Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Breaking News - इंडोनेशिया हा देश भौगोलिकदृष्ट्या जगातील सर्वात धोकादायक मानल्या जाणाऱ्या ‘रिंग ऑफ फायर’ (Ring of Fire) मध्ये वसलेला आहे. हा तो भाग आहे जिथे जगातील सर्वाधिक भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होतात.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Apr 02, 2026 | 06:50 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:  आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप

Indonesia Earthquake : आज सकाळी जेव्हा जग नुकतेच जागे होत होते, तेव्हा इंडोनेशियातील (Indonesia) मोलुक्का समुद्राच्या परिसरात निसर्गाचे एक भीषण रूप पाहायला मिळाले. एका शक्तिशाली भूकंपाने केवळ जमीनच हादरवली नाही, तर हजारो लोकांच्या मनात धडकी भरवली आहे. रिश्टर स्केलवर ७.४ इतकी प्रचंड तीव्रता असलेल्या या भूकंपाने इंडोनेशियाच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा धोका निर्माण केला असून प्रशासनाने तातडीचा इशारा जारी केला आहे.  वाचा सविस्तर – 

The liveblog has ended.
  • 02 Apr 2026 06:47 PM (IST)

    02 Apr 2026 06:47 PM (IST)

    भारतात Vinfast च्या ‘या’ 7 सीटर इलेक्ट्रिक कारची पहिली झलक समोर! जाणून घ्या फीचर्स आणि पॉवर

    भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारच्या मागणीत चांगली वाढ होतेय. इलेक्ट्रिक कारकडे भविष्यातील एक उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते आहे. त्यात आता सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत इंधनाची टंचाई लक्षात घेत अनेक जण EV वाहन खरेदीला प्राधान्य देत आहेत.

  • 02 Apr 2026 06:34 PM (IST)

    02 Apr 2026 06:34 PM (IST)

    काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन

    मुंबई : निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण मोहिमेवर (SIR) अनेक राज्यातून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक विशिष्ट जाती, धर्माची मते वगळण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही राज्यात निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक केलेल्या एस.आय.आर. मोहिमेत प्रचंड घोटाळे झाल्याचे दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाला यातून फायदा होईल अशा पद्धतीने ही मोहिम राबवली जात असल्याचे दिसून आले आहे, म्हणून महाराष्ट्रात होणारी एसआरआर मोहिम कोणतीही घाईगडबड न करता निष्पक्षपणे राबवावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

  • 02 Apr 2026 06:24 PM (IST)

    02 Apr 2026 06:24 PM (IST)

    भोगाव येथे वादळी पावसाने नुकसान

    वाई : भोगाव येथील वादळी पावसात नुकसान झालेल्या कुटुंबाच्या नुकसानीची दखल घेत वाईचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) डॉ. योगेश खरमाटे यांनी थेट पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन पाहणी केली.

  • 02 Apr 2026 06:17 PM (IST)

    02 Apr 2026 06:17 PM (IST)

    KKR चे ‘नारायणास्त्र’ चालणार की SRH चे ओपनर्स धुलाई करणार? काय आहे आजची Playing 11

    SRH vs KKR Tata IPL 2026 Live: आज संध्याकाळी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे आज दोन्ही संघ जिंकण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहेत. दरम्यान आज कोणते खेळाडू संघात असतील याबाबत (IPL 2026) एक अंदाज जाणून घेऊयात.

  • 02 Apr 2026 06:07 PM (IST)

    02 Apr 2026 06:07 PM (IST)

    काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण? ज्याच्या सुनावणीसाठी राष्ट्राधक्षांनी लावली हाय-कोर्टात हजेरी

    Donald Trump Visited High Court : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणावादरम्यान अमेरिकेच्या राजकीय आणि न्यायालयीन इतिहासात अविश्वसनीय आणि चकित करणारी घटना घडली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) वॉशिंग्टन येथील सर्वोच्च  न्यायालयात उपस्थित राहिले होते. ज्याने सर्वजण चकित झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही औपचारिक कार्यक्रमासाठी नाही, तर एका खटल्याच्या सुनावणीसाठी ट्रम्प यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. अमेरिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. पदावर असताना न्यायालयाच्या कामाकाजात प्रत्यक्ष सहभागी होणारे ट्रम्प हे पहिलेच हेड ऑफ द स्टेट ठरले आहेत.

