडीयावर अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते सचिन खेडेकर या दोघांमध्ये झालेला संवाद चर्चेत आलेला आहे. ‘कोण होणार मराठी करोडपती?’ या मराठी कार्यक्रमात महेश मांजरेकर उपस्थित होते, त्यावेळी शोचे होस्ट सचिन खेडेकर यांनी मराठी सिनेमा या विषयावर महेश मांजरेकरांशी मनसोक्त गप्पा केल्या. या संवादादरम्यान “मराठी सिनेमा आणि त्याला न मिळणारं थिएटर” हा विषय चांगलाच गाजला आणि हाच विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
02 May 2026 03:30 PM (IST)
सायन्स स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांकडे करिअरचे बहुविध पर्याय असतात. फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स असलेले विद्यार्थी इंजिनिअरिंग क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, रोबोटिक्स सारख्या शाखांमध्ये काम करू शकतात. तर फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी असलेले MBBS, BDS, BAMS किंवा BHMS, फार्मसी (B.Pharm) किंवा बायोटेक्नॉलॉजी (B.Sc Biotech) सारख्या मेडिकल कोर्सेसला प्रवेश घेऊ शकतात. तसेच एआय आणि डेटा सायन्स, पायलट आर्किटेक्चर संरक्षण क्षेत्रातही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
02 May 2026 03:20 PM (IST)
American Spirit Airlines Cancels Flight: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जगभरात तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. या परिस्थितीचा विमान क्षेत्रालाही फटका बसला आहे. ‘ATF’च्या म्हणजेच विमान इंधनांच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता वेगाने स्पष्ट होऊ लागला आहे. अनेक विमान कंपन्या आपल्या काही उड्डाणांना रद्द करत आहेत, तर काही कंपन्यांनी तर आपले कामकाजच पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, एका मोठ्या कंपनीनेही हा निर्णय घेतला आहे. नेमकी काय परिस्थिती आहे या क्षेत्रात काय होणार परिणाम जाणून घेऊयात.
02 May 2026 03:10 PM (IST)
नीता परब, मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) शनिवारी (२ मे, २०२६) महाराष्ट्र एचएससी निकाल २०२६ जाहीर केला. मंडळाचे अध्यक्ष त्रिगुणा कुलकर्णी यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावर्षी इयत्ता १२वीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइट आणि थेट लिंक hscresult.mahahsscboard.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.
02 May 2026 03:00 PM (IST)
Ghana Rejets US Health Deal : वॉशिंग्टन/अक्रा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या इराण युद्धामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या अमेरिका (America) फर्स्ट धोरणामुळे अनेक देशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे ट्रम्प यांच्या कठोर धोरणांमुळे अनेक महसत्ता देशांचा गोंधळ उडाला असून दुसरीकडे एका छोट्या देशाने अमेरिकेला चांगलेच सुनावलं आहे. पश्चिम आफ्रिकन देश घानाने अमेरिकेचा कोट्यावध मदतीचा प्रस्ताव फेटाळला आहे.
02 May 2026 02:50 PM (IST)
सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे रायगड मधील समुद्र किनारे हाऊसफुल झाले आहेत. मुरूड, अलिबाग, दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटक सुट्टीचा आणि निसर्गाचा मन भरुन आस्वाद घेताना दिसत आहेत.
02 May 2026 02:41 PM (IST)
जळगाव महापालिकेची तब्बल 42 कोटींची आर्थिक फसवणुक करणाऱ्या अटलांटा कंट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेतील भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महापालिकेच्या आर्थिक फसवणुकी संदर्भातला प्रकरण उघडकीस आणून सर्वात आधी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देखील दिली होती.,
02 May 2026 02:29 PM (IST)
जालन्यातील बदनापूर शहरात धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. बदनापूर शहरातल्या शिवाजी महाराज चौकात धिरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला जोडे मारून पायदळी तुडवत त्यांचं दहन केलं आहे. यासगळ्या प्रकरणानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
02 May 2026 02:20 PM (IST)
चिखली तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे भीषण पाणी टंचाईने नागरिकांचा संयम सुटला असून, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत जोरदार आंदोलन छेडले. "पाणी आमचा हक्क आहे", "गावाला पाणी मिळालेच पाहिजे" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
02 May 2026 02:12 PM (IST)
पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा मेमध्ये सुरू होईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र तांत्रिक कामे आणि चाचण्या अपूर्ण असल्याने १५ मेचा मुहूर्त पुढे ढकलला गेला. आता १५ जूनची नवी तारीख दिली असून, प्रकल्पाच्या विलंबामुळे पुणेकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
02 May 2026 02:01 PM (IST)
02 May 2026 01:58 PM (IST)
मी संविधान मानत नाही असा दररोज आक्षेपार्ह स्टेटस कल्याणमधील फळ विक्रेत्याने ठेवला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
02 May 2026 01:55 PM (IST)
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२६ मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटात राम चरणसोबत जान्हवी कपूर झळकणार असून संगीताची जबाबदारी ए. आर. रहमान यांनी सांभाळली आहे.दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या, ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती अशा ‘पेद्दी’ (Peddi) या sports drama प्रदर्शनाच्या तारखेबाबतचा दीर्घकालीन प्रतीक्षा अखेर संपली आहे. अनेकदा झालेला विलंब आणि सोशल मीडियावर पसरलेल्या विविध अफवांच्या पार्श्वभूमीवर, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे.
