फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेचा मोठा प्रहार
मोठी बातमी ! आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी; महिलांची धाकधूक वाढली
कारवाईचे योग्य फलित
या मोहिमांमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर प्रभावी अंकुश येत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. में २०२६ या एकाच महिन्यात विनातिकीट प्रवासाच्या २.०२ लाख प्रकरणांची नोंद झाली.
या प्रवाशांकडून १४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी याच महिन्यात १.३० लाख प्रकरणांमधून ५.९५ कोटी रुपयांची वसुली झाली होती. त्यामुळे प्रकरणांच्या संख्येत ५६ टक्क्यांहून अधिक, तर दंडाच्या रकमेत १३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मेल-एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक कारवाई
मेल-एक्स्प्रेस गाड्यांतील स्लीपर आणि जनरल डबे तसेच उपनगरीय रेल्वेच्या द्वितीय श्रेणी डब्यांमा विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली, एप्रिल ते मे २०२६ या कालावधीत ३.०४ लाख प्रकरणे आढल आली. या कारवाईतून २४.७७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, गेल्या वर्षी याच कालावध २.०२ लाख प्रकरणांमधून १०.१२ कोटी रुपयांची वसुली झाली होती. मे महिन्यात या श्रेणीतील १ लाख प्रकरणांमधून ११.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत हजार ४६ प्रकरणामधून ५.०९ कोटी रुपयांची वसुली झाली होती.
एसी लोकलमध्ये फुकट्यांची संख्या वाढली
एसी लोकलमध्ये विनातिकीट किंवा चुकीच्या तिकिटावर प्रवास करणा-यांविरोधातही विशेष मोहीम राबविण्यात आली. एप्रिल ते मे २०२६ या कालावधीत २५ हजार ९२४ प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यातून ८०.९७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रकरणांमध्ये २३ टक्के, तर महसुलात १८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
इतर उल्लंघनांवरही कारवाई
या कालावधीत प्रथम श्रेणीतील अनधिकृत प्रवासाच्या २३ हजार ४४७ प्रकरणांमधून ७४.६१ लाख रुपये, मेल एक्स्प्रेस गाड्यांमधील भाडेफरकाच्या ५८ हजार ७४८ प्रकरणांमधून ३.६१ कोटी रुपये, तर विनाबुकिंग सामान वाहतुकीच्या १७ हजार प्रकरणांमधून १९.४५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले असून, ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्याचे स्पष्ट केले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