  • 02 Apr 2026 05:59 PM (IST)

    02 Apr 2026 05:59 PM (IST)

    “15 वर्षे झाली तरी…”; 2011 World Cup च्या विजयावर Sachin Tendulkar ने शेअर केला Video

    India Win 2011 World Cup Final: आज भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकून 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2011 चा वर्ल्ड कप भारताने जिंकला होता. 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेला पराभूत करून तब्बल 28 वर्षांनी वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने 28 वर्षांनी ट्रॉफी जिंकली. हा वर्ल्ड कप मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी अत्यंत खास होता. त्या आठवणीत त्याने आज एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  • 02 Apr 2026 05:59 PM (IST)

    02 Apr 2026 05:59 PM (IST)

    भारतात Vinfast च्या ‘या’ 7 सीटर इलेक्ट्रिक कारची पहिली झलक समोर!

    व्हिएतनामची कार निर्माता कंपनी VinFast ने भारतात आपल्या नव्या VinFast VF MP7 या इलेक्ट्रिक MPVची पहिली झलक सादर केली आहे. यामुळे ही कार लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही 7-सीटर इलेक्ट्रिक गाडी असून कुटुंबासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे.

  • 02 Apr 2026 05:30 PM (IST)

    02 Apr 2026 05:30 PM (IST)

    महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

    राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर्गत विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

  • 02 Apr 2026 05:16 PM (IST)

    02 Apr 2026 05:16 PM (IST)

    ’या’ ऑटो कंपनीने Electric SUVs बाजार एकतर्फी गाजवलंय

    महिंद्रा भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमधील वाहनांची विक्री करते. कंपनीने ICE आणि EV (इलेक्ट्रिक वाहन) या दोन्ही विभागांमध्ये SUVs ची एक्स्टेंडेड रेंज ऑफर करून देतो. आपल्या पारंपारिक SUVs सोबतच, भारतात या कंपनीच्या इलेक्ट्रिक SUVs ला असलेली मागणीही सातत्याने वाढत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक SUV विभागात वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. केवळ गेल्या एका वर्षातच, महिंद्राने या विभागातील 50000 हून अधिक SUV वाहनांची विक्री केली आहे.

  • 02 Apr 2026 04:50 PM (IST)

    02 Apr 2026 04:50 PM (IST)

    नेरळमध्ये खड्डे भरणे व गतिरोधक कामांना सुरुवात, स्थानिकांना दिलासा

    नेरळ जिल्हा परिषद गटातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेले रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे आवाहन स्थानिकांनी केले होते.जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून डांबराचे गाड्या मागवून घेत नेरळ गावातील बहुसंख्य रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.तर अनेक रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी डांबर आणि रोलर यांचा वापर केला जात आहे.

  • 02 Apr 2026 04:45 PM (IST)

    02 Apr 2026 04:45 PM (IST)

    रायगडावर शिवसमाधीस्थळी अनधिकृत बोर्ड हटवला

    किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळी लावण्यात आलेल्या अनधिकृत बोर्डाचा अखेर हटव करण्यात आला आहे. या बोर्डावर ‘शांतता राखा’ असा मजकूर लिहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांवरही अप्रत्यक्ष बंदी घालण्यात येत असल्याची तक्रार शिवप्रेमींनी केली होती. बुधवारी रात्री रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर हे शिवसमाधी स्थळी गेले असता ही बाब समोर आली. संबंधित बोर्ड हा ना महाराष्ट्र शासनाचा ना पुरातत्व विभागाचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाकडीकर यांनी तात्काळ तो हटवण्याचे निर्देश देत शिवप्रेमींमार्फत बोर्ड काढून टाकण्यात आला.

  • 02 Apr 2026 04:40 PM (IST)

    02 Apr 2026 04:40 PM (IST)

    करूळ घाटात सिमेंट ट्रक दरीत कोसळला । विजापूरच्या बाप-लेकांचा जागीच मृत्यू |

    सिंधुदुर्ग जिल्हात करूळ घाटात भीषण अपघात झाला असून सिमेंटने भरलेला ट्रक खोल दरीत कोसळला. या अपघातात विजापूर येथील बाप-लेकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • 02 Apr 2026 04:35 PM (IST)

    02 Apr 2026 04:35 PM (IST)

    आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी स्वीकारला पदभार

    वसई-विरार महानगरपालिकेचे नवीन आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. शहरातील प्राथमिक सोयीसुविधांचा दर्जा, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण यासह शहराचा नियोजनबद्ध विकास यावर विशेष भर दिला जाणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी हे ३१ मार्च २०२६ रोजी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी शासनाने वसई विरारचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी.पी यांची नियुक्ती केली आहे. बी.पी हे महापालिकेचे नववे आयुक्त आहेत. पृथ्वीराज बी. पी. हे २०१४ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत.

