मुंबई – उद्धव ठाकरे गटाला (Thackeray Group) लागलेली गळती काही थांबायचे नाव घेत नाहीय, ठाकरे गटाचे आणखी एक खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. गजानन किर्तीकर यांनी आज वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतली आहे. याआधी देखील खासदार गजानन किर्तीकर यांना मुख्यमंत्री शिंदे भेटले होते. त्यामुळं आजच गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
[read_also content=”संजय राऊतांनी तुंरुगातील ‘हा धक्कादायक’ केला खुलासा, दृष्टी कमी झाली, बहिरेपणा आला आणि… https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-explain-shocking-exprience-in-jail-343780.html”]
दरम्यान, शिवसेनेचे लोकसभेचे 12 खासदार याआधी शिंदे गटात सामील झाले आहेत. आता किर्तीकर यांच्या रुपाने 13 खासदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. आज शिंदे गटात खासदार गजानन किर्तीकर करणार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याबाबत आधीपासूनच चर्चा रंगली होती. शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीबरोबर (NCP) युती करुन चूकच केली, आता पुन्हा चूक नको असा सल्ला किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thckeray) यांना दिला होता.