Police Baton Charge Bhide Supporters In Solapur Agitation Started In Support Of Sambhaji Bhide Nrab
सोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सुरु होतं आंदोलन
सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच्या निषेधार्थ भिडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
सोलापूर : सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच्या निषेधार्थ भिडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत होतं. यावेळी आंदोलन करणाऱ्या हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पण बाहेर ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ आंदोलक आक्रमक झाले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर हिंदूवादी संघटनेच्या 100-150 कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला.
सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत होतं. पण आंदोलनकर्त्यांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याने कार्यकर्त्यांना फौजदार चावडी पोलीस स्थानकात आणण्यात आलं. पण ही अटक चुकीची असल्याचं सांगत भिडे समर्थकांनी पोलीस स्थानकाबाहेर गोंधळ घातला. त्यानंतर भिडे समर्थक आणि पोलिसांची बाचाबाची झाली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी भिडे समर्थकांवर लाठीचार्ज केला.
Web Title: Police baton charge bhide supporters in solapur agitation started in support of sambhaji bhide nrab