
#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक
Marathi breaking live marathi – कफ सिरप घेतल्याने अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. त्यानंतर कफ सिपरचा मुद्दा चर्चेत आला होता. असे असताना आता अनेक बालमृत्यू आणि कफ सिरपमुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आता कफ सिरप मिळणार नाही. कफ सिरपच्या मनमानी विक्रीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
29 Nov 2025 05:55 PM (IST)
नाशिक शहरातील सुरू असलेल्या झाडतोडीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहून त्यांनी पर्यावरण संरक्षणाबाबत अत्यंत ठाम व तीव्र शब्दांत भूमिका मांडली. शहरातील अनेक भागांमध्ये वृक्षतोडीची प्रक्रिया सुरू असल्याचा नागरिकांनी विरोध व्यक्त केला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिंदे खास नाशिकमध्ये दाखल झाले.“साधू आले–गेले, पण झाडे राहिली पाहिजेत”.सभास्थळी उपस्थित झाल्यावर बोलताना त्यांनी शासनाच्या भूमिकेवर तिखट टीका केली.ते म्हणाले,“साधू आले, गेले, मेले – माहित नाही. पण झाडे राहिली पाहिजेत. झाड म्हणजे काय याची व्याख्याच सरकारने अजून ठरवली नाही. जगात सर्वात जास्त वडांची झाडे याच सरकारने तोडली. हा विनोद नाही, तर दु:ख आहे.”.
29 Nov 2025 05:35 PM (IST)
‘थलाईवा’ रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने गोव्यात झालेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) त्यांचा सन्मान करण्यात आला. रजनीकांत म्हणाले की, जरी त्यांना १०० आयुष्ये दिली तरी ते अभिनेता म्हणून जन्माला येऊ इच्छितात. रजनीकांत म्हणाले की, भारतीय चित्रपटसृष्टीतील पाच दशके… फक्त काही वर्षांसारखी वाटतात. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रजनीकांत यांना शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.
29 Nov 2025 05:07 PM (IST)
दुसऱ्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा वास्तविक जीडीपी ८.२% दराने वाढला, सरकारी आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो ५.६% होता. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने ८.२% विकास दर गाठला, जो सहा तिमाहींमधील सर्वाधिक आहे. जीएसटी दरांमध्ये कपात झाल्यामुळे कारखान्यांनी वापर वाढण्याची अपेक्षा ठेवून अधिक उत्पादने तयार केली म्हणून हे घडले. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी (GDP) वाढ मागील तीन महिन्यांतील ७.८% आणि वर्षापूर्वी याच कालावधीत ५.६% वाढीपेक्षा चांगली होती. जीडीपीमध्ये १४% वाटा असलेल्या उत्पादन क्षेत्राने दुसऱ्या तिमाहीत ९.१% वाढ नोंदवली.
29 Nov 2025 04:55 PM (IST)
डोंबिवलीतील गणेश नगर स्टार कॉलनी परिसरात पाणीटंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. वारंवार तक्रारी करूनही KDMC अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तातडीने पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी या महिलांसह नागरिकांनी केली आहे.
29 Nov 2025 04:50 PM (IST)
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राजकीय चर्चा आणखी तीव्र झाली आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विरोधात 1000 कोटी रुपयांची जमीन हडपल्याचा आरोप करणारे राम खाडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. अशातच वकील असीम सरोदे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. “हे प्रकरण माझ्याकडे होते. काही दिवसांपूर्वीच मी राम खाडे यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. आता माझ्याही जीवाला सुरेश धस यांच्या लोकांकडून धोका आहे,” असा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.
29 Nov 2025 04:45 PM (IST)
केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोकरी गमावल्यानंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक अनिश्चितता, मानसिक ताण आणि भविष्याबद्दलच्या चिंतांनी ग्रासले जाते हे अनेकदा दिसून येते. अनेकदा कंपन्यांकडून होणाऱ्या विलंब आणि मनमानीमुळे पूर्ण आणि अंतिम तोडगा निघण्यास महिने लागतात. परंतु ही परिस्थिती बदलणार आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन कामगार संहितेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, ज्यामुळे नोकरी गेल्यानंतरही उत्पन्नाची हमी कायम राहील.
