नितीश राणे : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी सुरु आहेत. आज नितीश राणे (Nitish Rane) यांची पत्रकार परिषद पार पडली आणि यावेळी त्यांनी विरोधकांना धारेवर धरले आहे. पत्रकार परिषदेमध्ये नितीश राणे म्हणाले, नेहमी जेव्हा आम्ही उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) खालच्या थराची टीका करतो तेव्हा जीभ घसरली आम्ही तोल सोडून बोललो असं नेहमी आमच्यावर टीका करतात. काल एकही मीडियाच्या मित्रांनी उद्धव ठाकरेंची जीभ घसरली, एका माजी मुख्यमंत्र्यांवर बोलताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यावर बोलताना खालच्या पातळीवर टीका करत असताना कोणत्याही मीडियाच्या मित्रांनी उद्धव ठाकरेंची जीभ घसरली असे सांगितले नाही. आता जेव्हा उद्धव ठाकरेंची जीभ घसरलीच आहे तर सूट समज परत देणं हाच महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे असे नितीश राणे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की अंगावर आलं की शिंगावर घ्या. आता उद्धव ठाकरे अंगावर आलेच आहेत तर आता शिंगावर घेऊ. आता जे जे काही बाहेर येईल ते ऐकून घरात बसून रडायचे नाही आणि बिळात जाऊन लपायचे नाही. नितीन देसाई यांच्या बाबत अग्रलेख लिहिला गेला. त्यांच्यावर अन्याय केला असं सांगितलं गेलं. नितीन देसाई चांगला व्यक्ती होता. त्यांचा स्टुडिओ त्यांनी विकत द्यावा आणि तो आम्हाला द्या असा कुणाचा दबाव होता. माझ्या माहितीनुसार त्यांच्यावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचा (Rashmi Thackeray) त्यांच्यावर दबाव होता. एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या देण्यात आल्या होत्या असे नितीश राणे म्हणाले.
पुढे नितीश राणे म्हणाले, संजय राजाराम राऊतला बोलेल तू आमचं थोबाड उघडायला लावलस तर तुझ्या मालकाचं वस्त्रहरण करणार हे तुला पहिल्या दिवसापासून सांगितलं होत. संजय राऊत यांचा मालक आणि मालकीण एनडी स्टुडिओ बळकवण्याचा प्रयत्न करत होता. जो ठाकरे सिनेमा आला त्याचे शूटिंग एन डी स्टुडिओत झालं त्याचे पैसे दिलेत का? तुझ्या मालकाने आणि मालकीनीने का नितीन देसाईवर दबाव टाकला. साडे सात नंतर तुम्हाला डीनो लागतो आणि आता सत्ता गेल्यानंतर नितीन देसाई आठवणी येतात. मी उद्धव ठाकरेंना नपुंसक, बायला म्हणालो तर बोभाटा होणार. ज्या माणसाला धड उभं राहता येत नाही, तो दुसऱ्यांवर टीका करण्याची हिम्मत करत आहे. आधी उद्धव ठाकरे याने कंगना रनौत हिच्याकडून राखी बांधून दाखव, नवनीत राणा यांच्याकडून राखी बांधून दाखव असे नितीश राणे म्हणाले.