Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : मागील चार वर्षांपूर्वी जगभरामध्ये तांडव घातलेला कोरोना आता पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. पुन्हा एकदा कोरोना-19 जगभरात वेगाने पसरत आहे. ते भारतातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचले आहे. सध्या देशात कोरोनाचे तब्बल तीन हजार 758 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवार आणि शनिवार दरम्यान कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याशिवाय 383 लोक बरे झाले आहेत. हे सर्व आकडे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 01 जून रोजी देशात कोविडचे 3,758 सक्रिय रुग्ण नोंदवले गेले. काल 263 नवीन कोरोना रुग्ण आढळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये १२०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
02 Jun 2025 06:15 PM (IST)
ठाणे: पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यातील कळवा येथून रवींद्र वर्माला अटक केली होती. रवींद्र वर्मा मुंबईच्या नेव्हल डॉकची माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आज रवींद्र वर्माला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले आहे. कोर्टाने रवींद्र वर्माला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
02 Jun 2025 05:07 PM (IST)
बाबा रामदेव यांच्याशी संबंधित पतंजली आयुर्वेद लिमीटेड कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने या कंपनीला फेडरल इकॉनॉमिक इंटेलिजन्स एजन्सीनी उघडक केलेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. याचदरम्यान आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या कंपनी पतंजली आयुर्वेदाला मोठा धक्का दिला आहे. २७३.५ कोटी रुपयांच्या जीएसटी नोटीसविरुद्ध कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आज (2 जून) न्यायालयाने फेटाळली.
02 Jun 2025 04:54 PM (IST)
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसते. वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीस प्राधान्य देत आहेत. यातही इलेक्ट्रिक टू-व्हिलर्सला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हाच प्रतिसाद लक्षात घेता, अनेक कंपन्या येत्या काळात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करणार आहेत. यात Suzuki E Access, Hero Vida VX2, आणि TVS iQube Electric चा समावेश आहे.
02 Jun 2025 04:43 PM (IST)
महावितरण प्रशासनाविरोधात आज बदलापुरात महाविकास आघाडीने आंदोलन केलं. शहरात महावितरणकडून कोणतीही परवानगी न घेता डिजिटल मीटर लावले जात आहेत, या डिजिटल मीटरमुळे अव्वाचे सव्वा बिल नागरिकांना येत आहेत .या डिजिटल मीटरची सक्ती महावितरणने शहरात करू नये .यासाठी बदलापूर पूर्वेच्या महावितरण कार्यालयावर महाविकास आघाडीने धडक मोर्चा काढला आहे.
02 Jun 2025 04:42 PM (IST)
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माच्या मुसक्या एटीएसने आवळल्या आहेत. त्याला आज ठाणे कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला ५ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. वर्मा हा इंजिनिअर असून त्याने भारताच्या युध्दनौका आणि पाणबुड्यांची माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा आरोप आहे.
02 Jun 2025 03:42 PM (IST)
मुंबई: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने महिलांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सरकारसाठी ही योजना गेमचेंजर ठरली आहे. या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाल्याचे म्हटले जाते. आता महायुतीचे सरकार असून, फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान याच योजनेबाबत सरकार महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
02 Jun 2025 03:13 PM (IST)
पनवेलमधील कामोठे पालिका कार्यालयामध्ये एकच गदारोळ सुरु होता. पालिकेमदील प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Panvel | कामोठे पालिका कार्यालयातील प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन#Panvel #MaharashtraNews #Kamothe #DailyNews pic.twitter.com/ItCsE6jF7L
— Navarashtra (@navarashtra) June 2, 2025
02 Jun 2025 02:13 PM (IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा मालक असलेल्या मस्कने एक नवीन धमाका केला आहे. एलन मस्कने X प्लेटफॉर्मवर एक नवीन मेसेजिंग फीचर XChat लाँच केलं आहे. मस्कने उचलेलं हे पाऊल टेक्नोलॉजी क्षेत्रातील एक मोठी प्रगती मानली जात आहे. कारण मस्कने यापूर्वीच सांगितलं आहे की, त्याला सोशल मीडिया एक्सला एव्हरिथिंग अॅप बनवायचं आह. याबाबत मस्कने आधीच घोषणा केली होती. या दिशेने मस्कने प्रयत्न देखील सुरु केले आहेत.
02 Jun 2025 01:48 PM (IST)
Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरातील सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत बैठकांचाही जोर वाढला आहे. हे सर्व सुरू असतानाच महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तयारीला सुरूवात केल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लकवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजू शकतो, असे बोलले जात आहे.
02 Jun 2025 12:36 PM (IST)
पुतिन यांनी स्वतः ट्रम्पच्या सल्ल्याची खिल्ली उडवली आणि चर्चेच्या मध्यभागी युक्रेनियन शहरांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला असल्याचे आता दिसून आले आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि युरोपने एकत्रितपणे रशियन राष्ट्राध्यक्षांचा अहंकार मोडून काढण्याची तयारी केली आहे.
02 Jun 2025 12:11 PM (IST)
खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन नाशिकमध्ये कुंभमेळा बैठक घेतात. पण नाशिकची काय परिस्थिती झाली आहे ते बघा एकदा. तुम्ही नाशिक दत्तक घेतले होते. पण नाशिकचे अनाथ आश्रम केलंय तुम्ही. कुंभ साठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले. पण किती हजार कोटी रुपयांचे प्रत्यक्षात काम होणार आहे?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
02 Jun 2025 11:28 AM (IST)
राज्य परिवहन (एसटी) बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी गर्दीत कमी भाडे देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी एसटी महामंडळ प्रवाशांसाठी 'लवचिक भाडे' (फ्लेक्सी भाडे) योजना सुरू करणार आहे. याचा अर्थ कमी गर्दीच्या महिन्यांत प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी तिकिटांचे दर सुमारे १५% कमी केले जातील. परंतु सुट्ट्यांच्या काळात, म्हणजे जेव्हा खूप गर्दी असते, तेव्हा तिकिटांचे दर तसेच राहतील.