  • 02 Apr 2026 04:30 PM (IST)

    02 Apr 2026 04:30 PM (IST)

    हनुमान जयंतीला अनोखा व्यायाम अभिषेक, हनुमान मंदिरात 10 हजार जोर-बैठका अर्पण

    बजरंगबली हनुमान ही एक शक्तीची देवता आहे. उत्तम व निरोगी जीवनासाठी व्यायाम हा एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील अतिशय उंच अशा टेकडीवर निसर्गरम्य पर्यटनस्थळी विरासन हनुमान मंदिरात सातत्याने गेली 25 वर्षे हनुमान जयंती दिवशी दहा हजार जोर व बैठकांचा आगळावेगळा अभिषेक व्यायामातून हनुमान चरणी अर्पण केला जातो. राष्ट्रीय पंच व “भारत श्री” किशोर सोनसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोर व बैठका यांचा अभिषेक हनुमान चरणी अर्पण केला जातो. यावेळी प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर, वकील त्याचबरोबर महिला व व्यायामपटू मोठ्या प्रमाणात एकत्रित येत हा जोर बैठका मारल्या जातात. आजची मुले मोबाईल व त्याचबरोबर व्यसनाकडे आकर्षित होत असताना हा उपक्रम यातून सुदृढ व बलवान भारत बनविला जात आहे.

  • 02 Apr 2026 04:25 PM (IST)

    02 Apr 2026 04:25 PM (IST)

    भाजप चिन्हावर निवडून आलेलेच खरे कार्यकर्ते -प्रभाकर सावंत

    भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्यांबाबत पक्षाने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. या संदर्भातील अंतिम निर्णय प्रदेश नेतृत्व आणि कोअर कमिटी घेणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांवर यापूर्वीच कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप चिन्हावर निवडून आलेलेच खरे कार्यकर्ते मानले जातील अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

  • 02 Apr 2026 04:20 PM (IST)

    02 Apr 2026 04:20 PM (IST)

    तुर्भे पोलिसांची यशस्वी कामगिरी 43 गहाळ मोबाईल केले मूळ मालकाला परत

    नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांनी मोबाईल गहाळ प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी करत 43 मोबाईल फोन शोधून काढले. सुमारे 9 लाख रुपये किंमतीचे हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. तांत्रिक तपासाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

  • 02 Apr 2026 04:15 PM (IST)

    02 Apr 2026 04:15 PM (IST)

    आमदारांची भाजपमध्ये विलीन होण्याची मानसिकता -संजय राऊत

    शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील काही आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या घडामोडींवर त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. संबंधित पक्षांकडून मात्र अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

  • 02 Apr 2026 04:10 PM (IST)

    02 Apr 2026 04:10 PM (IST)

    येवल्याच्या महामृत्युंजय मंदिरात भक्ती आणि कलेचा संगम

    नाशिकच्या येवला येथील महामृत्युंजय मंदिरात चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीनिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले. शिवभक्तांनी रांगोळीच्या माध्यमातून बाल हनुमान आणि सप्तशृंगी मातेची सुंदर प्रतिमा साकारली. या कलाकृतीतून भक्ती आणि कलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. मंदिर परिसरात उपस्थित भाविकांनी या रांगोळीचे कौतुक करत आनंद व्यक्त केला.

  • 02 Apr 2026 04:05 PM (IST)

    02 Apr 2026 04:05 PM (IST)

    नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळा

    नागपूरमधील दोन अल्पसंख्यांक विभागाच्या शाळा परवानगीविना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद नागपूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या चौकशीतून हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौसिया व जुबेदा असे या माध्यमिक शाळांचे नाव असून यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बोगस टीसी आणि मार्कशीट देण्यात आले होते.

  • 02 Apr 2026 04:00 PM (IST)

    02 Apr 2026 04:00 PM (IST)

    नवी मुंबईतील कामगारांवर उपाशी झोपण्याची वेळ

     

    नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरात गॅस टंचाईमुळे कामगारांचे हाल होत आहेत. हॉटेलमध्येही गॅस उपलब्ध नसल्याने चुलीवर स्वयंपाक केला जात असून त्यामुळे जेवण उशिरा मिळत आहे. वेळेअभावी अनेक कामगारांना उपाशीपोटी काम करावे लागत आहे. गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायही प्रभावित झाला असून अनेक कामगार गावी परतले आहेत.

