मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक (फोटो- सोशल मीडिया)
१. मनोज जरांगे पाटील आज मुंबई धडक देणार
२. ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी
३. आझाद मैदानावर एकाच दिवसाची परवानगी
Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईत दाखल झाले आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलन मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करणार का हे पहावे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोठ्या संख्येने आज मराठा समाजाचे लोक मुंबईत आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी देखील अनेक अटीशर्तींसह देण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत अनेक बदल केले आहेत. पुढील सूचना येईपर्यंत हे वाहनचालकांना हे बदल पाळावे लागणार आहेत.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदानवर मोठी तयारी करण्यात आली आहे. पोलिसांनी मात्र केवळ एकाच दिवसासाठी आंदोलन करता येईल अशी पर्वण दिली आहे. तसेच यासाठी नियमांचे पालन देखील करावे लागेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.
काय आहेत अटी शर्ती?
1. आंदोलन करण्यासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे.
2. आंदोलकांची संख्या 5 हजार असणे आवश्यक आहे.
3. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा वापरता येणार नाही.
जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर ज्या पद्धतीने भाष्य करण्यात आले ते महाराष्ट्राला पटणारे नाही. आम्हाला तुमचा देखील आदर आहे. जरांगे पाटील हे समाजाच्या आरक्षणासाठी काम करत आहात. हे आरक्षण जर कोण देणार तर, ते देवेंद्र फडणवीसच देणार. मात्र आशा पद्धतीने त्यांच्या आईवर टीका केली गेली नाही,हे कोणीही खपवून घेणार नाही. त्यांनी त्यांचे शब्द मागे घेतले, त्याबाबत त्यांचे स्वागत आहे.