अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतातील एका स्टेडियममध्ये ८० हजार लोकांसमोर एका आरोपीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अमू न्यूजच्या वृत्तानुसार, ही शिक्षा एका १३ वर्षीय मुलाकडून देण्यात आली. ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, त्याच्यावर त्या मुलाच्या कुटुंबातील १३ सदस्यांची हत्या केल्याचा आरोप होता, ज्यात महिलांचा आणि मुलांचा समावेश होता. घटनाक्रमापूर्वी तालिबान अधिकाऱ्यांनी मुलाला आरोपीला माफ करण्याची संधी दिली, मात्र मुलाने नकार दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला बंदूक देत आरोपीला गोळी घालण्याचे आदेश दिले. ही घटना मानवाधिकारांच्या दृष्टिकोनातून गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