29 Nov 2025 04:40 PM (IST)
संगमनेर विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदारांनी काँग्रेसला संपूर्णपणे हद्दपार केले असून, आता ती संपूर्ण देशातही कुठे दिसत नाही. “तुम्ही तर पंजाही नष्ट केला आहे. आता पंजा शोधण्यासाठी मेणबत्ती लावावी लागेल. ४० वर्षांची सत्ता थंड झाली आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. हे परीवर्तन आता विकासकामांच्या रूपात दिसले पाहिजे, असा विश्वास त्यांनी संगमनेरकरांना दिला. नगर विकास विभाग माझ्याकडे असल्यामुळे संगमनेर शहराच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, असेही शिंदे यांनी जाहीर केले. महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ तसेच इतर ३० नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ नवीन नगर रोड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
29 Nov 2025 04:35 PM (IST)
चार वर्षापूर्वी ओडिशातून आलेल्या जंगली हत्तींनी जिल्हावासींना हैराण करून सोडले होते. हत्ती कधी दक्षिण गडचिरोली तर कधी मध्य व उत्तर गडचिरोलीत फेरफटका मारत आहेत. यासोबतच गडचिरोली वनवृत्ताच्या पाचही वनविभागांत वाघांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. क्वचितप्रसंगी वाघाचे दर्शन होणाऱ्या भागात ‘पगमार्क’ दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
29 Nov 2025 04:30 PM (IST)
मुरुडच्या दत्तमंदिर सुशोभीकरणाचे काम अपूर्ण असून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेकापचे ॲड मनिष माळी यांनी केला आहे. या निमित्ताने निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उपकंत्राटदारांना निवडून का द्यायचं याचा विचार जनतेने करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
29 Nov 2025 04:25 PM (IST)
डोंबिवलीतील गणेश नगर स्टार कॉलनी परिसरात पाणीटंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. वारंवार तक्रारी करूनही KDMC अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तातडीने पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी या महिलांसह नागरिकांनी केली आहे.
29 Nov 2025 04:20 PM (IST)
चिपळूण शहरात आलेल्या भकासपणाला दूर करण्यासाठी शहराचा सर्वांगीण विकास करेन असे आश्वासन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांनी दिले आहे .
29 Nov 2025 04:15 PM (IST)
डोंबिवलीतील गणेश नगर स्टार कॉलनी परिसरात पाणीटंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. वारंवार तक्रारी करूनही KDMC अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तातडीने पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी या महिलांसह नागरिकांनी केली आहे.
29 Nov 2025 04:07 PM (IST)
डहाणू नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत होत आहे. दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत डोअर टू डोअर प्रचारास सुरवात केली आहे.
29 Nov 2025 04:06 PM (IST)
रत्नागिरीत वाटप करण्यात येत असलेल्या पत्रकांवर नरेंद्र मोदींचा फोटो नसल्याबाबत विरोधकांनी आरोप केला होता. या आरोपांबाबत बिपिन बंदरकर यांनी आज खुलासा करत ती पत्रके वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
29 Nov 2025 03:55 PM (IST)
सर्वच महिलांना लग्नसमारंभ किंवा घरातील इतर कार्यक्रमांमध्ये सुंदर दिसायचं असतं. साडी नेसल्यानंतर प्रामुख्याने महिला सोन्याचे दागिने घालण्यास जास्त पसंती दर्शवतात. सोन्याचे दागिने कोणत्याही साडीवर उठावदार दिसतात. त्यामुळे लाडक्या लेकीच्या लग्नात सोन्याचे झुमके खरेदी करू शकता. सोन्याचे नाजूक साजूक झुमके कानांची शोभा वाढवतात. पूर्वीच्या काळी झुमके दागिन्यांना खूप जास्त मागणी होतो. जाणून घ्या झुमक्यांच्या काही आकर्षक डिझाईन्स.
29 Nov 2025 03:45 PM (IST)
मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मंत्रा व्हिजनच्या सहकार्याने थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्स प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आकर्षक पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.
पोस्टरकडे पाहाताच दोन वेगवेगळ्या देशात राहाणाऱ्या प्रेमिकांची छायाचित्रे नजरेत भरणारी आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे फोनच्या हावभावातून संवाद साधताना दिसत असून त्या संवादांमागे काय दडलेलं आहे? लाँग डिस्टन्सचं नातं… कधी मनं जुळवणारं तर कधी मन पोखरणारं ? हा प्रश्न पोस्टर पाहाताच मनात घर करतो.
