नागपुरात अवतरली 'जेन-झी' (Gen-Z) पिढी! कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने संविधान चौक दणाणला
संविधान चौकात झालेल्या आंदोलनात हजारोंच्या संख्येत विद्यार्थी, तरुण-तरुणी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिला, वृद्ध सहभागी झाले होते. ‘कॉकरोच’ च्या आंदोलनपीठावर अभिजित दीपके, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्यासह काँक्रोचचे पाठीराखे होते. विद्यार्थी, दीपके यांनी प्रधान यांचा राजीनामा हवाच, अशी हाक दिली. जोवर राजीनामा होणार नाही, तोवर काँक्रोच देशभर पसरतील असा इशारा दिला.
दरम्यान, दीपके यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन सांत्वन करण्याची किंवा आर्थिक मदत देण्यासाठी वेळ नाही. मात्र, आमदारांच्या खरेदीसाठी पैसा आहे. सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनीही तरुणाईला साद घातली.
सध्याच्या व्यवस्थेवरही त्यांनी ताशेरे ओढले. दुर्गेश कुहीके, वैभव चोपकर, वरद डोलीकर, चैतन्य ध्रुव, मंथन, भारत बानाईत, सुरभी कलारीया, गोविंद पोलाद, ऋषभ राऊत, आकाश टाले आदींनीही विचारपीठावरून तरुणाई, विद्यार्थ्यांना हाक
दिली. ‘कॉक्रोच’ मोठ्या संख्येत येणार असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला. जवळपास ८०० पोलिस तैनात होते, साध्या वेशातही पोलिस लक्ष ठेवून होते. पोलिस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकारी चौकात जातीने हजर होते.
आंदोलनात येणारे विद्यायी स्वतःला काँक्रोच म्हणवून घेत होते. त्यांनी सोबत आणलेले कत्यक पोस्टर्स लक्ष वैधून घेत होते. अनेक पालकांनी तर मुले सोबत आणली, नागपूरचे विविध संस्थांचे आंदोलनकर्तेही यात सहभागी झाले होते.
नीट परीक्षा रद्द झाल्याने आत्महत्या करणाऱ्या आकांक्षा चतुर्वेदी या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे अभिजित दीपके यांनी सांत्वन केले. देशातील समस्त विद्यार्थी आपणासोबत असल्याचे व यासंदर्भातील निर्णयाप्रत जात नाही तोवर आंदोलन करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली,
आंदोलनाला विरोधाचे दोन प्रसगही घडले. यात एका गटाने पंतप्रधान मोदीविरोधातील घोषणाबाजीला विरोध दर्शवला, काँक्रोचने हा प्रकार हाणून पाडला, त्यानंतर एका दुसऱ्या गटानेही तसाच प्रयत्न केला, पोलिसानी वेळीच हस्तक्षेप केला. तरुणीने गोमाता संदर्भात आणलेल्या पोस्टरने वाद झाला. पोलिसांनी ताही परिस्थिती हाताळली.






