(फोटो सौजन्य: X)
व्हायरल होत असलेली ही घटना लहान वाटत असली तरी त्यात त्याग, संघर्ष आणि ममतेचे प्रतिबिंब सहज झळकते. डोक्यावरील पोतं आणि कंबरेवर ठेवलेल्या बाळाची काळजी राखण्यासाठी तिला त्या क्षणी किती मेहनत करावी लागली असेल याचा आपण विचारही करु शकत नाही. ही घटना फक्त तिचीच नाही तर तिच्यासारख्या अनेक कष्टाळू महिलांची कथा दर्शवते. घराची जबाबदारी सांभाळत, मुलाची काळजी घेणे फक्त एका आईलाच जमू शकते. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक महिला डोक्यावर जड पोते घेऊन पायऱ्या चढताना दिसते. यावेळी तिच्या कंबरेवर तिचे लहान मुल शांतपणे बसलेले असते. प्रचंड वेदना होत असतानाही ती आपल्या मुलाची पुरेपुर काळजी घेते. हे दृश्य आपल्याला आईच्या सामर्थ्याचे दर्शन घडवून देते.
This is honestly beyond extraordinary, seeing her carry so much weight on her neck with a baby on her back while still climbing those stairs, it really shows how the strength of motherhood goes beyond what we can even imagine pic.twitter.com/5Ao5kYvb9a — Nikhil saini (@iNikhilsaini) April 29, 2026
हा व्हिडिओ @iNikhilsaini नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘हे खरोखरच अत्यंत विलक्षण आहे. पाठीवर लहान बाळ असतानाही, गळ्यावर इतके प्रचंड ओझे पेलत तिला त्या पायऱ्या चढताना पाहणे; यातून हेच सिद्ध होते की, मातृत्वाची शक्ती ही आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असते’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “भावा, ही काही ताकद नाही; तर तिचे आणि मुलांचे प्राण धोक्यात घालणे हा निव्वळ मूर्खपणा आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक समाज म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत. कोणत्याही आईला आणि मुलाला यातून जावे लागू नये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असूनही आपली अशी अवस्था आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