29 Nov 2025 03:30 PM (IST)
पहिली नजर का प्यार आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी झालं असेल पण जेव्हा झालं असेल तेव्हा नक्कीच आपल्याला थोडी तरी अक्कल असेल. चार गोष्टी समजत असतील. आकर्षण काय असतं? प्रेम काय असतं? यामध्ये थोडातरी फरक कळत असेल. आपल्याला पाहिलं प्रेम कदाचित शाळेत असताना होऊन जातं. कदाचित ते निव्वळ आकर्षणही असू शकतं. पण सोशल मीडियावर एक Video तुफान Viral होत आहे. ही Video Viral होण्यामागचे कारणही तसे नवल आहे. कारण काल जन्मलेली पोरं कदाचित त्यांना अजून चालताही येत नसेल ते एकमेकांना पाहून चक्क प्रेमात पडली आहेत. (Viral Video of Two Babies Fall in love on Signal)
29 Nov 2025 03:20 PM (IST)
Putin arrest warrant : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) चार वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर पुन्हा एकदा भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. ४ ते ५ डिसेंबर या कालावधीत होणारी त्यांची भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण या दरम्यान नवी दिल्लीमध्ये भारत–रशिया ( India–Russia Relations) २३वी वार्षिक शिखर परिषद पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औपचारिक निमंत्रणावरून होणारा हा दौरा अलीकडच्या काळात अधिक दृढ झालेल्या द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देणार आहे. व्यापार, संरक्षण, ऊर्जा, कूटनीती आणि भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे जगभरात उत्सुकतेने पाहिले जात आहे.
29 Nov 2025 03:10 PM (IST)
Cyclone Ditwah in Sri Lanka : श्रीलंकेत (Sri Lanka) दित्वाह चक्रीवादळाने प्रचंड विध्वंस घडवून आणला आहे. या वादळामुळे किमान १०० हून अधिकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. मात्र यामध्ये अडथळा येत आहे. या वादळाचा परिणाम भारतावर देखील होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार सध्या दित्वाह चक्रीवादळामुळे १२३ जणांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहे. यामुळे अनेक हवाई सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तसेच श्रीलंकेच्या कोलंबो विमानतळावरही दूबईहून श्रीलंकेमार्गे येणारे विमान अडकले आहे. यामुळे जवळपास ३०० भारतीय प्रवासी गेल्या तीन दिवसांपासून कोलंबो विमानतळावरच आहेत. याशिवाय चेन्नईला जाणारी अनेक विमाने देखील रद्द करण्यात आली आहे. याच वेळी प्रवाशांनी आरोप केला आहे की, त्यांना पुरेसे अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधा मिळालेली नाही.
29 Nov 2025 02:55 PM (IST)
नांदेड मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबियांना तिच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. या रागातून तिच्या वडील आणि भावाने तिच्या प्रियकराची हत्या केली. हत्येनंतर प्रेयसीने त्याच्या मृतदेहासोबत विवाह केल्याची घटना नांदेड येथे घडली आहे.ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सक्षम ताटे (20 वर्षे, रा. मच्छी मार्केट) असे आहे. तर प्रेयसीचे नाव आंचल मामिडवार असे आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिने या व्हिडिओमध्ये अत्यंत हृदयद्रावक प्रतिक्रिया दिली आहे.
29 Nov 2025 02:50 PM (IST)
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाणचा 29 नोव्हेंबरला लग्नसोहळा पार पडणार आहे. पुण्यातील सासवड येथील माऊली गार्डन हॉलमध्ये त्याच्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आता सूरजच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली आहे. नुकताच सूरज आणि संजनाचा मेहंदी सोहळा पार पडला. लग्नापूर्वी काल सुरजची हळद झाली, त्यामध्ये त्याने धमाकेदार डान्स केला. बिग बॉस मराठीच्या घरात त्याच्यासोबत असलेल्या टीम मेंबरनेही हळदीला हजेरी लावत तूफान डान्स केला आहे. सुरज आणि जान्हवीचा तुफान डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. .जान्हवी किल्लेकर ही काल सुरजच्या हळदीसाठी आली होती. सुरजच्या हळदीत जान्हवी गुलाबी ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.
