5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी, मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल (फोटो सौजन्य-X)
Mahayuti Oath Ceremony in Marathi: महाराष्ट्रात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात गुरुवारी (5 डिसेंबर) होत असून त्यानिमित्त आझाद मैदानात आणि आजुबाजूच्या परिसरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. हे बदल गुरुवारी दूपारी 12 वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहणार आहे. तर दुसरीकडे दादरच्या शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर आझाद मैदान आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
पंतप्रधानांसह अनेक व्हीव्हीआयपी मुंबईत आल्याने आझाद मैदानाचे छावणीत रुपांतर झाले आहे. कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ५ ते ७ डिसेंबर या कालावधीसाठी वाहतूक सल्लागार जारी केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो अनुयायी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना मानवंदना देतील, अशी अपेक्षा आहे. या काळात दादर आणि आसपासच्या वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होईल.
वाहनांची सुरळीत वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन ) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दरम्यान दोन्ही मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालकांनी एल. टी. मार्ग, चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन. रोड छत्रपती शिवाजी महाराज – जंक्शन (सीएसएमटी जंक्शन) या पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच विरुद्ध दिशेने जणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी मार्गही आवश्यतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी एल.टी. मार्ग चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन रोड, सीएसएमटीवरून इच्छितस्थळी मार्गस्थ व्हावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
त्याचबरोबर हजारीमल सोमानी मार्गावरील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनपर्यंत (सीएसएमटी जंक्शन) वाहतूक प्रतिबंधित असेल. पर्यायी व्यवस्था म्हणून चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) हुतात्मा चौक – काळा घोडा, के. दुभाष मार्ग – शहिद भगतसिंग मार्गाचा वापर करावा. तसचे प्रिन्सेस स्ट्रिट पूल (मेघदुत ब्रिज) (दक्षिण वाहिनी) (एन. एस. रोड, तसेच सागरी किनारा मार्गाने श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येईल.
– स्वतंत्र वीर सावरकर रस्ता : सिद्धिविनायक मंदिरापासून हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत बंद.
– एस.के. बोले रोड: सिद्धिविनायक ते पोर्तुगीज चर्चला जाण्यास परवानगी आहे. दक्षिणेकडील प्रवेश बंद.
– रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, केळुस्कर रोड (उत्तर आणि दक्षिण), एम.बी. राऊत रोड आणि कटारिया रोड : सर्व वाहनांसाठी बंद राहील.
– एसव्ही रोड : माहीम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन.
– एल.जे. रस्ता: माहीम जंक्शन ते गडकरी जंक्शन.
– गोखले रोड : गडकरी जंक्शन ते धनमील नाका.
– सेनापती बापट रस्ता : माहीम रेल्वे स्टेशन ते वडाचा नाका.
– स्वतंत्र वीर सावरकर रस्ता, ज्ञानेश्वर मंदिर रस्ता, जांभेकर महाराज रस्ता, रानडे रस्ता, केळुसकर रस्ता (उत्तर व दक्षिण), एम.बी. राऊत रस्ता, पांडुरंग नाईक रस्ता, एन.सी. केळकर रस्ता आणि आजूबाजूचा परिसर.