02 May 2026 01:50 PM (IST)
सध्या इलेक्ट्रिक अर्थात EV वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बाईकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. विशेष गोष्ट म्हणजे, ही बाईक पेट्रोल किंवा विजेवर नाही, तर पाण्यापासून तयार होणाऱ्या वाफेवर चालते. या अनोख्या बाईकचा वेग आणि तंत्रज्ञान इतके प्रभावी आहे की, ती काही सेकंदातच सुपरबाईक्सनाही मागे टाकते.
02 May 2026 01:45 PM (IST)
अमृतसर येथील भारत-पाकिस्तान अटारी सीमेवर होणाऱ्या प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार, आता रिट्रीट सेरेमनी संध्याकाळी ६ वाजता सुरू होऊन ६.३० वाजेपर्यंत चालेल. यापूर्वी रिट्रीट ५.३० वाजता सुरू होऊन ६ वाजता संपत होती. हवामान आणि दिवसाच्या कमी-जास्त होणाऱ्या प्रकाशाचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रेक्षकांना चांगला अनुभव देण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वेळेत हा बदल आवश्यक होता. अटारी-वाघा सीमेवर दररोज होणारी ही देशभक्तीने भरलेली सेरेमनी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. दररोज हजारो लोक या कार्यक्रमाचा भाग बनतात आणि भारत माता की जय तसेच वंदे मातरम यांसारख्या घोषणांनी वातावरण देशभक्तीने दुमदुमून जाते.
02 May 2026 01:35 PM (IST)
नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती बैठकांमध्ये शहराच्या विविध भागातील विकास कामांना सध्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात येत आहे. शहराच्या आठ विभागांसह १४ गावांतील विविध विकासकामांचे प्रस्ताव स्थायी समितीत येत आहेत. यातील अनेक प्रस्ताव हे महासभा अस्तित्वात आल्यावर शहरातील नागरिकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांनुसार तयार करण्यात आले आहेत. मात्र अनेक प्रस्ताव हे प्रशासनाने देखील आणलेले आहेतं तर अनेक प्रस्ताव हे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कामांचे येत आहेत. मात्र यात देखील अनेक प्रस्ताव हे मुदतवाढीसाठी पटलावर येत असल्याचे दिसून येत आहे.
02 May 2026 01:25 PM (IST)
आघाडीची टेक कंपनी सॅमसंगला टक्कर देण्यासाठी Motorola ने एक मोठा खेळ खेळला आहे. कंपनीने एकाचवेळी बाजारात तीन फोल्डेबल फोन्स लाँच केले आहेत. खरं तर फोल्डेबल फोनच्या बाजारात सध्या सॅमसंग आघाडीवर आहे. मात्र सॅमसंगला टक्कर देण्यासाठी आता मोटोरोला सज्ज झाला आहे. कंपनीने Motorola Razr Ultra 2026, Motorola Razr+ 2026 आणि Motorola Razr 2026 या नावाने त्यांचे नवे फोल्डेबल फोन्स बाजारात लाँच केले आहेत. काही प्रदेशांमध्ये हे स्मार्टफोन्स Razr 70 Ultra, Razr 70 Plusआणि Razr 70 या नावाने उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यामध्ये मोठी कवर स्क्रीन देण्यात आली आहे.