29 Nov 2025 02:40 PM (IST)
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागतात. त्यामुळे थंडीत आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. थंड वातावरणांमुळे मूत्रविकार होण्याची जास्त शक्यता असते. कारण कमी पाण्याच्या सेवनामुळे किडनीवर जास्त तणाव येतो, यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे किडनी स्टोन, किडनी खराब होणे किंवा किडनी कॅन्सरचा धोका वाढतो. जीवनशैलीत केलेल्या चुकांमुळे संपूर्ण आरोग्याचे गंभीर नुकसान होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आहारात उष्ण पदार्थांचा सेवन करण्यासोबतच भरपूर पाणी प्यावे.
29 Nov 2025 02:30 PM (IST)
जगभरातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या एअरबस A320 विमानांमध्ये मोठी तांत्रिक त्रुटी आढळल्याने विमान उद्योगात एकच खळबळ उडाली आहे. उड्डाण नियंत्रण प्रणालींवर सौर किरणोत्सर्गाचा थेट आणि गंभीर परिणाम होऊ शकतो, असे निष्पन्न झाल्यानंतर एअरबसने तत्काळ जागतिक पातळीवर ६,००० हून अधिक विमानांसाठी सॉफ्टवेअर अपडेट आणि आवश्यक असल्यास हार्डवेअर बदलण्याचे आदेश दिले आहेत. एअरबसच्या ५५ वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा तांत्रिक रिकॉल मानला जात आहे, ज्याचा थेट परिणाम जगभरातील उड्डाणांच्या वेळापत्रकांवर होत आहे.
29 Nov 2025 02:20 PM (IST)
अमेरिकेच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कागदपंत्रांवर ‘ऑटोपेन’ मशीनद्वारे स्वाक्षरी केली आहे. यामुळे ट्रम्प यांनी बायडेन यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांच्या दस्तऐवजांना अवैध घोषित केले आहेत. तसेच सर्व निर्णय रद्द करण्याची घोषणा केली आहे. आज आपण हे ऑटोपेन नेमकं काय आहे आणि त्यामुळे अमेरिकेत इतका गोंधळ का उडाला आहे. तसेच यापूर्वी कोणत्या अध्यक्षांनी याचा वापर केला होता हे जाणून घेणार आहोत.
29 Nov 2025 02:15 PM (IST)
धनु राशीला ज्योतिषशास्त्रात नशीब, उत्साह आणि शहाणपणाचे प्रतीक मानले जाते. ही राशी अग्नि तत्वाखाली येते आणि त्यावर गुरु ग्रहाचे राज्य असते, जो विस्तार, समृद्धी आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करतो. गुरु राशीच्या प्रभावामुळे ते नैतिक, आशावादी आणि नेतृत्वगुणांनी युक्त होतात. रत्नशास्त्रानुसार धनु राशीचे लोक स्वभावाने मोकळ्या मनाचे, धाडसी आणि आत्मविश्वासू असतात. धनु राशीमुळे जीवनात उत्साह आणि सकारात्मकतेची भावना निर्माण होते. धनु राशीचे लोक नेहमीच ज्ञानाच्या शोधात असतात आणि नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक असतात. त्यांच्या जीवनात अध्यात्माची खूप मोठी भूमिका असते. योग्य रत्ने त्यांच्या जीवनात संतुलन, यश आणि सौभाग्य वाढविण्यास मदत करतात.
29 Nov 2025 02:10 PM (IST)
आयपीएल 2026 चे चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे, अनेक रिटेन खेळाडू मालामाल झाले आहेत तर काही खेळाडू हे ट्रेड करण्यात आले आहेत. आरसीबीने आयपीएल 2025 मध्ये बाजी मारली पण त्यानंतर त्याच्यासाठी हे वर्ष फार काही चांगले राहिले नाही. त्यांना चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले. सोशल मिडियावर यासंदर्भात मोठी चर्चा देखील पाहायला मिळाली होती. रिटेंशन झालेल्या खेळाडूंमध्ये आता संजू सॅमसन याने त्याचा जुना संघ राजस्थान राॅयल्सचा संघ सोडला आहे.
