मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) समावेश न झाल्याने आमदार संजय शिरसाठ (MLA Sanjay Shirsat) नाराज आहेत. आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटात वापस जाण्याचा मार्ग अजूनही आहे, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नाही तर आपल्यासाठी मातोश्रीचे (Matoshree) दरवाजे उघडे आहेत, हे स्पष्ट होत आहे. मात्र, नंतर सदर ट्विट डिलीट केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मी मंत्रिपदासाठी दबाव आणत नाही. एखाद्यावर विश्वास ठेवला किंवा एखाद्याला आपले मानल्यास त्याच्यासाठी मान कापली गेली तर हरकत नाही. एकनाथ शिंदे जे भूमिका घेतील ती भूमिका मान्य असेल, असे संजय शिरसाट म्हणाले. मातोश्रीवर पुन्हा जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलावी, भूमिका बदलणे तुमच्या हातात नसेल. शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्यामुळे ४० आमदार बाहेर पडले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राहिलो तर ती आमची आत्महत्या ठरली असती. आम्ही शिवसेना म्हणून बाहेर पडलो, असून आम्ही शिवसेना काम करतो, असे म्हणत संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
मी जे ट्विट केले आहे ते उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठीमागे एक भाषण केले होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखांची भूमिका पार पाडली होती, आजही माझे तसे मत आहे की तुम्ही कुटुंब प्रमुख असाल तर तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांची भूमिका लक्षात घेतली पाहिजे, स्वतःच्या नाही तर कुठंतरी कुटुंबांच्या भावनांवर विचार करायला हवा. आम्ही कायम त्यांना कुटुंबातील प्रमुख मानत आलो आहे आणि त्यामुळे हाजी परिस्थिती ओढवली ती आली नसती असे यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.