फोटो सौजन्य AI
▶ दिल्ली/गुवाहाटी, वृत्तसंस्था, ‘नीट’ पेपर लीक प्रकरणात विद्यार्थी आंदोलन आता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीच्या अंतर्गत कलहापर्यंत पोहोचले आहे. आसामचे महसूलमंत्री आणि आसाम गण परिषदेचे (एजेपी) ज्येष्ठ नेते केशव महंता यांची मुलगी दिबीशा महंता ही स्वतः आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरली. गुवाहाटीच्या चाचल परिसरात झालेल्या या निदर्शनांमध्ये दिबीशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान ती पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपशब्द वापरताना दिसली. दिबीशाचे अनेक व्हिडीओ समोर आले . असून, त्यामध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि भद्दी भाषा वापरताना दिसत आहे. निदर्शनादरम्यान दिबीशा महंता हातात फलक घेऊन सामान्य विद्यार्थ्यांमध्ये घोषणाबाजी करताना पाहायला मिळाली. या मुद्द्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आसामचे मुख्यमंत्री बिस्व सरमा यांनी अत्यंत संयमी विधान केले. ते म्हणाले, हे विद्यार्थ्यांचे आंदोलन असून आम्ही त्यांच्या मागण्यांचा आदर करतो.
Nagpur : अकरावीवर SIR चा फटका , विद्यार्थ्यांचे नुकसान ..
शांततापूर्ण आंदोलन
चाचल येथे झालेले हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण राहिले. घटनास्थळी तैनात असलेल्या आसाम पोलिसांच्या पथकाने कायदा व सुव्यवस्था राखली आणि कोणत्याही अनावधानाने घडणाऱ्या घटनेची नोंद झाली नाही.
NagpurCity: लीजसाठी व्हीएचए ची आयुक्तांकडे धाव,अहवालावर प्रश्नचिन्ह..
सोशल मीडिया अकाउंट बंद
वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर, दिबीशा महंताने तिचे सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहे.
FIFA : फिफा चषकात गुंजले अमनचे संगीत , नागपूरच्या सुपुत्राची दमदार छाप






