रेल्वे स्टेशनवरून ३२४९ मोबाईल चोरी; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
चालू वर्षांतील रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या चोरी झालेल्या मोबाईलचे तब्बल ३ हजार २४९ गुन्हे अद्याप ट्रेसिंगप्राप्त असूनही उघडकीस आलेले नाहीत. ही आकडेवारी १८ जून पर्यंतची असून, यात काही गहाळ झालेल्या मोबाईलचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १७पोलिस ठाणी सध्या कार्यरत आहेत. तर आणखी ५ नवीन पोलीस ठाणी कार्यरत होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिस ठाण्यात १४८ ट्रेसिंग प्राप्त मात्र उघडकीस न आलेले गुन्हे आहेत.
Pune Theft : चोरट्यांनी वाघोलीत फ्लॅट फोडला; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास
तर त्यानंतर दादर रेल्वे पोलिस ठाण्यातील ३६८, कुर्ला येथील २९३, ठाणे येथील २८८, डोंबिवली येथील ४३, कल्याण मधील ३१६, कर्जत येथील ४८, वडाळा येथील १४५, वाशी येथील ४९, पनवेल ७४, चर्चगेट येथील २५, मुंबई सेंट्रल येथील २६९, बांद्रा येथील २००, अंधेरी येथील १९१, बोरिवली येथील ३३८, वसई रोड येथील ३८५, पालघर येथील ६९ असे एकूण ३२४९ मोबाईल चोरीचे गुन्हे प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मोबाईल चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी प्रवाशांना आवाहन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल जपून ठेवावा, रेल्वे स्थानक आणि ट्रेनमध्ये चढताना-उतरताना मोबाईल जपून ठेवावेत, प्रवासात आणि खास करून गर्दीच्या वेळी वापर कमी करावा, सार्वजनिक ठिकाणीही मोबाईलचा वापर कमी करत शक्यतो बोलणे किंवा मेसेज करणे टाळावे, आपल्याकडील मोबाईल हा सुरक्षित ठिकाणी ठेवावा, प्रवासात अपरिचित व्यक्तींपासून सावध रहावे, अनोळखी व्यक्तींकडून मोबाईलची मागणी झाल्यास किंवा कोणीतरी संशयास्पद वागत असल्यास सतर्क असावे, प्रवासात शक्यतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत रहावे, चोरी झाल्यास तत्काळ पोलिसात तक्रार दाखल करावी.
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक प्रवासी मोबाईल चोरीला बळी पडत आहेत. या गुन्ह्यांमध्ये फलाटावरील वाढत्या गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांचे मोबाईल लंपास करतात.
बंद पडलेल्या एसटीत चालक, वाहक झोपले अन्…; पुणे-सोलापूर रस्त्यावरील घटना
पोलिस स्थानक गुन्हे प्रलंबित
दादर ३६८
कुर्ला २९३
ठाणे २८८
डोंबिवली ४३
कल्याण ३१६
कर्जत ४८
वडाळा १४५
वाशी ४९
पनवेल ७४
चर्चगेट २५
मुं. सेंट्रल २६९
बांद्रा २००
अंधेरी १९१
बोरिवली ३३८
वसईरोड ३८५
पालघर ६९
एकूण ३२४९