  • 02 Apr 2026 03:40 PM (IST)

    02 Apr 2026 03:40 PM (IST)

    Gautam Adani : अमेरिकेने होर्मुझमधून घेतली माघार! अदानींचे नशीबच चमकले

    Adani Haifa Port Israel 2026 : मध्य-पूर्वेतील युद्ध आता एका अशा वळणावर पोहोचले आहे, जिथून जागतिक व्यापाराचे संपूर्ण नकाशे बदलणार आहेत. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) दबाव वाढवल्यानंतर, अमेरिकेने तिथून घेतलेली माघार आणि आखाती देशांनी शोधलेला नवीन मार्ग, यामुळे भारताचे नशीब पालटणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा फायदा भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि भारताच्या ‘IMEC’ प्रकल्पाला होताना दिसत आहे.

  • 02 Apr 2026 03:30 PM (IST)

    02 Apr 2026 03:30 PM (IST)

    Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद

    धाराशिव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या सापळा कारवाईत माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधीक्षक इम्रानखान पठाण यास ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात जेरबंद करण्यात आले. इम्रानखान अहमदपाशा पठाण (वय ४०), पद – अधीक्षक (वर्ग २), वेतन व भविष्य निर्वाह निधी, माध्यमिक शिक्षण विभाग, धाराशिव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सध्या धाराशिव येथे भाड्याने राहत असून मूळचा उदगीर (जि. लातूर) येथील आहे.

  • 02 Apr 2026 03:10 PM (IST)

    02 Apr 2026 03:10 PM (IST)

    Raghav Chadha News: राघव चड्ढांना राज्यसभा उपनेतेपदावरुन हटवले, बोलण्यावरही मर्यादा

    Raghav Chadha News:  राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना त्यांच्याच पक्षाने मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पार्टीने (आप) त्यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले आहे. इतकेच नाही, तर राज्यसभेतील त्यांचे बोलण्याचे अधिकारही कमी करण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीने आता राघव चड्ढा यांच्या जागी नवीन उपनेत्याची नियुक्ती केली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार अशोक मित्तल आता राज्यसभेत उपनेते असतील. असं आप’ने सचिवालयाला कळवले आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राघव चड्ढा हे पक्षाशी सल्लामसलत न करता काही विशिष्ट मुद्द्यांवर बोलत होते. राज्यसभेत ज्या मुद्द्यांवर ते बोलणार होते, त्याबद्दल त्यांनी पक्षाला माहिती दिली नव्हती. आम आदमी पक्षाने याबाबत त्यांना ताकीदही दिली होती. त्यांच्यावर केलेल्या कारवाईमागील कारण पक्षाने अद्याप स्पष्ट केलेले नसले तरी, बेशिस्त आणि पक्षाच्या धोरणांचे पालन न करणे ही पक्षाच्या या निर्णयामागील कारणे असण्याची शक्यता आहे.

  • 02 Apr 2026 03:07 PM (IST)

    02 Apr 2026 03:07 PM (IST)

    Prakash Raj यांच्या आईच्या अंत्यसंस्कार पद्धतीवर नेटकऱ्याने उपस्थित केले प्रश्न

    अभिनेता प्रकाश राज यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात असून, त्यांनी यावर आपले सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या आई स्वर्णलता यांचे २९ मार्च रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर ३१ मार्च रोजी बेंगळुरूमध्ये ख्रिश्चन परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चर्चमध्ये झालेल्या या अंत्यसंस्काराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना आता दिसत आहेत, ज्यात प्रकाश राज आपल्या आईला अंतिम निरोप देताना दिसले. या पार्श्वभूमीवर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी त्यांचा जुना व्हिडिओ शेअर करत त्यांनी स्वतःला नास्तिक म्हटल्याचा उल्लेख केला आणि प्रश्न उपस्थित केला की, मग त्यांनी आईचा अंत्यसंस्कार ख्रिश्चन पद्धतीने का केला? एका यूजरने लिहिले की, “प्रकाश राज स्वतःला नास्तिक म्हणतात आणि देवावर विश्वास नसल्याचे सांगतात, तरीही त्यांनी आईचा अंत्यसंस्कार ख्रिश्चन परंपरेनुसार का केला आहे.”

