दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, शेती कामांना वेग
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात पुढील आठवड्यात, 14 ते 20 मे दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात मान्सूनसारखा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने कोकण भागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आंब्याच्या हंगामात सिंधुदुर्गात सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि पावसाचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला असून, त्यामुळे आंबा बागायतदार आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजकांमध्ये चिंता वाढली आहे.
पिकांचे नुकसान वाढले
जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादकांसाठी हे वर्ष आधीच निराशाजनक ठरले आहे. ब्लॉसम ब्लाईटमुळे आंबा आणि काजूचे उत्पादन आधीच १५ ते २० टक्क्यांनी घटले आहे. सुमारे ४० अंश सेल्सिअस तापमान आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे फळगळती आणि पिकांचे नुकसान वाढले आहे.
आंबा उत्पादकांच्या चिंतेत आणखी भर
आता सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे उर्वरित उत्पादनावरही संकट आले आहे. हवामान विभागाने ८ मे पर्यंत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे आंबा उत्पादकांची चिंता आणखी वाढली आहे, कारण पिकलेल्या फळांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अनेक ठिकाणी अद्याप उष्णतेचा तडाखा कायम
दुसरीकडे, सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना नागरिक करत आहे. अनेक राज्यांमध्ये कडक उन्हाळा असून उष्माघाताने बळी जात आहेत. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत, तापमान इतके वाढले आहे की. घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी, भाजून काढणाऱ्या उष्णतेने जनजीवनच ठप्प झाले आहे, अशी परिस्थिती जाणवत आहे. त्यात आता दिलासादायक बातमी समोर आली आहे.






