जितेंद्र आव्हाड यांचे संजय राऊत यांच्यावर भाष्य (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत, भारत – पकिस्तान सबंध, विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांच्यावरील ट्रोलिंग, युद्धबंदी, शेतकऱ्यांचे नुकसान यांसह अनेक विषयांवर भाष्य केले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. यावर देशाच्या नागरिकांना चर्चेच्या माध्यमातून वास्तव कळायला पाहिजे, असे आव्हाड म्हणाले.
पुढे बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांना ट्रोल केले जात आहे. मात्र सर्वसामाने नागरिक त्यांच्यासोबत उभे आहेत. ट्रोलर्स विक्रम मिस्त्रीच नाही तर त्यांच्या मुलीपर्यंत गेलेत. हा विचित्र आणि विकृत प्रकार आहे. भारताची भूमिका योग्यरित्या मांडण्याच काम विक्रम मिस्त्री यांनी केलं आहे. ”
जितेंद्र आव्हाड यांचा अंतदारसंघ असलेल्या मुंब्रामध्ये अनेक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र हा फटका मला असून भाजपला असणार आहे. नगरसेवकांना किती पैसे दिले याबाबत चर्चा खूप आहे. पण यावर मी काही बोलणार नाही.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “संजय राऊत मोठे कार्यकर्ते आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत. शरद पवार यांचे राजकारण हे संस्थात्मक प्रकारचे आहे. गोपीनाथ मुंडे असताना सकाळी शरद पवार टीका करायचे . पण संध्याकाळी ऊसतोड कामगारांसाठी हेच नेते एकत्र बसून चर्चा करायचे आणि त्यावर उपाय देखील काढायचे. शरद पवार संस्था जिवंत ठेवण्यासाठी आपले राजकीय मतभेद नेहमी बाजूला ठेवतात.”
भारत-पाकिस्तान संबंधांवर बच्चू कडूंचे मोठे विधान
प्रहार पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, ” पाकिस्तान नेहमीचे दुखणे आहे ते बंद केले पाहिजे. एकसारखे पाकिस्तान आपल्या कुरापती काढत असतो. जसे इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा केला, तसाच आपण पाकिस्तान भारतात घ्यावा. त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील, तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू तयार आहेच. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित येण्यावरून बोलताना बच्चू कडू म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्रित आल्या तरी जनतेचे काय भले होणार आहे. राष्ट्रवादी कधी वेगळी होती? पवार साहेब आणि अजित दादा हे वेगळे होते हे शक्य आहे का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच होत्या.”
Bacchu Kadu: “सैनिक कमी पडत असतील, तर…”; भारत-पाकिस्तान संबंधांवर बच्चू कडूंचे मोठे विधान
लाडकी बहीण योजना
महायुती सरकारच्या महत्वाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बच्चू कडू बोलले आहेत. निवडणुकीत लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार आहे असे सांगितले मात्र अजून हे १,५०० वरच अडकले आहेत. सरकारला लाडका शब्द हा कडवट होत आहे. लाडक्या बहिणीवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवर ही राज्य सरकारचे लक्ष नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बारामतीतून आंदोलन करणार आहोत.”