29 Nov 2025 02:05 PM (IST)
गेल्या काही काळापासून तब्येतीच्या कारणास्तव सार्वजनिक जीवनापासून दूर राहिलेले राज्यसभा खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत लवकरच राजकारणात परतणार आहेत. ठाकरे गटाची तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत जवळजवळ महिनाभरापासून पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये, बैठकांमध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता ते लवकरच सक्रीय राजकारणात दिसून येणार आहेत.
29 Nov 2025 01:55 PM (IST)
टीईटी परीक्षा रद्द करावी, संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, शिक्षण सेवक पद रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
29 Nov 2025 01:42 PM (IST)
बँक एफडी हे तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. बँक एफडीवरील व्याज भरीव उत्पन्न मिळवू शकते. तथापि, कोणती बँक सर्वोत्तम व्याजदर देते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बँका वेळोवेळी व्याजदर बदलतात आणि तरलता यावर आधारित व्याजदर बदलतात, म्हणून अचूक माहिती महत्त्वाची आहे. या वर्षी, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि लघु वित्त बँका लक्षणीयरीत्या वेगवेगळे व्याजदर देत आहेत. जर तुम्ही एफडी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगले परतावा मिळविण्यात मदत करण्यासाठी यांवर एक नजर टाकूया.
29 Nov 2025 01:35 PM (IST)
अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रामवर त्याची पत्नी लिन लैशरामसोबतचा एक फोटो शेअर केला.रणदीप हुड्डाच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. त्याच्या लग्नाची खूप चर्चा आहे. मूळचा हरियाणाचा रहिवासी असलेल्या रणदीपने मणिपूरमध्ये स्थानिक रितीरिवाजांनुसार लग्न केले, ज्यामुळे त्याचे लग्न चर्चेत आले. आता, त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. . पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने खुलासा केला की ते लवकरच पालक होणार आहेत.
29 Nov 2025 01:28 PM (IST)
अमेरिकन राजकारणात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इल्हान उमर यांच्यातील संघर्ष नवा नाही, परंतु व्हाईट हाऊसजवळ (White House) नॅशनल गार्डवर झालेल्या अलीकडील हल्ल्यानंतर या वादात पुन्हा उग्रपणा वाढला आहे. ट्रम्प यांनी या घटनेचा संदर्भ देत इमिग्रेशनच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आणि त्याच व्यासपीठावरून त्यांनी डेमोक्रॅटिक काँग्रेसवुमन इल्हान उमरवर थेट प्रहार केला. ट्रुथसोशलवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इल्हानला “हिजाब घालून अमेरिकेत फिरणारी बेकायदेशीर स्थलांतरित” अशी उपहासात्मक व अचूकतेपासून दूर असलेली टिप्पणी केली.
29 Nov 2025 01:15 PM (IST)
भारताच्या रईसंपत्तीच्या जगात Reliance Industries चा मुकेश अंबानी किंवा Adani Group चे गौतम अदानी यांचा रेला सर्वांनाच माहित आहे. परंतु, २०२५ च्या Forbes India रिच लिस्टनुसार, भारताची सर्वात श्रीमंत महिला म्हणजे Savitri Jindal आहेत. तिची संपत्ती अंदाजे $39.6 अब्ज आहे, म्हणजेच अनेक पुरुष अरबपतिंनाही मागे टाकणारी.फोर्ब्सच्या नव्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून सावित्री जिंदाल यांचे नाव पुन्हा एकदा शीर्षस्थानी आले. जिंदाल समूहाच्या विस्तारामुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध व्यवसायांमधील मोठ्या गुंतवणुकीमुळे त्यांची संपत्ती झपाट्याने वाढली आहे.
29 Nov 2025 01:05 PM (IST)
महिला प्रिमियर लीग 2026 चे मेगा ऑक्शन पार पडले यामध्ये करोडोंची बोली भारतीय आणि विदेशी खेळाडूंवर लावण्यात आली. अनेक संघाचे नवे कर्णधार या नव्या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर अनेक खेळाडूंचे संघ देखील बदललेले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२६ च्या महिला प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धेचा चौथा हंगाम नवी मुंबई आणि वडोदरा येथे होणार आहे.
