(फोटो सौजन्य: Chatgpt)
खरं तर, नेपाळने भारतीय आणि नेपाळी नागरिकांना २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा देशात आणण्याची किंवा बाहेर नेण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी ९ नोव्हेंबर २०१६ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या, एकूण २५,००० रुपयांपर्यंतच्या नोटांना लागू होते. याचा अर्थ असा की, बालेन शाह सरकारच्या काळात आता २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा स्वीकारल्या जातील.
नेपाळ राष्ट्र बँकेने गुरुवारी या संदर्भात एक नोटीस जारी केली. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “९ नोव्हेंबर २०१६ पूर्वी जारी केलेल्या ₹५०० आणि ₹१,००० च्या भारतीय चलनी नोटांवर नेपाळमध्ये अजूनही बंदी आहे. पण विद्यमान नियमांनुसार, नेपाळी किंवा भारतीय नागरिक ९ नोव्हेंबर २०१६ नंतर जारी केलेल्या ₹२०० आणि ₹५०० च्या भारतीय चलनी नोटा, प्रति व्यक्ती ₹२५,००० च्या मर्यादेपर्यंत नेपाळमध्ये आणू किंवा नेपाळबाहेर नेऊ शकतात.”
याआधी नेपाळमध्ये भारताची फक्त 100 रुपयांची नोट वापरली जात होती. यापेक्षा मोठ्या नोटा नेपाळमध्ये नेण्यास परवानगी नव्हती. पण आता भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांतील नागरिक नेपाळमध्ये भारतीय 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा खरेदी करू शकतात. लक्षात ठेवा 200 आणि 500 च्या नोटा 2016 पासूनच्या असाव्यात.
2026 च्या सुरुवातीला नेपाळच्या नॅशनल बँकेने या संदर्भात एक माहिती दिली होती. 11 फेब्रुवारी रोजी सेंट्रल बँक ऑफ नेपाळने 2016 नंतर जारी करण्यात आलेल्या भारतातील 200 आणि 500 रुपयांच्या नोटांबाबत नोटीस जारी केली होती. आता बँकेने पुन्हा एकदा त्याच आदेशाची पुनरावृत्ती केली आणि अंमलबजावणीची पद्धत स्पष्ट केली.
नवीन नियमांची माहिती देताना, NRB चे प्रवक्ते गुरू प्रसाद पौडेल यांनी शनिवारी सांगितले की, नेपाळी नागरिक भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातून भारतीय चलन नेपाळमध्ये आणू शकत नाहीत. त्याचप्रमाणे, ते नेपाळमधून भारतीय चलन भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही तिसऱ्या देशात घेऊन जाऊ शकत नाहीत.
NRB चे प्रवक्ते गुरू प्रसाद पौडेल यांनी स्पष्ट केलं की, या नवीन तरतुदीमुळे नेपाळला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांना आणि भारतासोबत व्यापार व व्यवसायात गुंतलेल्या नेपाळी नागरिकांना सोयीस्कर होईल.