  • 02 Apr 2026 03:02 PM (IST)

    02 Apr 2026 03:02 PM (IST)

    यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल

    अधिक मासामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल झाला असून, राज्यातील संतांच्या पालख्या नेहमीपेक्षा सुमारे एक महिना उशिराने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांच्या भक्तीभावात व उत्साहात मात्र कुठलाही फरक पडलेला नसून ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात वारीची परंपरा यंदाही तेवढ्याच भक्तिभावाने पार पडणार आहे. मात्र यावर्षी वारकऱ्यांची आणि विठुरायाची भेट एक महिना उशिराने होणार आहे. तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासामुळे यंदा आषाढी वारीचे वेळापत्रक पुढे ढकलले गेले आहे. १७ मेपासून सुरू झालेला अधिक मास १५ जूनपर्यंत असल्याने दरवर्षी मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निघणारे पालखी सोहळे यंदा २४ जूनपासून क्रमाक्रमाने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. वारकरी संप्रदायाची हजारो वर्षांची अखंड परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीबाबत संतांनी अभंगातून सांगितले आहे.

  • 02 Apr 2026 02:42 PM (IST)

    02 Apr 2026 02:42 PM (IST)

    भोंदूबाबा प्रकरणावरुन सपकाळांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

    भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • 02 Apr 2026 02:25 PM (IST)

    02 Apr 2026 02:25 PM (IST)

    अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड

    अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा (प्रेमप्रकरण) तपास सुरू असताना याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. पुर्ण शहरात पसरलेल्या या रॅकेटमधून धक्कादायक माहिती समोर आली असून, ड्रग्ज विक्री करणारे तसेच ते घेणारे अशा ७६ जणांची माहिती पोलिसांकडे आली आहे. आता हे सर्वजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. आरोपी पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (वय ३७), जतीन जयवंत कदम (वय २६, रा. वारजे) व शुभम संतोष दहिभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर, उपनिरीक्षक अक्षय पाटील, चेतन धनवडे, पोलिस अंमलदार चेतन बराटे, शेलार, पाडळे, अनिरूद्ध गायकवाड, ज्ञानेश्वर तोडकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

  • 02 Apr 2026 02:07 PM (IST)

    02 Apr 2026 02:07 PM (IST)

    विराज प्रोफाइल कंपनीच्या जनसुनावणीला सर्व पक्षांकडून कडाडून विरोध

    स्टील प्रोसेसिंग करणाऱ्या विराज प्रोफाइल कंपनीच्या विस्तारीकरणासाठी दिनांक ८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावणीला सर्वच पक्षांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज बोईसर येथे सर्वपक्षीय पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
    या पत्रकार परिषदेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक नेत्यांनी एकत्र येत कंपनीच्या विस्तार प्रकल्पावर गंभीर आक्षेप नोंदवले. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणावर होणारा संभाव्य परिणाम, वाढणारे प्रदूषण, तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी स्पष्ट इशारा दिला की, जनतेच्या हिताविरोधात होणारा कोणताही प्रकल्प सहन केला जाणार नाही. ८ एप्रिल रोजी होणारी जनसुनावणी रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

  • 02 Apr 2026 02:07 PM (IST)

    02 Apr 2026 02:07 PM (IST)

    कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड

    सातारा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना, आता जावळी तालुक्यातील कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एक कोटी तीस लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे सुमारे 40 टक्के काम अद्याप अपूर्ण असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे काम पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित ठेकेदाराने संपूर्ण बिल काढल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

  • 02 Apr 2026 01:58 PM (IST)

    02 Apr 2026 01:58 PM (IST)

    दोन दिवसापासून बेपत्ता आहे अशोक खरातची बायको

    अशोक खरातची बायको कल्पना खरातचा गेल्या 2 दिवसांपासून पोलीस यंत्रणांना शोध लागत नाहीये. फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध SIT आणि शिर्डी पोलीस घेत आहेत. कल्पनाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याने लोकेशन मिळण्यात अडचणी येत असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. खरात कुटुंबाचा देखिल आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असतांनाच SIT कडून कुटुंबावर वॉच का ठेवण्यात आला नाही ? हा देखिल प्रश्न उपस्थित होत आहे.

