अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादनंतर 'या' शहराचे नाव बदलणार, भुजबळांची विधानसभेत घोषणा (फोटो सौजन्य-X)
Renames Islampur to Ishwarpur : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आज (18 जुलै) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. याचदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची घोषणा केली. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवतील, जिथे अंतिम मंजुरी दिली जाईल.
दरम्यान राज्यातील अहमदनगर (अहिल्यानगर) , उस्मानाबाद (धाराशिव) आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यांची आणि शहरांची नावे बदण्यात आल्यानंतर आता आणखी एका शहराचे नाव बदलण्यात येणार आहे. याची शासनस्तराव कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून भाजपनेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश येणार आहे.
हिंदू संघटनेने शिवप्रतिष्ठानने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाव बदलण्याची मागणी केली होती. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आहेत. भिडेंच्या समर्थकांनी सांगितले की ही मागणी पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत. इस्लामपूरमधील एका शिवसेनेच्या नेत्याने सांगितले की, १९८६ पासून नाव बदलण्याची मागणी सुरू आहे.
हिंदुत्ववादी संघटना शिव प्रतिष्ठानने इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती. फडणवीस सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या वतीने ही मागणी मान्य केली आहे. त्यांनी सांगितले की ते हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवतील जिथे या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली जाईल. त्यांनी सांगितले की केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच हा प्रस्ताव पूर्णपणे स्वीकारला जाईल.
महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी दोन शहरांची नावे बदलली होती. ज्यामध्ये पहिले शहर औरंगाबाद आणि दुसरे उस्मानाबाद होते. महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे ठेवले. छत्रपती संभाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते, ज्यांना नंतर मुघल सम्राट औरंगजेबाने फाशी दिली. त्याच वेळी, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अहमद जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी जिल्हा करण्यात आला.
हिंदूत्ववादी संघटना शिव प्रतिष्ठान आक्रक
यापूर्वी, महाराष्ट्रातील अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव २०२४ मध्ये मंजूर करण्यात आला होता, जो केंद्र आणि राज्य सरकारांनी संयुक्तपणे अंमलात आणला होता. इस्लामपूरचे नाव बदलण्याचा प्रस्ताव देखील त्याच दिशेने एक पाऊल मानला जात आहे. स्थानिक रहिवासी आणि नेत्यांचे म्हणणे आहे की इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर केल्याने या प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशाला चालना मिळेल. तथापि, या मुद्द्यावर अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या मान्यतेवर अवलंबून असेल.