
#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक
Marathi Breaking news updates- भारताचा संघ सध्या एकदिवसीय मालिका खेळत आहे, या मालिकेचा शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. तर भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंह याने क्रिकेटमध्ये निवृती घेतल्यानंतर तो संघ बऱ्याच कारणामुळे चर्चेत पाहायला मिळाला आहे. युवराज सिंह याने अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलसारख्या दमदार खेळाडूंना त्याने शिकवण दिली आहे. त्याचबरोबर तो त्याच्या बिझनेसमध्ये देखील कमालीची प्रगती करत आहे.
06 Dec 2025 05:42 PM (IST)
भारतात कर्करोग वेगाने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सरकारने लोकसभेत चिंताजनक आकडेवारी सादर केली. कर्करोगावरील संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी (IARC) नुसार, भारतात अंदाजे १,४१३,३१६ कर्करोगाचे रुग्ण आहेत (दर १००,००० मध्ये ९८.५), चीन (४,८२४,७०३ रुग्ण, २०१.६ प्रति १००,०००) आणि अमेरिका (२,३८०,१८९ रुग्ण, ३६७ प्रति १००,०००) नंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
06 Dec 2025 05:21 PM (IST)
TVS Ronnin चा एक नवीन व्हेरिएंट, Agonda लाँच केला आहे. या व्हेरिएंटमध्ये विशिष्ट स्टायलिंग आणि कॉस्मेटिक अपडेट्स आहेत. याची एक्स-शोरूम किंमत 1.31 लाख रुपये आहे. या बाईकचे डिझाइन गोव्यातील शांत आणि सुंदर अगोंडा समुद्रकिनाऱ्यापासून प्रेरित आहे. या व्हेरिएंटमध्ये चमकदार पांढरी इंधन टाकी आणि हेडलॅम्प काऊल आहे, जे काळ्या रंगाच्या बॉडीसह एक आकर्षक कॉन्ट्रास्ट निर्माण करते.
06 Dec 2025 05:09 PM (IST)
मराठी मनोरंजन विश्वात सेलिब्रिटींच्या लग्नांची सुरुवात झाली आहे. प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी-सोहम बांदेकर यानंतर आता हास्यजत्रा फेम अभिनेता निमिष कुलकर्णी लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. अभिनय आणि कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकणारे निमिष कुलकर्णीने कोमल भास्करसोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यांचे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
06 Dec 2025 04:55 PM (IST)
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मोठे वळण येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. मालिका सुरू झाल्यापासून तिला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील जीवा- नंदिनी आणि पार्थ- काव्या या जोड्या प्रेक्षकांना पसंत पडत आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत नेहमी नवनवीन वळणं येतात. सुरुवातीला या दोन जोड्यांची लग्नं त्यांच्या इच्छेविरुद्ध झाली होती, पण नंतर ते एकमेकांना आवडू लागले आणि आता त्यांच्यात जवळीक दिसते आहे.
06 Dec 2025 04:50 PM (IST)
कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे असलेली कमी उंचीच्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहे.25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या नवीन पुलाच्या कामाला गती मिळाली आहे.मात्र या पुलाचे काम मार्च पूर्वी पूर्ण करावे आणि धामोते ते कोदिवले या भागातील खराब रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक रिक्षा चालक यांनी केली आहे.
06 Dec 2025 04:40 PM (IST)
संगमेश्वर तालुक्यातील नारडूवे परिसरात गुरुवारी पहाटे दोन रानगव्यांमध्ये झालेल्या प्राणांतिक झुंजीने जंगल दणाणून गेले. पहाटे सातच्या सुमारास जंगलात मृतावस्थेत पडलेल्या मादी रानगव्याचा शोध लागताच वनविभागात खळबळ उडाली. अधिकारी धाव घेत घटनास्थळी पोहोचले असता झुंजीत उपटलेली माती आणि पसरलेले ठसे पाहून संघर्ष किती भीषण असावा याची स्पष्ट कल्पना येत होती.पाहणीत मादी रानगव्याचा मागील उजवा पाय प्रतिस्पर्धी गव्याच्या शिंगात अडकून फाटल्याचे व ती गंभीररीत्या जखमी झाल्याचे उघड झाले. जिवाच्या आकांतातही सुटता न आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.घटनास्थळीच पशुधन विकास अधिकारी डॉ. कडवई यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदून लाकडांच्या साहाय्याने दहन करण्यात आले.