02 Jun 2025 11:23 AM (IST)
तमिळ चित्रपट दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांचे चेन्नई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एशियनेटच्या वृत्तानुसार, ते मदुराईहून चेन्नईला जात असताना बसमध्ये त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आणि त्यांच्या मित्रांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. तसेच त्यांच्या चाहत्यांना देखील या बातमीने चांगलाच धक्का बसला आहे.
#Rip dearest brother @VikramSugumara3
I’ve learnt so much from you & will always cherish every moment
Gone too soon
You will be missed #RIPVikramSugumaran pic.twitter.com/U78l3olCWI— Shanthnu (@imKBRshanthnu) June 1, 2025
02 Jun 2025 11:20 AM (IST)
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा आणि नर्गिस फाखरी यांच्यासह १९ कलाकारांचा कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट ‘हाऊसफुल ५’ ६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे स्टार दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या संदर्भात १ जून रोजी पुण्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे स्टार पुण्यातील एका मॉलमध्ये पोहोचले जिथे चाहते त्यांना पाहण्यासाठी उपस्थित झाले परंतु चाहत्यांची गर्दी नंतर नियंत्रणाबाहेर गेली. तिथे इतका गोंधळ झाला की अक्षय कुमारला हात जोडून गर्दीत धक्काबुक्की करू नका असे आवाहन करावे लागले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
02 Jun 2025 11:18 AM (IST)
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी चार धाममधील एक धाम असलेल्या बद्रीनाथचे दर्शन घेतले. त्यांवी आपल्या कुटुंबासह बद्रीनाथ धाम येथे प्रार्थना केली.
#WATCH | Delhi CM Rekha Gupta reached Badrinath Dham along with her family and offered prayers.
(Source: Information Department) pic.twitter.com/rkRJDNuYxG
— ANI (@ANI) June 2, 2025
02 Jun 2025 11:11 AM (IST)
पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर येईल, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. यावर बोलताना अमित शाहांच्या दाव्यात तथ्य आहे कारण महाराष्ट्रातील ईव्हीएम पश्चिम बंगालला पाठवण्यात येणार आहेत, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला
02 Jun 2025 10:48 AM (IST)
२१ मे रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) सरचिटणीस आणि नक्षलवादी नेत्या नंबला केशव राव उर्फ बसवराजू यांच्या मृत्युने नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले. बसवराजूच्या मृत्यूने नक्षलवादी संतप्त झाले आहेत. सरकारचा निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी १० जून रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.
02 Jun 2025 10:47 AM (IST)
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. ही पालखी दरवर्षी आषाढी एकादशीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी जाते. या वर्षी सेडरचे ५६ वे वर्ष आहे, जे ५५ वर्षांची परंपरा चालू ठेवते.
02 Jun 2025 10:47 AM (IST)
महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील पडघा येथे भारतातील बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयसिस) या दहशतवाद्याविरुद्ध मोठा छापा टाकला आहे. एटीएस टीम आयसिसशी संबंधित असलेल्या साकिब नाचनच्या घरावरही छापा टाकत आहे.
02 Jun 2025 09:57 AM (IST)
२ जून ते ४ जून या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी पॅराग्वेचे अध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस आले आहेत. त्यांना पालम एअर फोर्स स्टेशनवर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
#WATCH | Delhi: President of Paraguay, Santiago Peña Palacios, receives Guard of Honour at Air Force Station Palam as he arrives in India for his three-day visit from June 2nd to June 4th. pic.twitter.com/ceX8pzoybS
— ANI (@ANI) June 2, 2025
02 Jun 2025 09:55 AM (IST)
स्टॅव्हॅंजर सिटी येथे झालेल्या नॉर्वे बुद्धिबळ २०२५ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत डी गुकेशने मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. यावेळी समोरील स्पर्धकाने त्याची हार झाल्यानंतर टेबलवर हात आदळला.
#DGukesh defeats Magnus Carlsen in the 6th round of the #NorwayChess2025 tournament in Stavanger City. This marks #Gukesh’s 1st-ever classical win over Carlsen. pic.twitter.com/9u6m6c756A
— All India Radio News (@airnewsalerts) June 2, 2025
02 Jun 2025 09:25 AM (IST)
रायगड किल्ल्यावर भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यात एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण—‘यंत्रराज’ किंवा सौम्ययंत्र (Astrolabe)—सापडले आहे. या शोधाची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे दिली असून, त्यांनी या यंत्राचा फोटोही शेअर केला आहे संभाजीराजे म्हणाले की, दुर्गराज रायगडाचे बांधकाम अत्याधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले होते, याचा हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे.
02 Jun 2025 09:24 AM (IST)
रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पदावरुन राजकारण रंगलेले असताना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. रायगडमधील सभेत योगेश कदम यांनी रायगडचे पालकमंत्रिपद हे भरत गोगावले यांना मिळायला हवे, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली. तसेच मी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस केली आहे, असे देखील म्हटले आहे.
02 Jun 2025 09:22 AM (IST)
पुणे शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली आहे. पुण्यातील साखर संकुलमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली असून यावेळी बंद दाराआड चर्चा देखील झाली. यामुळे राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला आहे.