जनगणनेला विरोध, नागरिकाला नोटीस
सध्या सुरू असलेल्या Census 2027 प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी विरोधाच्या घटना समोर येत आहेत. लाखनी येथील उमेश सिंगनजुडे यांनी “ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम का नाही?” असा सवाल उपस्थित करत माहिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लाखनी नगरपंचायतीने त्यांना 1948 च्या जनगणना कायद्यातील कलम 8 आणि 11 अंतर्गत नोटीस बजावली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात जनगणनेविरोधातील कारवाईची ही पहिलीच घटना असल्याने याबाबत विविध स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या
‘आधी OBC कॉलम द्या, मग जनगणना करा’
नगरपंचायतीकडून आलेल्या नोटिशीवर प्रतिक्रिया देताना उमेश सिंगनजुडे यांनी, “जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नमूद करावा आणि त्यानंतरच जनगणना प्रक्रिया राबवावी,” अशी भूमिका मांडली. या प्रकरणामुळे ओबीसी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, लाखनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत अधिक बोलण्यास टाळाटाळ केली.
जनगणनेच्या कामावर जाताना शिक्षकाचा मृत्यू
दरम्यान, अनेक ठिकाणी जनगणनेचे काम शिक्षकांकडूनही करून घेतले जात आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात करजगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रदीप गणोरकर (वय 50) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शनिवारी सकाळी जनगणनेच्या कामासाठी घराबाहेर पडताना त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिक्षक वर्गातून हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी होत आहे.
Jalna Crime: संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती
Ans: जनगणनेत OBC साठी स्वतंत्र कॉलम नसल्याने नागरिकाने माहिती देण्यास नकार दिला.
Ans: सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत संबंधित नागरिकाला नोटीस बजावली.
Ans: जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षक प्रदीप गणोरकर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.






