देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यात ८ टक्के मतदारांची वाढ; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट आरोप
Rahul Gandhi Allegations on Devendra Fadnavis: काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी फेरफार झाल्याचा आरोप करत आहेत. या सगळ्यात गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेतील सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे, व्हिडीओ रेकॉर्डिंग्स निकालानंतर ४५ दिवसात नष्ट करण्याचा निर्णय़ घेतला. आयोगाच्या या निर्णय़ावर राहुल गांधी यांनी पुन्हा संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत.
राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाऊटंवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मतदारयादीत पाच महिन्यात ८ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा केला आहे. राहुल गांधी यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसत आहेत.
Crime News Live Updates : पतीने चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून
“महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात केवळ पाच महिन्यांत मतदार यादीत ८% वाढ झाली आहे.काही मतदान केंद्रांवर ही वाढ २०% ते ५०% दरम्यान आहे. बीएलओंनी (बूथ लेव्हल अधिकारी) काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची माहिती दिली आहे.माध्यमांनी शेकडो अशा मतदारांचा शोध लावला आहे, ज्यांचे पत्ते पडताळणीयोग्य नाहीत.आणि निवडणूक आयोग? शांत – की मग हातमिळवणी? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, ही वेगवे गोंधळ नाहीतर तर हा मतांची चोरी आहे. झाकपाक करणे म्हणजे हा आरोप स्वीकारल्या सारखा आहे. म्हणूनच आम्ही मशीन-पठणीय डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत. असा आरोप राहुल गांधींना केला आहे.
In Maharashtra CM’s own constituency, the voter list grew by 8% in just 5 months.
Some booths saw a 20-50% surge.
BLOs reported unknown individuals casting votes.
Media uncovered thousands of voters with no verified address.
And the EC? Silent – or complicit.
These aren’t… pic.twitter.com/32q9dflfB9
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 24, 2025
इंग्रजी वृत्तवाहिनी “न्युजलॉण्ड्री” या वृत्तवाहिनीने यासंदर्भात एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे, या अहवालाच्या आधारेच राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगावर हे आरोप केले आहेत. या अहवालात काही गंभीर दावे करण्यात आले आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षी २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या फक्त ६ महिन्यांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात तब्बल २९,२१९ नव्या मतदारांची नोदं करण्याकत आली. म्हणजेच दररोज जवळपास १६२ नवे मतदार जोडण्यात आले. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील नव्या मतदारांची ही वाढ ८.२५ टक्के इतकी आहे. ही ८.२५ टक्के वाढ आहे, जी निवडणूक आयोगाच्या स्वतःच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिवार्य पडताळणी तपासणी सुरू करणाऱ्या ४ टक्के मर्यादेपेक्षा दुप्पट आहे.
Sanjay Kapur च्या Sona Comstar ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी कंपनीचा नवा चेअरपर्सन, 30 हजार कोटीचा
तरीही, ज्या भागांमध्ये सर्वाधिक नवीन मतदार नोंदले गेले, तिथे अशी कोणतीही तपासणी झाली नसल्याचे काही स्थानिक मतदान कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. न्यूजलॉन्ड्री या संस्थेने ५० बूथवर केलेल्या तपासणीत निदर्शनास आले की, किमान ४,००० मतदारांचे पत्तेच उपलब्ध नव्हते. खरं तर, बोगस मतदार आहेत का, हे तपासणं निवडणूक आयोगाचं काम आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात २,३०१ मते वगळण्यात आली होती, जी एकूण मतदारांच्या ०.६ टक्के होती. या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा ३९,००० मतांनी पराभव केला. हा फडणवीस यांचा सलग चौथा विजय होता. भाजपचे मत १४,२२५ ने वाढले, तर काँग्रेसचे फक्त ८,००० नेच.
गेल्या काही वर्षांपासून, विविध राज्यांमध्ये – जसं की दिल्ली, उत्तर प्रदेश, आणि आता महाराष्ट्रात – विरोधी पक्षांनी मतदार यादीतील गोंधळावर निवडणूक आयोगावर टीका केली आहे. राहुल गांधींनीही महाराष्ट्रात “हेराफेरी” झाल्याचा आरोप केला होता.
निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी अतिरिक्त तपासणीचे नियम बनवले आहेत, जिथे मतदारसंख्येत ४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ किंवा २ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “२ टक्के आणि ४ टक्के या मर्यादा ठरवलेल्या आहेत. मतदार यादीतून नाव वगळणं हे अधिक संवेदनशील असल्याने तिथे २ टक्क्यांची मर्यादा आहे. नाव वाढल्यास ती चांगली गोष्ट असली तरी, ४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली, तर पुन्हा एकदा तपासणी करणे गरजेचे ठरते.”