धुलिवंदनमुळे पुणे मेट्रो सेवा राहणार बंद (फोटो सौजन्य - istock )
पुणे: मेट्रोच्या नव्या आराखड्यात तीनच्या ऐवजीपाच स्टेशन प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये बालाजीनगर व बिबवेवाडी- सहकारनगर स्थानकांचा समावेश आहे. स्थानकांच्या जागांमध्ये बदल केल्यानंतर नव्या आराखड्याला महापालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव राज्य सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील भूमिगत स्थानकांच्या जागांमध्ये करण्यात आलेले बदल तसेच स्टेशनची संख्या वाढविण्यात आल्यामुळे सातारा रस्ता परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.महामेट्रोने या मार्गावर केवळ तीन मेट्रो स्टेशन प्रस्तावित केले होते. मात्र, महापालिकेच्या भूमिकेमुळे आता या मार्गावर पाच भूमिगत मेट्रो स्टेशन होणार असून त्यासंबंधीच्या सुधारित आराखड्याला व वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला नुकतीच मुख्यसभेत मंजुरी देण्यात आली.
नागरिकांची सोय लक्षात घेऊन नव्याने आराखडा
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर स्वारगेट ते कात्रज विस्तारीत मार्गाचे कामाचे भूमिपूजन झाले आहे. मात्र, या मार्गाच्या आराखड्यात मार्गावर तीनच भूमिगत मेट्रो स्टेशन प्रस्तावित केले होते. मात्र, या स्टेशनची संख्या वाढवावी, अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींनी महामेट्रोकडे केली होती. त्यानुसार या भागातील लोकसंख्या आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन नव्याने आराखडा तयार करण्यात आला. जुन्या आराखड्यात मार्केट यार्ड, पद्मावती व राजीव गांधी प्राणिसंग्रहालय या स्टेशनचा समावेश होता.
नवीन स्थानकांची नावे / प्रत्यक्ष ठिकाण
मार्केट यार्ड / उत्सव हॉटेल चौक
बिबवेवाडी, सहकारनगर / नातूबाग
पद्मावती / सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ
बालाजीनगर / भारती विद्यापीठ
कात्रज / कात्रज बसस्टँड, किनारा हॉटेलजवळ
पुणे मेट्रोचे विस्तारीकरण होणार
मेट्राेच्या हडपसर ते लाेणीकंद आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दाेन मार्गांच्याविस्तारीकरणाच्या आराखड्यास महापािलकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि महामेट्राे यांनी पुणे महापालिका क्षेत्रासाठी सर्वंकष वाहतुक विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार पुणे शहराचा भविष्यात हाेणारा विस्तार आणि विकास लक्षात घेऊन मेट्राे मार्गांचा अधिक विस्तार करण्याची गरज या अहवालात व्यक्त केली आहे.
तसेच पुणे एकिकृत महानगर परिवहन प्राधिकरण ( पुम्टा )च्या बैठकीत हडपसर ते लाेणी काळभाेर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दाेन मेट्राे मार्गिंकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. त्यानुसार हा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालास महापालिकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे.
हेही वाचा: Pune Metro News: पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग; मात्र नक्की कारण काय?
पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग; मात्र नक्की कारण काय?
स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्राे मार्गाचे आरेखन बदलण्यात आले आहे. हा मार्ग आता शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जाणार नाही असे महामेट्राेने स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील मेट्राे मार्गांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. यामध्ये इतर मेट्राे मार्गाप्रमाणेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा समावेश आहे. हा मार्ग भुयारी असुन, ताे सातारा रस्त्यावर धनकवडी येथील शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जात आहे. अशी माहीती पुढे आली हाेती. सदर मार्ग हा समाधी मठाच्या खालून जात असल्याने मठाचे विश्वस्त, प्रशासन यांनी महामेट्राेला सदर मार्ग समाधी मठाच्या खालून नेण्यात येऊ नये अशी मागणी केली हाेती. या मागणीची महामेट्राेने दखल घेतली आहे.