मुंबई : राज्यात सध्या विविध मुद्द्यावरुन राजकारण रंगत असताना, तसेच वेदांत प्रकल्प (Vedanta project) महाराष्ट्रातून गुजरातला (Gujrat) गेल्यामुळं महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. तसेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिका करत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी (Officers of Maharashtra State independence soldiers Committee) व पाल्य विविध मागण्यांसाठी आझाद मैदान (Azad maidan) येथे उपोषणाला बसले आहेत. (hunger strike) आपल्या विविध मागण्या कित्येक दिवस प्रलंबित आहेत, त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी व पाल्य हे आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत, येथे एकाही सत्ताधारी मंत्र्याने भेट दिली नाही, मात्र आज त्यांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambahdas Danve) यांनी आज आझाद मैदान येथे भेट घेतली.
[read_also content=”मसूद अझहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला पाकिस्तानचे पत्र https://www.navarashtra.com/world/pakistans-letter-to-taliban-government-for-arrest-of-masood-azhar-nrgm-325677.html”]
दरम्यान, या सर्वांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असून, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्द अंबादास दानवे यांनी उपोषणकर्त्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पाल्यांना दिला. मात्र सकाळपासून उपोषणकर्त्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या निषेध केला.