06 Dec 2025 04:30 PM (IST)
जगभरात कोकणच्या देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांना याच हापूस आब्यांने आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे. मात्र, आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने २०२३ मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशाप्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्यास हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे.
06 Dec 2025 04:20 PM (IST)
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७६१ (बेल्हा ते राळेगण थेरपाळ) च्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि भूसंपादन भरपाईतील विलंबामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी निघोज बस स्थानकावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती न सुधारल्याने, त्यांनी रस्त्याचे निकृष्ट काम, शेतीसाठी १०० मीटरवर पाण्याची पाईप सुविधा, प्रत्येक गावात अधिकृत बस थांबा, निघोजमध्ये सर्व्हिस रोड तसेच ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून होणारे उद्धट वर्तन या प्रमुख मागण्यांसह एकूण १४ मागण्या अधिकाऱ्यांपुढे ठेवल्या.अखेरीस, बांधकाम विभाग, भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्याच्या ग्रामस्थांच्या निर्णयानंतर रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. महामार्गाच्या कामातील अनियमितता आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर निघोजसह महामार्ग लगतच्या गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
06 Dec 2025 04:10 PM (IST)
कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यावेळी कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोन सुमारे 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे चिपळूणसह अनेक गावांना 3 महिने पाणीटंचाई जाणवणार आहे. खेर्डी, खडपोली आणि लोटे एमआयडीसीलासुद्धा टंचाईची झळ बसणार आहे. कोयना धरणातून पोफळी येथील वीजनिर्मिती करणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या अप्पर एक आणि दोनला पाणीपुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला गळती लागली आहे. या गळतीमुळे सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे पाणी वाहत आहे. गळती दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोयना सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यानी गेल्या महिन्यात दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. सह्याद्रीच्या डोंगरातील बोगदा सुमारे 300 फूट खोल आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायची होती. त्यामुळे टप्पा एक आणि दोनला होणारा पाणीपुरवठा सुमारे पाच दिवस बंद केला होता. त्यावेळी पोफळी ,फणसवणे, शिरगाव, तळसर, मुंढे या भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता.
06 Dec 2025 04:00 PM (IST)
सिंधुदुर्ग: सावंतवाडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सावंतवाडी येथील ओवळीये जंगल परिसरात रानडुक्कराच्या शिकार मोहिमेदरम्यान एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार सकाळी उघडकीस आली. सचिन सुभाष मर्गज असे मृतकाचे नाव असून तो मूळचा सांगोली येथील रहिवासी आहे. तो वेल्डिंगचा काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो नातेवाईकांकडे गेला होता. चुकीच्या अंदाजातून झाडलेल्या गोळीने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शिकारीला जातांना सिप्रियान डॉन्टस (वय 45, रा. कोलगाव) हा देखील सचिन सोबत होता. या दोघांबरोबर आणखी काही ओळखीचे मित्रही जंगलात गेले होते. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून पोलीस वेगात तपास करत आहे.
06 Dec 2025 03:50 PM (IST)
मुंबई: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr babasaheb ambedkar)राष्ट्राला दिले, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
06 Dec 2025 03:45 PM (IST)
उरण शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूककोंडी आता चिघळत चालली आहे. शहरातील मुख्य चौक, कोटनाका परिसर, सिडको कॉलनी, एस.टी. स्टैंड परिसर या भागांत सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांची मोठी रांग लागते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सिडकोने उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणारा बाह्यवळण मार्ग उभारण्याचे घेतला आहे, मात्र या कामाचा वेग अपेक्षेप्रमाणे नसल्याने प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण होणार की नाही, यावाचत शंका निर्माण झाली आहे.