02 May 2026 01:15 PM (IST)
स्वयंपाकघरातील गॅस आता आणखीच महाग होणार आहे. जर तुम्हाला या घडामोडीची कल्पना नसेल, तर आताच सावध व्हा. सरकारकडून मिळणाऱ्या संकेतांवरून असे सूचित होते की, लवकरच असे काही उपाय योजले जाण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. विविध अहवालांनुसार, घरगुती LPG सिलिंडर्सच्या किमतींमध्ये लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १ मे रोजीच, व्यावसायिक सिलिंडर्सच्या किमतींमध्ये सुमारे १,००० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता सर्वसामान्यांच्या खिशाला हा दणदणीत फटका बसणार असल्याचं समोर येत आहे.
02 May 2026 01:07 PM (IST)
महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या 9 कोटी 41 लाख 6 हजार रुपयांच्या विविध नागरी प्रस्तावांना स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूरी प्राप्त झाली. यामध्ये शिरवणे यथील दत्तकृपा वाडी या ठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्यामुळे नागरिकांना होणार त्रास दूर करण्यासाठी 28 लाख 85 हजार रक्कमेच्या रस्ते सुधारणा कामास मंजूरी देण्यात आली. त्याचप्रमाणे वाशी विभागात से.11 जुहूगाव येथील पाण्याच्या टाकी जवळील परिसरात गटारांची अवस्था खराब झाल्याने पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही.
02 May 2026 01:02 PM (IST)
बाजीराव रस्त्यावर एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भल्या पहाटे अपघाताचा थरार घडला आहे. अभिनव चौक मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स एका दुचाकीला धडकून नंतर एका इमारतीला जाऊन धडकली. यामध्ये दुचाकीस्वार मायलेकी जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक किरण रामभाऊ कचरे (वय ४२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, अनुराधा पत्की आणि सुचित्रा पत्की या दोघी जखमी झाल्या आहेत.
02 May 2026 12:55 PM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष
त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे. यावर्षीही निकालात घट झाली आहे. यावर बोलताना कुलकर्णी म्हणाले की, “निकाल घटण्यामागे मुख्य कारण म्हणजे कॉपीमुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले. गेल्या वर्षी एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नव्हती, मात्र यावर्षी १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.”
02 May 2026 12:54 PM (IST)
निकालाच्या तणावातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळाने १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
समुपदेशन सेवेची वैशिष्ट्ये:
कालावधी:
निकालाच्या दिवसापासून पुढील *८ दिवस
वेळ:
सकाळी ८:०० ते रात्री ८:०० या वेळेत विद्यार्थांना संपर्क साधता येईल.
ही सेवा पूर्णपणे निशुल्क (मोफत) आहे
संपर्क क्रमांक (समुपदेशक):
विद्यार्थी किंवा पालक खालीलपैकी कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधू शकतात:
१ . ९९६०६४४४११
२ . ७९७२५७३७४२
३ . ९८३४०८४५९३
४ . ९३५९९७८३१५
५ . ८१६९२०२२१४
६ . ९३७१६६१२५५
७ . ७२०८४२९३८१
८ ७७०९१५६०६८
९ . ८४२११५०५२८
१० ९४०४७८३९९६
सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
02 May 2026 12:48 PM (IST)
वैमनस्यातून दोन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना पुण्यातील पर्वती परिसरात घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम सुधीर वैद्य (वय १९, रा. टिकेकर वाडा, पर्वती गाव), अथर्व सचिन चव्हाण (वय १९) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहित अरुण चक्रनारायण (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैद्य याने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
02 May 2026 12:42 PM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून काही वेबसाईटवर दुपारी 12 वाजता निकाल पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाइटवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना 2 मे रोजी दुपारी एक निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल, असे बोर्डाने जाहीर केले होते. राज्य मंडळाने दिलेल्या खालील वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
1.https://results.digilocker.gov.in
2.https://mahahsscboard.in
3.https://hscresult.mkcl.org
4.https://results.targetpublications.org
5.https://results.navneet.com
02 May 2026 12:41 PM (IST)
डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाइट https://www.digilocker.gov.in/ वर जा.
येथे लॉगिन/नोंदणी (Login/Register) पर्यायावर क्लिक करा.
जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल, तर थेट लॉगिन करा.
आता, महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२६ (Maharashtra Board HSC Result 2026) या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील सबमिट करा.
गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल.
02 May 2026 12:41 PM (IST)
सर्वप्रथम, mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर, महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२६ (Maharashtra Board HSC Result 2026) या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि इतर आवश्यक तपशील भरा आणि सबमिट करा.
