MIM मुळे कोणाची हानी तर कोणाचा लाभ! मिळालेली मते एमआयएमची जमेची बाजू तर 'हिंदुत्व'ही येणार पुढे
अरविंद जाधव: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने महापालिका निवडणुकीच्या रिंगणात सहा उमेदवार दिले. सहाही उमेदवार पराभूत झाले तरी या उमेदवारांना मिळालेली मते पाहता आगामी काळात पक्ष विस्तारला तर कोणात्या प्रमुख पक्षांना फायदा अन् कोणत्या प्रमुख पक्षांना फटका बसू शकतो, याची चर्चा हळुहळू जोर पकडू लागली आहे.
एमआयएमने मुस्लिम आणि दलित व्होटबँक समोर ठेऊन प्रभाग १४, २३, २४ आणि ३० यात सहा उमेदवार उभे केले होते. त्यातील प्रभाग ३० मध्ये तर एमआयएचे उमेदवार असलेल्या मोहसीन शहा यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप) शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) या अधिकृत समजल्या जाणाऱ्या पक्षांचा क्रमांक लागतो. राज्यात या पक्षाने चांगली मुसंडी मारली. नाशिक शहरात शिंदेच्या शिवसेनेचे अस्तित्व मर्यादीत स्वरूपात झाले आहे. काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी तसेच उबाठा गटाला मुस्लिम समाजाने पाठींबा दिला तरी उमेदवार केव्हा भाजपमध्ये प्रवेश करेल याचा नेम नाही.
दुबई वॉर्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रभाग १४ मध्ये एमआयएमला विशेष काहीच करता आले नाही, तेथील मुस्लिम समाजाने पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक उमेदवारांना प्राधन्य दिल्याचे दिसले, प्रभाग ३० क पाहीलानो दिवारी याना २०१० मते होती. तेथेही शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अप), काँग्रेस आणि वचित बहुजन आघाडी मागे फेकली गेली. प्रभाग २३ मध्ये मतांच्या गोळाबेरीजेत एमआयएम फारच मागे राहिले. आमचा पक्ष मुस्लिम आणि दलितांसह उपेक्षीत घटकांसाठी काम करतो. तसेच राज्यभरात अनेक आमच्या पक्षाने उमेदवारी दिलेले सवर्ण सुद्धा निवडूण आले. त्यामुळे यावेळी झालेली सुरूवात आणखी वाढणार हे शहराध्यक्ष रमजान पठाण यांचे वक्तब्ध आगामी काळातील चुणूक दाखवतो, शहरात रिपाइं व इतर संघटनांचे अस्तित्व या निवडणुकीत घुसून निघाले. मुस्लिम होटबैंक समोर ठेवणा-या समाजवादी पक्षाची तशीच वाताहात झाली आहे. त्यामुळे भाजपला विरोध करायचा तर समर्थन कोणाचे आणि का करायचे, असा प्रश्न मुस्लिम तसेच सेक्युलर मतदारांपुढे आहे.
शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (शप), मनसे आणि काँग्रेस या पक्षातील नेते कार्यकर्ते सहज पक्ष सोडून जातात. त्यामुळे या पक्षांवरील लोकांचाही विश्वास हळुहळू कमीच झाला आहे. या पक्षांना मतदान करणारे पण भाजपला विरोध असलेल्या मतदारांसाठी सध्या ठोस विरोधी पक्ष म्हणून पर्यायच नाही. या घडामोडींचा जितका फायदा एमआयएमला तितकाच तो भाजपला सुद्धा। दोन टोकाचे पक्ष समोर आल्यानंतर निवडणुकीतील मुद्दचरिवजी हिंदू-मुस्लिम वादाला फोडणी घालणे दोन्ही पक्षांना सहज सोपे ठरू शकते, एवढे मात्र निश्चित।