06 Dec 2025 03:40 PM (IST)
राज्यभरातील प्रार्थमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण करणे सक्तीचे करण्यात आले होते. राज्य शिक्षण प्रशासनाचा हा निर्णय शिक्षकांना मान्य नव्हता कारण याने रुजू शिक्षकांची नोकरी जाण्याचीही मोठी संभाव्यता आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये आधीच तणावाचे वातावरण आहे. त्यांच्या या नाराजीने एका तीव्र आंदोलनाचे रूप घेतले आहे. शुक्रवारी या आंदोलनाचे परिणाम पाहण्याला मिळले आहेत. या दिवशी राज्यभरातील तब्बल ८० हजार शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे शाळा बंद आंदोलन मुंबई, पुणे, कोल्हापूर, जालना, परभणीसह विविध जिल्ह्यांत जिल्हाधिकारी कार्यालयांवर दिसून आले. मुळात, या आंदोलनात मोर्चे, घोषणा आणि निवेदन सादरीकरणाचा धडाका होता.
06 Dec 2025 03:34 PM (IST)
मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारने खाजगी कंपन्यांना रान मोकळे करून दिले आहे. सरकारचे कोणतेही नियंत्रण या कंपन्यांवर राहिलेले नाही. प्रवाशांची लूट सुरु आहे. हवाई वाहतूक मंत्री व मंत्रालय अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती आहे. इंडिगोचा गोंधळ व प्रवाशांना झालेला प्रचंड त्रास हे भाजपा सरकारचा नाकर्तेपणा व अपयशाचे आणखी एक उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
06 Dec 2025 03:20 PM (IST)
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७६१ (बेल्हा ते राळेगण थेरपाळ) च्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि भूसंपादन भरपाईतील विलंबामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी निघोज बस स्थानकावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती न सुधारल्याने, त्यांनी रस्त्याचे निकृष्ट काम, शेतीसाठी १०० मीटरवर पाण्याची पाईप सुविधा, प्रत्येक गावात अधिकृत बस थांबा, निघोजमध्ये सर्व्हिस रोड तसेच ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून होणारे उद्धट वर्तन या प्रमुख मागण्यांसह एकूण १४ मागण्या अधिकाऱ्यांपुढे ठेवल्या. अखेरीस, बांधकाम विभाग, भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्याच्या ग्रामस्थांच्या निर्णयानंतर रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. महामार्गाच्या कामातील अनियमितता आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर निघोजसह महामार्ग लगतच्या गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
06 Dec 2025 03:15 PM (IST)
उरणकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! उरण–नवी मुंबई उपनगरी रेल्वेमार्गावर लवकरच दिवसाला तब्बल दहा नवीन फेऱ्या सुरू होणार आहेत. बेलापूर–उरण सहा आणि नेरूळ–उरण चार अशा अतिरिक्त फेऱ्यांना रेल्वे मंत्रालयाची प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. लवकरच याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होणार आहे. याशिवाय तरघर आणि गव्हाण स्थानकांवर थांबे सुरू करण्याचीही शक्यता असून स्थानिक प्रवाशांकडून याचे स्वागत केले जात आहे. उशिरा परतणाऱ्या नागरिकांसाठी रात्रीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणीही जोर धरत आहे. एकूणच, उरण–नवी मुंबई रेल्वेसेवा आणखी मजबूत होणार असून प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.
06 Dec 2025 03:05 PM (IST)
गुजरातचा हापूस दाव्यावर, भाजप मंत्री नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा मागण्या कोणी करू शकत, मागणी करण्यात काही हरकत नाही. आमच्या कोकणातील हापूस आंब्याची बाजू लावून धरण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. केंद्रात खासदार राणेसाहेब आहेत. खासदार सुनील तटकरेसाहेब आहेत. माहितीचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही सगळे ताकदीने आमच्या हापूस आंब्याच्या मागे उभे आहोत, असे नीतेश राणे यांनी म्हटले.