  • 02 Apr 2026 01:49 PM (IST)

    02 Apr 2026 01:49 PM (IST)

    भोंदूबाबा अशोक खरातच्या केबिनमध्ये काय काय मिळालं

    भोंदूबाबा अशोक खरातची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातने ओशनो जलच्या नावाखाली गुंगी येणाऱ्या औषधे, वेदनाशामक गोळ्या महिलांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • 02 Apr 2026 01:43 PM (IST)

    02 Apr 2026 01:43 PM (IST)

    नाशिक न्यायालयात अशोक खरात प्रकरणी सुनावणी

    नाशिक न्यायालयात अशोक खरात प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच अत्याचारानंतर जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर गुन्ह्यात आज सुनावणी होणार आहे. एका घटस्फोटित पीडित महिलेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात यासंबंधी दिली होती तक्रार.

  • 02 Apr 2026 01:32 PM (IST)

    02 Apr 2026 01:32 PM (IST)

    खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; अजय मिसरांच्या नकारानंतर असीम सरोदे पुढे

    नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांना विनंती करण्यात आली होती, मात्र कामाच्या ताणामुळे त्यांनी नकार दिला. यानंतर ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

  • 02 Apr 2026 01:20 PM (IST)

    02 Apr 2026 01:20 PM (IST)

    Ashok Kharat case भोंदू अशोक खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

    नाशिक न्यायालयात अशोक खरात प्रकरणात आज सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करत सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने खरातला पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे. खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • 02 Apr 2026 01:00 PM (IST)

    02 Apr 2026 01:00 PM (IST)

    ‘आम्ही तुमचे शत्रू नाही…’ ; इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र

    गुरुवारी (०२ एप्रिल २०२६) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणयुद्धाबाबत अनेक दावे केले. या युद्धात अमेरिकेच्या विजयाची घोषणा करत त्यांनी यातून माघार घेतली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर इराणचे  राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेला उद्देशून एक खुले पत्रे लिहिले आहे. या चार पानांच्या पत्रात त्यांनी अमेरिकन लोकांलिषयीचे मत ठामपणे मांडले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अधिकृत अकाऊंटवर हे पत्रे त्यांनी पोस्ट केले आहे.

  • 02 Apr 2026 12:55 PM (IST)

    02 Apr 2026 12:55 PM (IST)

    तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन

    राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची घडी बसवण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे आहे. मात्र याच बरोबर नेत्यांची नावे ही वादग्रस्त प्रकरणामध्ये येत असल्यामुळे अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

  • 02 Apr 2026 12:50 PM (IST)

    02 Apr 2026 12:50 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या सभापतींची आज होणार निवड

    मागील महिन्यात जिल्हा परिषदेच्या ६३ गट, १२६ गणांतील सदस्य निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड पार पडली. आता आज विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. दोन्ही पद भाजपने स्वतःकडे खेचून घेत मित्र पक्षांना घरचा रस्ता दाखवला. आता विषय समित्यांची काय रणनीती बनवली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

  • 02 Apr 2026 12:45 PM (IST)

    02 Apr 2026 12:45 PM (IST)

    इराण युद्धात पुढारी बनणाऱ्या पाकिस्तानसाठी कतारने ‘असे’ बंद केले दरवाजे

    जागतिक राजकारणात सध्या अशा काही घडामोडी घडत आहेत, ज्याने पाकिस्तानच्या (Pakistan) ‘इस्लामिक लीडरशिप’च्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. एकीकडे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्धाचा वणवा पेटलेला असताना, पाकिस्तान स्वतःला या संघर्षात मध्यस्थ आणि मुस्लिम देशांचा मोठा भाऊ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पाकिस्तानच्या या प्रयत्नांना कतारने असा काही सुरुंग लावला आहे की, संपूर्ण इस्लामाबाद हादरून गेले आहे. कतारने (Qatar) पाकिस्तानी नागरिकांसाठी मिळणारी ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’ (VOA) सुविधा तात्पुरती स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • 02 Apr 2026 12:40 PM (IST)

    02 Apr 2026 12:40 PM (IST)

    भारतीय जवानाने एका अ‍ॅक्शनमध्येच पाकिस्तानी सैनिकाची उडवली खिल्ली

    भारत-पाकिस्तानमध्ये नेहमीच एका वेगळ्या प्रकारची स्पर्धा सुरु असते. आम्ही तुमच्याहून किती पुढे आहोत किंवा बळकट आहोत हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानची धडपड नेहमीच पाहायला मिळते पण या धडपडीतही यश काही त्यांच्या हाती लागत नाही. पाकिस्तानची खिल्ली उडणे काही नवे राहिले नाही. याआधीही देशातील अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत ज्यांनी देशाला लाज आणली. कधी इथे लोक नव्या शोरुमची चोरी करतात तर कधी अवाक्याबाहेरची वक्तव्ये करतात ज्यांना ऐकूनच हसू अनावर होईल.

