कल्याण : सगळी कामे तेच करतात तर आम्ही काय गोटया खेळतो का इतकेच नाही तर केंद्र सरकारकडून किती निधी आणला. रेल्वेत लोक धक्के खात बसले आहेत. पाचव्या आणि सहाव्या लाईनचे स्वप्न दाखवित आहेत ते खासदार आहेत असा पलटवाट मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केला आहे.
डोंबिवलीत आयोजित आगरी महोत्सवा दरम्यान खासदार शिंदे यांनी विरोधकांवर बोलताना असे भाष्य केले की, मी कामे केली आहेत. छाती ठोकून सांगू शकतो. विरोधकांनी काय कामे केली ते दाखवावे. खासदार शिंदे यांच्या विधानानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी पलटवार केला आहे. सर्व कामे त्यांनी केली तर आम्ही काय गोट्या खेळतो का असे प्रतिउत्तर दिले आहे. मनसे आमदार पाटील यांनी सांगितले की, पॉकेट मनी काढण्यासाठी विकास कामे केली जात आहेत. जी कामे सोयीची होती. ती कामे केली आहेत. नागरीकांना विश्वासात घेऊन कामे केलेली नाही. जी कामे नागरीकांना अपेक्षित होती. ती कामे करण्यात आलेली नाही. त्यामुळे काल डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील नागरीकांनी मूक आंदोलन केले. हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
कामे सुरु आहेत यात काही वाद नाही. मात्र जी कामे सुरु आहेत. त्यात गुणवत्ता राखली जात नाही. निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. एकीकडे रस्त्याचे काम सुरु असताना त्याच रस्त्याला खड्डे पडत आहेत. यावरुन सुरु असलेल्या कामाची गुणवत्ता किती निकृष्ट दर्जाची आहे हेच उघड होत आहे. मोठ गाव ठाकूर्ली माणकोली खाडी पूलाचे अलायमेंट बदलण्यात आले आहे. पलावा जंक्शन उड्डाण पूलाचे काम पूर्णत्वास आलेले नाही. ही कामे त्यांनी पूर्ण करुन दाखवावी.
Web Title: Mns mla raju patil question to mp shrikant shinde eknath shinde maharashtra political party mns shivsena