06 Dec 2025 03:00 PM (IST)
मुंबई-गोवा महामार्गावर सरकार आणि ठेकेदाराच्या विरोधात, रायगड-माणगावमध्ये जन आक्रोश समितीने तिरडी यात्रा काढली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने निदर्शनं केली. तिरडीची यात्रा काढत सरकार आणि ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
06 Dec 2025 02:57 PM (IST)
जगभरात कोकणच्या देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांना याच हापूस आब्यांने आर्थिक सुबत्ता मिळवून दिली. मात्र आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं 2023 मध्ये वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी मागणी केली. त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशा प्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्यास हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे.
06 Dec 2025 02:55 PM (IST)
चिपळूण : .रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील आंबा घाटात चक्रीवळणाजवळ शुक्रवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास खाजगी प्रवाशी बस सुमारे 70 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 37 प्रवाशी जखमी झाले असून 8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. मात्र या भीषण अपघातात 1 वर्षाचा चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला असून आंबा घाटात ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय आल्याचे बोल ऐकावयास मिळत आहेत.
06 Dec 2025 02:50 PM (IST)
मान्यतेनुसार, मानव हा पृथ्वीवर एकूण सात वेळा जन्म घेतो. सात जन्म असले तरी प्रत्येक जन्मात तुम्ही मानव रूपातच जन्म घ्याल, याची शाश्वती नाही. आपल्या कर्मानुसार आपला पुढचा जन्म दिला जातो. मग तो प्राण्यांचा जन्म असो, माशाचा किंवा मग मानवाचा... तथापि हा आपला कितवा जन्म आहे किंवा आपण मागील जन्मात नक्की कोण होतो याची माहिती कुणालाही नाही. विज्ञानाकडेही याचे उत्तर नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, ज्योतिषीय तत्त्वांचा वापर करून तुम्ही भूतकाळातील आपल्या जन्मांबद्दल जाणून घेऊ शकता.
06 Dec 2025 02:45 PM (IST)
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चाहते त्याच्या आगामी “बॅटल ऑफ गलवान” चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. सलमान खानचा हा चित्रपट त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही, परंतु अपडेट्स येत राहतात. “बॅटल ऑफ गलवान” चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान खान अभिनेत्री चित्रांगदा सिंगसोबत दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांची उत्सुकता द्विगुणीत झाली आहे.
06 Dec 2025 02:40 PM (IST)
२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या महिन्यात लहान मुलांसह कुटुंबातील इतर सदस्यांना सुट्ट्या असतात. सुट्टीच्या दिवशी घरी सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सगळेच बाहेर फिरायला जातात. बाहेर फिरायला गेल्यामुळे मानसिक तणावापासून सुटका मिळते आणि खूप जास्त फ्रेश वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वर्षाच्या शेवटी भारतातील कोणत्या ठिकाणी तुम्ही फिरण्याचा मनोसक्त फिरण्याचा आनंद घेऊ शकता, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. भारतातील ही ठिकाणी नैसर्गिक आणि सांस्कृतिक सौंदर्यामुळे खूप प्रसिद्ध आहेत.
06 Dec 2025 02:35 PM (IST)
भारत आणि रशियाच्या मैत्रीने सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी भारताचा दौरा केला. यावेळी पुतिन यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातही खास बैठक झाली. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत भारत आणि रशिया संबंधाला अधिक बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत. याचा दोन्ही देशांच्या नागरिकांना अधिक फायदा होणार आहे. आज आपण दोन्ही देशांतील सात महत्त्वपूर्ण करारांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
06 Dec 2025 02:30 PM (IST)
अलिकडच्या वर्षांत तुर्कीये (Turkey) आणि पाकिस्तानमधील संरक्षण सहकार्य मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अंकाराने पाकिस्तानच्या (Pakistan) हवाई दलाला आधुनिक करण्यासाठी त्यांच्या एफ-१६ (F-16) लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण (Modernisation) केले आहे, आणि आता तुर्कीये पाकिस्तानमध्ये एक मोठी औद्योगिक सुविधा उभारण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे प्रादेशिक संरक्षण समतोलावर थेट परिणाम होऊ शकतो.
