कोकणचा 'राजा' संकटात (फोटो- टीम नवराष्ट्र)
सरकार कोकण हापूसच्या पूर्णपणे पाठीशी
बैठकीत मांडण्यात आले कोकणातील कृषी प्रश्न
हापूस मानांकनावर उद्भवलेल्या वादाकडे वेधले लक्ष
चिपळूण: नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्यात आलेल्या आश्वासन समितीच्या बैठकीत कोकणच्या अभिमान असलेल्या हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकन प्रकरणावर निर्णायक घडामोडी घडल्या, कृषी मंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, कृषी सचिव विकासचंद्र रसतोगी, आयुक्त सुरज मांढरे, महाबीजचे एमडी बुवनेश्वरी मॅडम आदी अधिकारी उपस्थित होते. कोकण हापूसवरील ‘गुजरात वादावर’ निकम, दरेकर लाड यांनी बैठकीत जोरदार भूमिका मांडली.
सरकार कोकण हापूसच्या पूर्णपणे पाठीशी…
यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी हापूस मानांकनावर उद्भवलेल्या बलसाड (गुजरात) वादाकडे सरकारचे लक्ष वेधले. कोकणातील हापूस आंब्याला २००-३०० वर्षांचा इतिहास आहे त्याचा सुगंध, चव, रंग जगात कुठेही मिळत नाही. शास्त्रीय व कायदेशीर कसोट्यांवर कोकण हापूसच मानांकनाचा खऱ्या अर्थाने हक्कदार आहे, असे ठाम मत त्यांनी मांडले.
Ratnagiri News: कोकणच्या राजावर गुजरातचा दावा? ‘या’ एका निर्णयामुळे आंबाबागायतदारांची चिंता वाढणार
बागायतदारांच्या हिताचे आहेत दोन मोठे निर्णय
दरम्यान या बैठकीत कोकणातील कृषी प्रश्न मांडण्यात आले. यामध्ये आंबा फळपीक विम्याच्या कालावधी वाढवून घेण्यासाही निकम यशस्वी ठरले. बैठकीत आंबा फळपीक विमा योजनेचा कालावधी वाढवण्याबाबतही आमदार निकम यांनी जोरदार पाठपुरावा केला. त्यानंतर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत पुढील वर्षापासून १५ सप्टेंबर ते ३० मे २०२६ असा विस्तारित कालावधी लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. हापूसच्या जिआय मानांकनावर सरकारची ठाम भूमिका व आंबा फळपीक विमा कालावधी वाढवण्याचा निर्णय या दोन्ही घडामोडीमुळे कोकणातील आंबा बागायतदाराच्या हिताचे दोन मोठे निर्णय या बैठकीत नोंदवले गेले आहेत.
पुढील वर्षापासून विस्तारित कालावधी लागू
निकम यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे संपूर्ण कोकणातील बागायतदार व शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. कोकण कृषी विद्यापीठाने मांडलेली भूमिका सरकारने ठामपणे मांडावी, अशी त्यांनी मागणी केली. आमदार निकम यांच्या मुद्द्यांना प्रतिसाद देताना कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट आश्वासन देताना, कोकण हापूसच भौगोलिक मानांकनाचा खरा हक्कदार आहे. सरकार कोकण हापूसव्या पाठीशी ठाम उभे राहील, या भूमिकेमुळे कोकणातील शेतकरी व बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.






