सचिन देशमुख यांची शिवसेनेच्या सातारा तालुकाप्रमुखपदी नियुक्ती; रणजितसिंह भोसले यांची अधिकृत घोषणा
सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने सचिन देशमुख यांची सातारा तालुकाप्रमुख पदी अधिकृत नियुक्ती केली आहे. शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी 1 ऑगस्ट 2026 रोजी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. सातारा जिल्ह्यातील अंबवडे बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या सचिन देशमुख यांनी यापूर्वी परळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवली असून, परिसरात एक अभ्यासू आणि कार्यतत्पर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
या पदग्रहण आणि नियुक्ती पत्र प्रदान सोहळ्याला शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे, सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, सातारा लोकसभा प्रमुख राजू केंजळे मेजर, शेंद्रे जिल्हा परिषद गटाचे नेते सूर्यकांत आप्पा पडवळ, नागठाणे जिल्हा परिषद गटाचे नेते नंदकुमार नलावडे आणि कारी जिल्हा परिषद गटाचे नेते दीपक कदम यांचा समावेश होता.
Satara News: कराडतून मोठा एल्गार! शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष आणखी तीव्र
कार्यक्रम प्रसंगी जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी सचिन देशमुख यांना अधिकृत नियुक्ती पत्र सोपवले, तर उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि भावी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सातारा तालुक्यात शिवसेना पक्षाची संघटन रचना अधिक मजबूत करणे आणि तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे तसेच जनकल्याणकारी योजना पोहोचवणे ही या नियुक्तीमागील मुख्य भूमिका असल्याचे भोसले यांनी सांगितले.
या नव्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करताना सचिन देशमुख यांनी सातारा तालुक्यातील ग्रामीण भाग आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी, तसेच प्रत्येक गावात शिवसेनेचे संघटन जाळे अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.