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्ही त्याची पीडीएफ (PDF) किंवा प्रिंटआउट घेऊ शकता.
02 May 2026 12:36 PM (IST)
लातूर येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या संत पादुका दर्शन सोहळ्याच्या आर्थिक व्यवहारात घोळम घोळ असल्याचेच महाराज लोकांनी घेतलेल्या पत्र परिषदेत स्पष्ट झाले आहे. या उत्सवाच्या हिशोबाबाबत कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही, असेच चित्र समोर आले आहे. या पादुका दर्शन सोहळ्याच्या निधीतील तीन कोटी रुपये घेऊन एक महाराज फरारी झाले असल्याचा बातम्या समाज माध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. हातात पिस्तूल असलेला त्या महाराजांचा फोटोही सोबत झळकत आहे. या पार्श्वभूमीवर लातूर येथे उत्सवाच्या आयोजकांपैकी काही जणांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर विठ्ठल कदम महाराज उर्फ छोटे माऊली यांनी आपली बाजू मांडली. उत्सवाच्या आर्थिक बाबींशी आपला काडीचाही संबंध नाही. आपण फक्त सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते जबाबदार होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
02 May 2026 12:24 PM (IST)
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आपल्या मुलीचा प्रवेश निश्चित करण्यासाठी गेलेल्या पित्याकडे ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ज्ञानेश्वर उर्फ माउली गंगाराम जगताप (३७, रा. चिंचवड नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई आकुर्डी येथील फकीर भाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे.
02 May 2026 12:12 PM (IST)
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे कारस्थान सुरु आहे, आपण सर्वांनी मिळून हा कुटील डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असून, महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प करू असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
02 May 2026 12:00 PM (IST)
Iran’s secret plan against Abu Dhabi : मध्यपूर्वेतील राजकारण आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान, इराणने आता आपला मोर्चा शेजारील अरब राष्ट्रांकडे वळवला आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केलेल्या एका धक्कादायक अहवालानुसार, इराणने सौदी अरेबिया आणि ओमानला स्पष्टपणे सांगितले आहे की, ते संयुक्त अरब अमिरातीला (UAE) आक्रमकपणे लक्ष्य करणार आहेत. इराणच्या या विधानामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
02 May 2026 11:55 AM (IST)
गुवाहाटी : रेल्वेला उशीर झाल्याने विमान चुकल्याच्या प्रकरणामध्ये ओडिशातील एका ग्राहक न्यायालयाने भारतीय रेल्वेला एका व्यक्तीला १.३ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना ओडिशाच्या बालांगीर जिल्ह्यात घडली. चंडी प्रसाद खमारी नावाच्या एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती की, २०२४ मध्ये त्यांच्या रेल्वेला सुमारे सात तासांचा उशीर झाला होता. या विलंबामुळे त्यांना त्यांचे आधीच आरक्षित केलेले विमान पकडता आले नाही. खमारी यांनी २३ ऑगस्ट २०२४ रोजी झारसुगुडा ते हावडा या प्रवासासाठी रेल्वेचे तिकीट खरेदी केले होते. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, ही गाडी सायंकाळी ७:५० वाजता झारसुगुडा येथून निघून पहाटे ३:५५ वाजता हावडा येथे पोहोचणे अपेक्षित होते. सर्व वेळापत्रकावर आधारित खमारी यांनी गुवाहाटीसाठी विमानाचे तिकीट आरक्षित केले होते, ज्याचे उड्डाण सकाळी ८:०५ वाजता होणार होते.
02 May 2026 11:50 AM (IST)
US China Oil Terminal Sanctions : सध्या जागतिक राजकारणात होर्मुझची सामुद्रधुनी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकेचा इराणी जहाजांच्या नाकेबंदीमुळे आणि त्यांच्यावरील आर्थिक निर्बंधामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने इराणशी व्यापारामुळे चीनविरोधात मोठी कारवाई केली आहे. चीन(China) च्या एका मोठ्या तेल टर्मिनलवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
02 May 2026 11:45 AM (IST)
Maharashtra HSC result 2026 News Marathi : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी म्हणजेच HSC परीक्षा 2026 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि अखेर या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. यंदा बारावी परीक्षेत एकूण उत्तीर्ण टक्केवारी 89.79 इतकी नोंदवण्यात आली आहे. मुलींचा निकाल पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस ठरला असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 93.15 तर मुलांची 93.15 इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्क्यांनी निकाल घटला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभागाने आघाडी घेतली असून, 97.14 टक्के उत्तीर्ण टक्केवारी नोंदवली आहे. तर लातूर विभागाचा निकाल तुलनेत कमी म्हणजे 84.14 टक्के इतका आहे.