29 Nov 2025 12:50 PM (IST)
पुणे शहरातील बंद घरांमध्ये चोरट्यांच्या घरफोडींचा सिलसिला सुरु आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये कोथरूड, बाणेर आणि हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घरांमधून लाखो रुपयांचे ऐवज चोरीला गेले आहेत. कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीत एका सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपट केले. या प्रकरणी ३८ वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
29 Nov 2025 12:40 PM (IST)
दिल्लीमध्ये 24 वर्षीय सलमानने 65 वर्षीय महिलेची हत्या करून मृतदेहावर अत्याचार केला. आरोपीवर याआधीही अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.
29 Nov 2025 12:30 PM (IST)
अंधेरीत 22 वर्षीय विद्यार्थिनीला कोल्ड ड्रिंक मधून गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करून दोन पुरुषांनी सामूहिक अत्याचार केला. स्ट्रगलिंग मॉडेल सुषमा राव अटकेत. दोन आरोपी फरार. पोलिस तांत्रिक पुराव्यावरून शोध घेत आहेत.
29 Nov 2025 12:20 PM (IST)
पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाने अपयशाच्या तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या युवकाने खोलीत आतून दरवाजा बंद केला होता. सुसाइड नोट न सापडल्याने पोलिस तपास सुरू आहे.
29 Nov 2025 12:10 PM (IST)
पुण्यात येरवडा परिसरातील अवैध धंद्यांचे व्हिडीओ व्हायरल; वृद्ध व्यक्ती झोपून गांजा विकताना दिसला. मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, दारू विक्री उघडपणे सुरू. नागरीकांचा प्रश्न—पुणे पोलिस नक्की काय करत आहेत?
29 Nov 2025 12:02 PM (IST)
Oppo Find X9: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला Oppo Find X9 स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच करण्यात आली होती. यावेळी कंपनीने Oppo Find X9 स्मार्टफोन भारतात दोन रंगात लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन भारतात एका नवीन रंगात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन रंग यूजर्सना अतिशय आकर्षक आणि फ्रेश वाटत आहे. आतापर्यंत हा स्मार्टफोन स्पेस ब्लॅक आणि टाइटेनियम ग्रे या रंगात खरेदीसाठी उपलब्ध होता. आता यामध्ये आणखी एका नवीन कलर व्हेरिअंटचा समावेश झाला आहे. Oppo Find X9 स्मार्टफोनमध्ये हॅसलब्लॅड-ट्यून्ड रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये तीन 50-मेगापिक्सेल सेंसर आणि एक 32-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे.
29 Nov 2025 11:52 AM (IST)
क्रिकेटमध्ये प्रत्येक विजय महत्त्वाचा असतो. जर एखादा संघ विजयाच्या अगदी जवळ असेल आणि पंच अचानक सामना सोडून देण्याचा निर्णय घेतात, तर सोशल मीडियावर गोंधळ उडेल हे निश्चित आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी महिला बिग बॅश लीगमध्येही असेच काहीसे घडले. सिडनी थंडर आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात अॅडलेडमध्ये सामना खेळला गेला. थंडरला १३ चेंडू शिल्लक असताना जिंकण्यासाठी फक्त तीन धावांची आवश्यकता होती. पंचांनी वादग्रस्त निर्णय घेतला आणि सामना सोडून दिला, ज्यामुळे खेळाडू स्तब्ध झाले.
29 Nov 2025 11:42 AM (IST)
पुणे येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली नसून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत आलेल्या अपयशामुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
29 Nov 2025 11:32 AM (IST)
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने गुरुवारी रात्री अल-फलाह विद्यापीठातील डॉ. शाहीन शाहिद यांच्या वसतिगृहाच्या खोलीची झडती घेतली. झडतीदरम्यान, एनआयएला ₹१.८ दशलक्ष रोख रक्कम जप्त करण्यात आली. खोली क्रमांक २२ मधील कपाटात सापडलेल्या या मोठ्या रकमेमुळे असा संशय निर्माण झाला आहे की हे पैसे विद्यापीठातून कार्यरत असलेल्या “व्हाइट-कॉलर दहशतवादी मॉड्युल” ला निधी देण्यासाठी वापरले गेले असावेत.
१० नोव्हेंबर रोजी झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटातील भूमिकेसाठी डॉ. शाहीन शाहिद यांना अटक करण्यात आली. एनआयटी परिसरातील एका दुकानाची ओळख पटल्यानंतर शाहीनला विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आणण्यात आले, जिथे स्फोटके बनवण्यासाठी रसायने खरेदी करण्यात आली होती.
