Navi Mumbai Airport (Photo Credit - X)
स्वप्नपूर्तीचा क्षण: २५ डिसेंबरला पहिले उड्डाण
नवी मुंबई, महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. या बाबत बोलताना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनास प्रारंभ होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोची पायाभूत सुविधा विकासाबाबतची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करते. हा प्रकल्प सिडकोच्या बांधिलकीची हमी देत असून भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हिटीसाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करतो.
महाराष्ट्र, देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्वार खुले होणार
महाराष्ट्र शासनाने सिडकोसोबत मिळून या ऐतिहासिक प्रकल्पासाठी आवश्यक ठरलेला उत्कृष्ट समन्वय आणि सामायिक दूरदृष्टी याची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासन, सिडको, अदानी समूह आणि एनएमआयएल यांच्यातील सुरळीत व प्रभावी समन्वयामुळे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधांचा एक मानदंड ठरला असून, महाराष्ट्र व देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्वार म्हणून उभा राहिला आहे. हे विमानतळ कार्यान्वित झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुलभ होणार आहे.
जनतेच्या स्वप्नाची पूर्तता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रत्यक्ष उड्डाण है जनतेच्या दीर्घकाळच्या स्वप्नाची पूर्तता असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कमळाकृती संकल्पनेवर आधारित अत्यंत आकर्षक टर्मिनल रचनेसाठी अदानी समूह, तसेच एनएमआयएएल यांचे मन पूर्वक आभार नोंदविले आहेत. ही भव्य रचना आता विमानतळाची एक प्रभावी वास्तुशिल्पीय ओळख बनली असून, भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडविण्यासोबतच शाश्वत विकास, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक ठरतो.
पहिल्या दिवसाचे वेळापत्रक (२५ डिसेंबर २०२५)
विमानतळाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात विमान संचालन होणार आहे. एकूण एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स: पहिल्या दिवशी एकूण ३० विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होईल.
सहभागी विमान कंपन्या
इंडिगो (IndiGo)
एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express)
आकासा एअर (Akasa Air)
स्टार एअर (Star Air)