02 May 2026 11:40 AM (IST)
Sanjay Raut Press Conference : आजकाल व्हीआयपींसाठी सर्व काही केले जाते, मात्र त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. रस्ते अडवणे ही काही मुख्यमंत्र्यांची सूचना नसते, पण प्रशासनाने योग्य नियोजन केले नाही, त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी ज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी व्हीआयपी व्यवस्थापनामुळे नागरिकांना होणारा त्रास, वाढती महागाई, तसेच जमीन व्यवहारांबाबत त्यांनी सवाल उपस्थित केले.
02 May 2026 11:35 AM (IST)
ठाणेकरांसाठी मुंबईप्रमाणेच ठाण्याच्या रस्त्यांवर लवकरच डबल डेकर बसेस धावताना दिसणार असून गुरुवारी गुरुवारी ठाणे परिवहनच्या आनंदनगर बस आगारात डबलडेकर बस दाख झाल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महानगर परिवहन सेवेत (टीएमटी) १० डबल डेकर बसेसची भर घालण्याची घोषणा केली. प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रवासी सेवेसाठी ती उपलब्ध होण्यास पंधरा दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
02 May 2026 11:32 AM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी म्हणजेच HSC परीक्षा 2026 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि अखेर या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे.
यंदा बारावी परीक्षेत एकूण उत्तीर्ण टक्केवारी 89.79 इतकी नोंदवण्यात आली आहे. मुलींचा निकाल पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस ठरला असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 93.15 तर मुलांची 93.15 इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्क्यांनी निकाल घटला आहे.
विभागनिहाय निकालात कोकण विभागाने आघाडी घेतली असून, 97.14 टक्के उत्तीर्ण टक्केवारी नोंदवली आहे. तर लातूर विभागाचा निकाल तुलनेत कमी म्हणजे 84.14 टक्के इतका आहे.
02 May 2026 11:30 AM (IST)
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने मिड रेंज सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Moto G47 या नावाने ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसह अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय हे नवीन हँडसेट पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत 40 हजारांहून कमी आहे. मोटो जी 47 हा स्मार्टफोन 8GB + 128GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 319 यूरो म्हणजेच सुमारे 35,000 रुपये आहे. ग्राहकांना हे लेटेस्ट लाँच डिव्हाईस पँटोन फ्यूशिया रेड, पँटोन इंपेनेट्रेबल, पँटोन नॉटिकल ब्लू या रंगात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
02 May 2026 11:25 AM (IST)
Pune Crime News Marathi : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही मुलगी सुट्ट्यांसाठी आजीच्या घरी आली होती. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, लोकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही निरागस मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीच्या घरी आली होती. शनिवारी ती बाहेर खेळत असताना, ६५ वर्षीय भीमराव कांबळे यांनी तिला फसवून आपल्या घरासमोरील गोठ्यात नेले. त्यांनी मुलीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप आहे. प्रथम त्याने तिच्यावर बलात्कार केला, नंतर दगडाने चिरडून तिचा जीव घेतला. त्यानंतर संशय टाळण्यासाठी त्याने तिचा मृतदेह गोठ्यात शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला.
02 May 2026 11:20 AM (IST)
नीट युजी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून रविवारी ३ एप्रिल दिवसाचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र, आवश्यक देखभाल व अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी, रविवारी मध्य रात्री मुख्य मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, या कालावधीत लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर रविवारी रात्री १२.०५ ते पहाटे ५.०५ या वेळेत ब्लॉक राहील. या दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.
02 May 2026 11:15 AM (IST)
HSC Result 2026 : आता महाराष्ट्र बोर्डाच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लाखो विद्यार्थी ऑनलाइन निकाल पाहू शकतात. यंदा विद्यार्थी निकालाची अधिकृत वेबसाइट आणि डिजीलॉकरच्या माध्यमातून आपला निकाल पाहू शकतात तसेच ऑनलाइन मार्कशीट डाउनलोड करू शकतात.
पाहा एका क्लिकवर : निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप फॉलो करा? डिजीलॉकरवर मार्कशीट कशी डाउनलोड करायची?