  • 02 Apr 2026 12:35 PM (IST)

    02 Apr 2026 12:35 PM (IST)

    IPL 2026 चा पहिला बवाल, लखनौच्या Prince Yadav ची ट्रिस्टन स्टब्सशी शाब्दिक बाचाबाची!

    क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजासाठी राग हे एक शस्त्र मानले जाते. यामुळे अनेकदा मैदानावर वाद होतात. अशीच एक घटना इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या पाचव्या सामन्यात घडली, जेव्हा लखनौ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवची दिल्ली कॅपिटल्सच्या ट्रिस्टन स्टब्ससोबत टक्कर झाली. या वादातून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. मात्र, हस्तक्षेपानंतर परिस्थिती लवकरच निवळली.

  • 02 Apr 2026 12:25 PM (IST)

    02 Apr 2026 12:25 PM (IST)

    कचऱ्याच्या हायवाने विद्यार्थ्याला चिरडल्याने जागीच मृत्यू, एक तास वाहतूक ठप्प

    शहरातील मिल कॉर्नर ते लिटल फ्लॉवर स्कूल रस्त्यावरील लक्ष्मी कॉलनी चौकातील बारापुल्ला गेट परिसरात बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात महानगरपालिकेच्या भरधाव कचरा वाहणाऱ्या गाडीने एका विद्यार्थ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ओमकार रायभान खनसे (२०, रा. सेंटर हौ.सो, बजाजनगर, एमआयडीसी वाळूज) असे मृत्यू विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.ओमकार खनसे हा एसबी महाविद्यालयात बीबीएचे द्वितीय वर्षात शिकत होता. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास तो कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवर (एमएच-२०-एफडब्ल्यू-२००१) बारापुल्ला गेट परिसरातून जात असताना अचानक महापालिकेच्या भरवेगात आलेल्या कचरा नेणाऱ्या गाडीने (एमएच-२०-ईएल ००७९) त्याला जोरदार धडक दिली.

  • 02 Apr 2026 12:18 PM (IST)

    02 Apr 2026 12:18 PM (IST)

    धोक्याची घंटा! गावाची लोकसंख्या 7830 आणि केवळ 5 टँकरने पाणीपुरवठा

    एकीकडे अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान होत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत असल्याचे विरोधाभासी चित्र ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे. ग्रामीण भागात विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोत आटत चालल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.सध्या जिल्ह्यातील २४ गाव आणि वाड्यांमधील सुमारे ७ हजार ८३० लोकसंख्येसाठी ५ टॅकर कार्यरत आहेत. यामध्ये ३ गावे आणि २१ वाड्यांचा समावेश आहे. देवळा तालुक्यातील एका गावात, इगतपुरी तालुक्यातील दोन गाव व सात वाड्या तसेच सिन्नर तालुक्यातील १४ वाड्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.

  • 02 Apr 2026 12:10 PM (IST)

    02 Apr 2026 12:10 PM (IST)

    हनुमान जयंतीनिमित्त ‘Varanasi’च्या निर्मात्यांनी चाहत्यांना दिले सरप्राईज

    हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर देशभरात भक्तीचा आणि उत्साहाचा माहोल पाहायला मिळत आहे. या खास दिवशी केवळ भक्तच नव्हे, तर चित्रपटसृष्टीही भक्तिभावाने रंगलेली दिसते आहे. आगामी ‘वाराणसी’ या भव्य चित्रपटाच्या मेकर्सनीही हनुमान जयंतीनिमित्त एक खास व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना अनोख्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये भगवान हनुमानाची प्रभावी झलक पाहायला मिळते, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • 02 Apr 2026 12:01 PM (IST)

    02 Apr 2026 12:01 PM (IST)

    भोंदू ऋषिकेश वैद्यने महिलेला अश्लील फोटो, व्हिडिओ पाठवून त्रास दिल्याचं उघडकीस

    वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्यने संबंधित महिलेला वारंवार अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील महिलेच्या मोबाईलमधील स्क्रीनशॉटही समोर आले आहेत.

