मंगळवेढा : मंगळवेढ्याहून बोराळे गावाकडे जाणाऱ्या हायवे रोडवर लगत NH 166 बायपास होत असताना भुयारी मार्ग करणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी रस्ता बंद करून चार किलोमीटरचा वळसा घालून त्या ठिकाणी जावे लागत आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी विशेष प्रयत्न केल्याने त्याला यश प्राप्त झाले आहे.
बोराळे रोडवरील शेतकरी व पुढील आठ गावातील वाहतुकीवर परिणाम याचा परिणाम होत हाेता. माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बोराळे भुयारी मार्ग आता केला जाणार आहे. बोराळे रोड हा मुख्यत: ज्वारी व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वाहतुकीचा रस्ता आहे. येथील ज्वारी जीआय मानांकन प्राप्त आहे. तसेच या भागातील ऊस उत्पादन ही मोठ्या प्रमाणावर आहे.
येथील ऊस विविध कारखान्यास पुरवला जातो हा ऊस वाहतूक भुयारी मार्ग नसल्यामुळे वाहतूक करणे जिकरीचे बनले होते. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता हाेती. तसेच या मार्गावरील सिद्धापूर येथील मातृलिंग मंदिर सुप्रसिद्ध असून या ठिकाणी देखील भाविक भक्तांचे वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
तसेच या भागातील ७५ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांना अतिरिक्त चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत हाेता. सदरचा रस्ता बंद झाल्यामुळे या भागातील अंदाजे 62 हजार एकर जमीन शेत जमीन प्रभावित झाले आहेत.
मंगळवेढा बोराळे भुयारी मार्ग होण्यासाठी माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून तसेच फोनवरून समस्या सोडवणार असल्याचे सांगितले.