06 Dec 2025 02:25 PM (IST)
१५ डिसेंबर रोजी दुसरा अॅडव्हान्स टॅक्स हप्ता जवळ येत असताना, फ्रीलांसर, गुंतवणूकदार आणि लहान व्यवसाय मालक यांसारख्या अनियमित उत्पन्न असलेल्या करदात्यांना अॅडव्हान्स टॅक्स भरायचा की नाही आणि त्यांनी किती रक्कम जमा करायची हे ठरवणे कठीण होत आहे. पगारदार व्यक्तींचे कर दरमहा टीडीएसद्वारे कापले जातात, परंतु अनियमित उत्पन्न असलेल्यांना व्याज आणि मोठ्या प्रमाणात एकरकमी देयके टाळण्यासाठी वर्षाच्या मध्यात संपूर्ण गणना करावी लागते.
06 Dec 2025 02:20 PM (IST)
रणवीर सिंगचा “धुरंधर” चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. दमदार ओपनिंगसह “धुरंधर” या वर्षीच्या सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. प्रेक्षकही सोशल मीडियावर या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. कलाकारांच्या अभिनयापासून ते चित्रपटाच्या अॅक्शन सीन्सपर्यंत सर्व गोष्टींचे कौतुक केले जात आहे. “धुरंधर” ने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे.
06 Dec 2025 02:15 PM (IST)
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे तीन अल्पवयीन मुली अचानक रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
टेक्निकल क्लासला जातो म्हणत त्यांनी घर सोडलं. शेवटच्या या तिन्ही मुली बस स्थानकात दिसल्या. त्यानंतर त्या कोठेही दिसल्या नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पोलिसांना या तिन्ही मुलीना शोधण्याचं आवाहन असणार आहे.
06 Dec 2025 02:10 PM (IST)
टेक कंपनी Poco चा नवीन स्मार्टफोन Poco C85 5G लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट 9 डिसेंबर आहे. लाँचपूर्वीच या स्मनार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत. स्मार्टफोन कंपनीने आगामी डिव्हाईसचा डिस्प्ले, रेजोल्यूशन आणि रिफ्रेश रेट याबाबत आधीच माहिती देण्यात आली आहे. अपकमिंग हँडसेटसाठी एक खास माइक्रोसाईट देखील लाईव्ह झाली आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. टिझरवरून असा अंदाज लावला जात आहे की, याची जाची 7.99mm आहे. Poco C85 5G मध्ये 6,000mAh बॅटरी असल्याचा दावा केला जात आहे.
06 Dec 2025 02:04 PM (IST)
फ्रान्सच्या (France) परदेशी प्रदेश असलेल्या ग्वाडेलूपमध्ये ख्रिसमसच्या तयारीचे आनंदी आणि उत्साहाचे वातावरण एका क्षणात भीषण शोकात बदलले. सेंट-अॅन येथील प्रसिद्ध शोएलचर स्क्वेअरवर ही अत्यंत दुःखद घटना घडली. ख्रिसमसच्या कार्यक्रमांची तयारी सुरू असताना, अचानक एका भरधाव कारने नियंत्रण गमावले आणि ती थेट उत्सवासाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीत घुसली. या हृदयद्रावक अपघातात किमान १० निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून, १९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
06 Dec 2025 01:55 PM (IST)
नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. पण दुसरीकडे तपोवनाील वृक्षतोडीवर मिळत असतानाच तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना, सेलिब्रिटी तसेच विविध राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे.
06 Dec 2025 01:45 PM (IST)
कीव/मॉस्को : नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) भारताच्या दोन दिवसीय दौरा संपवून रशियाला परतले आहेत. त्यांच्या परतताच अमेरिकेन रशिया युक्रेन युद्धावर (Russia Ukraine War) हालचाली सुरु केल्या आहेत. अमेरिकेने रशिया युक्रेन युद्धावर चर्चा सुरु झाली असून पुतिनसमोर शांततेसाठी काही नव्या अटी ठेवण्यात आल्या आहेत.