29 Nov 2025 11:22 AM (IST)
बिग बॉस १९ : ‘बिग बॉस १९’ हा शो लवकरच अंतिम फेरीच्या जवळ येत आहे. प्रत्येकाचे मन विजेत्यासाठी धावत आहे. चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना ट्रॉफी घरी घेऊन जाताना पाहू इच्छितात. अंतिम आठवडा सुरू होणार आहे आणि घरात आठ स्पर्धक आहेत. लवकरच तीन स्पर्धक घरातून बाहेर पडतील, कारण फक्त पाच जण अंतिम आठवड्यात पोहोचतील. दरम्यान, एका बलाढ्य स्पर्धकाला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. चाहत्यांनी या स्पर्धकाच्या बाहेर काढण्याचे समर्थन केले आहे. चला जाणून घेऊया ते कोण आहेत.
29 Nov 2025 10:59 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी पुन्हा एकदा राजकीय वादाचा ज्वालामुखी पेटवला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe biden) यांच्या कार्यकाळात जारी केलेल्या कागदपत्रांवर ‘ऑटोपेन’ मशीनद्वारे स्वाक्षरी केल्याचा गंभीर आरोप करत ट्रम्प यांनी या सर्व दस्तऐवजांना अवैध घोषित करण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार बायडेन यांच्या अंदाजे ९२% आदेश आणि अधिकृत दस्तऐवजांवर त्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीऐवजी मशीन-जनरेटेड स्वाक्षरीचा वापर केला, ज्यामुळे राष्ट्राध्यक्षीय अधिकाराचा गैरवापर झाला आणि प्रशासनिक पारदर्शकतेवर गंभीर गोंधळ निर्माण झाला.
29 Nov 2025 10:51 AM (IST)
भारताच्या अंडर 19 युवा संघ आता आशिया कप 2025 खेळणार आहे, या संघाचे कर्णधारपद हे आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आले आहे. त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नवा विक्रम त्याच्या नावावर केला आहे. मुंबईच्या आयुष म्हात्रेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विदर्भाविरुद्ध ४९ चेंडूत धमाकेदार शतक ठोकून इतिहास रचला. टी-२० क्रिकेटमधील हे त्याचे पहिले शतक होते. यासह आयुष म्हात्रे व्यावसायिक क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात – प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी-२० – शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
29 Nov 2025 10:43 AM (IST)
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील एका विशेष न्यायालयाने चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार (FEO) घोषित करण्याची कार्यवाही रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. चोक्सीने त्याच्या वकिलांद्वारे सांगितले की तो बेल्जियममध्ये कोठडीत आहे आणि भारताच्या विनंतीवरून त्याला अटक करण्यात आली आहे. म्हणून, बेल्जियममधील त्याची कोठडी “रचनात्मक कोठडी” मानली पाहिजे.
29 Nov 2025 10:36 AM (IST)
दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने आधी ६५ वर्षीय वृद्ध महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने याआधीही एका अल्पवयीन मुलीवर आत्यार केल्याचे समोर आले आहे. १६ नोव्हेंबरला जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. तेव्हा या क्रूर घटनेचा उलगडा झाला.
29 Nov 2025 10:28 AM (IST)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव राजेशकुमार मीना हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. आता त्यांच्याजागी राजेश अग्रवाल हे असणार आहेत. अग्रवाल हे राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी मीना यांच्याकडून स्वीकारणार आहेत. १ डिसेंबरपासून राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अग्रवाल यांचा कार्यकाळ १५ महिन्यांचा असणार आहे.
29 Nov 2025 10:19 AM (IST)
काही तासांमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेमध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल या जखमी झाला होता. त्यामुळे तो आता एकदिवसीय मालिकेमधून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या दुखापतीतून पुनरागमनाबद्दल सकारात्मक अपडेट्स दिले.
29 Nov 2025 10:11 AM (IST)
देशातील अनेक राज्यांत महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यात अनेक राज्य सरकारांनी पुन्हा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महिला मतदारांना आर्थिक लाभ देण्याच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांमुळे पुन्हा अनेक सरकारे सतारूढ झालीत. या योजना ‘गेम चेंजर’ ठरत असल्या तरी, त्यांचा मोठा भार राज्यांच्या तिजोरीवर पडत आहे.