प्रवीण दरेकरांची ठाकरेंवर टीका (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई महानगरपालिकेत महायुतीची विजयाकडे वाटचाल
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केले भाष्य
प्रवीण दरेकर यांचा भाऊ झाला विजयी
Mumbai Municipal Election Result 2026: राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजप मोठा पक्ष ठरताना दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधू यांची 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश मिळताना दिसून येत आहे. आता यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे.
मुंबई महानगरपालिकेत भाजपला मिळत असलेल्या यशावर प्रवीजन दरेकर म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मिळवून दिला. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. मराठी माणसे कोणामुळे राज्याबाहेर, मुंबईवर गेली? देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडीमध्ये घरे दिली.”
पुढे बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, “आज आम्ही मराठी माणूस मुंबईत राहावा यासाठी प्रयत्न करत आहोत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व, त्यांचे विकासाची भूमिका आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेली आहे. ठाकरेंचे दुकान आता बंद झालेले आहे.”
दरम्यान मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता येताना दिसून येत आहे. भाजप-शिवसेना युती 130 जागांवर आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधू यांची युती 71 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष ठरलेला दिसून येत आहे. 29 पैकी जवळपास अनेक महानगरपालिकांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरताना दिसून येत आहे.
नवनाथ बन यांनी मारली बाजी
विशेष म्हणजे नवनाथ बन पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक लढवत होते. महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना यश मिळाले आहे. खरं तर नवनाथ बन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तसेच नवनाथ बन पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक लढवत असल्याने त्यांच्या उमेदवारीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात होते. मात्र आता मानखुर्द परिसरातील वॉर्ड 135 मधून नवनाथ बन यांनी बाजी मारल्यानंतर सर्वत्र विजयाचा गुलाल उधळला जात आहे.
वॉर्ड क्रमांक 214 मधून रिंगाणात असलेल्या भाजपाच्या अजय पाटील यांनी विजय मिळवला आहे. तर वॉर्ड क्रमांक 215 मधून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे संतोष ढाले विजयी झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. तर वॉर्ड क्रमांक 1 मधून रेखा यादव विजयी झाल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 193 मधून ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकर यांनी बाजी मारली आहे.