06 Dec 2025 01:35 PM (IST)
कोल्हापूरमधील सजग व सामाजिक जाणीव असलेल्या लोकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमुळे प्रशासनाने कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहेत. याबाबत कौतुक करत प्रशासनाने रस्ते दुरुस्त करण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे, असा उल्लेख कोल्हापूर उच्च न्यायालयातील न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. अजित कडेठाणकर यांनी सुनावणी दरम्यान केला. कोल्हापूर शहरातील रस्ते गेली अनेक वर्षे खराब होत चालले आहेत. परंतु रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करणारी याचिका उदय नारकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. अनिल माने, भारती पोवार,अॅड. सुनीता जाधव, डॉ. तेजस्विनी देसाई यांनी अॅड. असीम सरोदे व सहकारी वकील अॅड. श्रीया आवले, अॅड. योगश सावंत आणिअॅड. सिद्धी दिवाण यांच्या मार्फत दाखल केली आहे.
06 Dec 2025 01:25 PM (IST)
रणवीर सिंगचा “धुरंधर” चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. दमदार ओपनिंगसह “धुरंधर” या वर्षीच्या सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. प्रेक्षकही सोशल मीडियावर या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. कलाकारांच्या अभिनयापासून ते चित्रपटाच्या अॅक्शन सीन्सपर्यंत सर्व गोष्टींचे कौतुक केले जात आहे. “धुरंधर” ने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे.
06 Dec 2025 01:15 PM (IST)
भारताच्या संघासमोर सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये आज जिंकणे गरजेचे आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आणि विजय मिळवून मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता हा तिसरा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ मालिका जिंकणार आहे. त्याआधी मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये देखील टॅास महत्वाचा आहे.
06 Dec 2025 01:05 PM (IST)
२३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेमध्ये दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना एका नव्या उंचीवर नेले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत करताना, दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध ऐतिहासिक टप्पे गाठत असल्याचे नमूद केले. रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या चर्चेला ‘विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी’साठी अत्यंत उपयुक्त असल्याचे पुतिन यांनी सांगितले.
06 Dec 2025 01:00 PM (IST)
बारामती औद्योगिक वसाहत येथील (Baramati) कंपनीत निघालेल्या महिलेच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावून ,तिला धारदार शस्त्राचा धाक दाखवत दोघांनी तिच्याकडील ३ लाख ७० हजार रुपयांचे ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटून (Crime) पळ काढला. ही घटना मंगळवारी (दि. २) दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास वंजारवाडी पुलाजवळ घडली.
06 Dec 2025 12:50 PM (IST)
नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजाऱ्याचे घर फोडून सोन्याचा ऐवज चोरी करणाऱ्या एका चोरट्याला फुरसूंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, शेजाऱ्याचेच घर फोडल्याने तसेच नर्तकीसाठी चोर झाल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेले ६ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पाच तोळ्याचे दागिणे जप्त करण्यात आले होते. त्याने हे दागिणे एका सोनाराकडे विक्री केले होते.
06 Dec 2025 12:40 PM (IST)
‘तू माझ्या विरोधात इन्स्टाग्रामवर स्टोरी का लावतो?’ असा जाब विचारत धारदार शस्त्राने मानेवर वार करून जखमी केले. तसेच मध्यस्थी करणाऱ्यावर सुद्धा वार करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि.४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रांजणगाव येथे घडली.
06 Dec 2025 12:35 PM (IST)
पैसे न दिल्यास पीडितेला मारहाण करत होता. कामाबाबत साधी विचारणा केली तरी शिवीगाळ, अपमान करत होता. पीडितेच्या सासू व दीर राहुल मोरे यांनीही घरगुती किरकोळ कारणांवरून तिला शिवीगाळ करून अपमानित केल्याचे नमूद आहे.
06 Dec 2025 12:30 PM (IST)
नवी मुंबईत सायबर फसवणुकीत पर्यावरण सल्लागार सुरज यादव यांना फॉरेक्स गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ₹56.27 लाखांचा गंडा. फेसबुक-व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे विश्वास संपादन, बनावट नफा दाखवला. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु.
06 Dec 2025 12:25 PM (IST)
अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये नर्तिका दीपाली पाटील (35) हिने साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड लग्नासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आलं आहे. पोलिसांनी माजी नगरसेवकाला केले अटक.