  • 02 Apr 2026 11:55 AM (IST)

    02 Apr 2026 11:55 AM (IST)

    रॉकेलच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

    आखाती युद्धामुळे रॉकेलच्या (केरोसीन) कमिशनमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा कमी झाल्यामुळे सरकारने रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय आता पुरवठा दाराच्या कमिशनमध्येही दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

  • 02 Apr 2026 11:47 AM (IST)

    02 Apr 2026 11:47 AM (IST)

    तेल वाहतुकीचा मार्ग 'हॉर्मुझ' पुन्हा सुरु करण्यासाठी ब्रिटनचा पुढाकार

    इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाला आता एक महिना पूर्ण होत आला आहे. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी बुधवारी हे स्पष्ट केलं की, ब्रिटन अमेरिका-इराण युद्धात सहभागी होणार नाही. इतकंच नव्हे तर त्यांनी हे ठळकपणे सांगितलं की, हे आमचं युद्ध नाही, त्यामुळं यामध्ये सामिल हे राष्ट्रहितामध्ये नाही. त्याचबरोबर ज्या मार्गानं पश्चिम आशियात इराणमधून कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते तो हॉर्मुझ सामुद्रधुनिका मार्ग मोकळा करण्यासाठी ३५ देशांची बैठक बोलावली आहे.

  • 02 Apr 2026 11:32 AM (IST)

    02 Apr 2026 11:32 AM (IST)

    आखाती युद्धात अमेरिकेचा विजय - ट्रम्प

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल-अमेरिका आणि इराण युद्धा संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. आखाती युद्धात अमेरिकेचा विजय झाल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. "इस्त्रायल-अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला करताना ट्रम्प यांनी इराणचे नौदल संपले असून त्यांचे सर्व मोठे नेते मारले गेले आहेत. इराणचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली असून आपण युद्ध संपवण्याच्या खूप जवळ आहे. कधीही मिळवला नाही असा विजय आम्ही मिळवला आहे. आम्ही आमची उद्दीष्ट आम्ही पूर्ण केली असून इराणला अण्वस्त्रसज्ज देश होण्यापासून रोखल्याचा मला अभिमान आहे", असं त्यांनी म्हटलं आहे.

  • 02 Apr 2026 11:26 AM (IST)

    02 Apr 2026 11:26 AM (IST)

    पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

    पुणे शहरासह जिल्ह्यात आज संध्याकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील २४ तासासाठी पुणे वेधशाळेने पावसाचा यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

  • 02 Apr 2026 11:13 AM (IST)

    02 Apr 2026 11:13 AM (IST)

    अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

    भोंदू अशोक खरातला काल पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्याची SIT ने मागणी केली होती. तर याच दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 02 Apr 2026 11:05 AM (IST)

    02 Apr 2026 11:05 AM (IST)

    दोन दिवसापासून बेपत्ता आहे अशोक खरातची बायको

    अशोक खरातची बायको कल्पना खरातचा गेल्या 2 दिवसांपासून पोलीस यंत्रणांना शोध लागत नाहीये. फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध SIT आणि शिर्डी पोलीस घेत आहेत. कल्पनाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याने लोकेशन मिळण्यात अडचणी येत असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. खरात कुटुंबाचा देखिल आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असतांनाच SIT कडून कुटुंबावर वॉच का ठेवण्यात आला नाही ? हा देखिल प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Maharashtra desh videsh live news 2nd april breaking news politics economy sports top news live blog marathi breaking news maharashtra politics today stock market india ipl 2026 live update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

मराठी तरुणाची डिजिटल क्रांती! ‘Cockroach Janta Party’मागचा चेहरा कोण? जाणून घ्या अभिजीत दिपके यांची कहाणी
1

मराठी तरुणाची डिजिटल क्रांती! ‘Cockroach Janta Party’मागचा चेहरा कोण? जाणून घ्या अभिजीत दिपके यांची कहाणी

Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन
2

Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन

Triple Alert For India: पेट्रोल आणि डिझेल आणखी महागणार! गीता गोपीनाथ यांचा मोठा इशारा, म्हणाल्या, “आता गंभीर…”
3

Triple Alert For India: पेट्रोल आणि डिझेल आणखी महागणार! गीता गोपीनाथ यांचा मोठा इशारा, म्हणाल्या, “आता गंभीर…”

शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?
4

शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.