मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात (प्रातिनिधिक फोटो- istockphoto)
1. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल
2. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर करणार आंदोलन
3. मुंबईत जाताना मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात
Accident News: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिला होता. दरम्यान आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत लाखों मराठा आंदोलक देखील मुंबईत आले आहेत. मात्र यातच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईकडे जात असताना मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता नाही तर कधीच नाही म्हणत त्यांनी मुंबईकडे कूच केले होते. 27 तारखेला जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून निघाले होते. आज ते मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत लाखों मराठा आंदोलक देखील मुंबईच्या दिशेने येत आहे. अनेक आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र यातच मुंबईत येत असताना आंदोलकांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
मराठा बांधव आपापल्या वाहनाने, ट्रक आणि चार चाकी गाड्यांच्या मदतीने आरक्षणाची लढाई लढण्यासाठी मुंबईकडे येत आहेत. मुंबईत येत असतानाच मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये तीन आंदोलक जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन जखमींना मदत केली आहे. तसेच अपघातग्रस्त वाहन देखील रातींवरून हटवले आहे.
Maratha Reservation: निर्याणक लढाई! मनोज जरांगे पाटील राजधानीत दाखल; मुंबई पोलिसांनी …
लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत येत आहेत. त्यातच मुंबईत येत असताना आंदोलकांच्या टेम्पोला हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या लोकांना जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका एक्सप्रेसवर झाल्याचे समजते आहे.
मनोज जरांगे पाटील राजधानीत दाखल
मोठ्या संख्येने आज मराठा समाजाचे लोक मुंबईत आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी देखील अनेक अटीशर्तींसह देण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.