06 Dec 2025 12:20 PM (IST)
मुंबईत वेब सीरिज-चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून तरुणींची फसवणूक. फेक निर्माता बनून आरोपीने पैसे व खाजगी फोटो घेत ब्लॅकमेल केलं. विकास बहल यांच्या नावाने बनावट अकाउंट वापरलं. खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू
06 Dec 2025 12:15 PM (IST)
पातूर, अकोला येथे सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या गोपाळ पाटखेडे यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत दोन सावकारांनी धमक्या दिल्याचा उल्लेख. पोलिसांनी आरोपी राकेश गांधी व बंटी खरळवर गुन्हा दाखल केला.
06 Dec 2025 12:10 PM (IST)
नागपूरच्या नंदनवन कॉलनीतून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीनेच प्रियकरावर चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याच्या हत्येनंतर प्रेयसीने स्वतःवर देखील वार करून गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे.
06 Dec 2025 12:00 PM (IST)
अॅशेस सिरीज सुरु आहे, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेचा दुसरा सामना सध्या सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. तो फलंदाजीसाठी येताच त्याच्या डोळ्यांखाली काळी पट्टी दिसत होती… हो, तुम्ही ते बरोबर वाचले आहे – हे फॅशन स्टेटमेंट नाही, तर चकाकी आणि फ्लडलाइट्सशी लढण्याची रणनीती आहे! प्रेक्षक आणि कॅमेरे दोघेही स्मिथच्या नवीन शैलीवर लक्ष केंद्रित करत होते.
06 Dec 2025 11:50 AM (IST)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने झिरो-बॅलन्स बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांसाठी मोफत सेवांची व्याप्ती वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने बँकांना या खात्यांना “कनिष्ठ” किंवा “पूरक” पर्याय म्हणून न मानण्याचे निर्देश दिले आहेत, तर त्यांना सामान्य बचत खात्यासारख्याच सेवा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. लेखी किंवा ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, बँकांनी सात दिवसांच्या आत बचत खाते BSBD मध्ये रूपांतरित करावे. पुढील वर्षी १ एप्रिलपासून या सूचना लागू होतील.
06 Dec 2025 11:40 AM (IST)
‘तू माझ्या विरोधात इन्स्टाग्रामवर स्टोरी का लावतो?’ असा जाब विचारत धारदार शस्त्राने मानेवर वार करून जखमी केले. तसेच मध्यस्थी करणाऱ्यावर सुद्धा वार करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि.४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रांजणगाव येथे घडली.
06 Dec 2025 11:30 AM (IST)
काबूल/ इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पुन्हा संघर्षाचा भडका उडाला आहे. दोन्ही देशात चमन सीमेवर भीषण गोळीबार झाला आहे. यामुळे सीमावर्ती भागांमध्ये सध्या घबराट पसरली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (०५ डिसेंबर) रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जोरदार गोळीबारा झाला.
06 Dec 2025 11:20 AM (IST)
जातीवाद, माणसाला माणूस म्हणून जिथे वागणूक मिळत नव्हती त्या अमानुष त्रासाने वेढलेल्या काळोखात एका क्रांतीसूर्याचा उदय झाला. त्याच्या तेजाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचं बळ तर दिलंच, पण हक्क आणि अस्तित्व ही मिळवून दिलं. हा क्रांतीचा सूर्य म्हणजे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर. अमानवी रुढी परंपरांच्या विरोधात लढायचं तर हाती शस्त्र हवं आणि ते शस्त्र होतं शिक्षणाचं, विचारांचं आणि लेखणीचं. या क्रांतीसूर्याने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत संपूर्ण आयुष्य़ समाज हितासाठी वाहिलं . वयाच्या 65 व्या वर्षी या सूर्याचा अस्त झाला आणि दादरच्या शिवाजी पार्कमध्ये डॉ. भिमराव रामजी आंबेडकर हे वादळ अनंतात विलिन झालं. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचे काही व्हिडीओ आज आपल्याला पाहायला मिळत आहेत.आतासारखं त्यावेळी तंत्रज्ञान तितकं विकसित नव्हतं मात्र तरीही महापरिनिर्वाणाचं जे काही फुटेज आपल्याला पाहायला मिळतात ते एकमेव माणसाच्या असाधारण मेहनतीमुळे.