‘कराड’साठी माजी मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर महायुतीच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
कराड राज्यातील १७० वर्षाचा इतिहास असलेली जुनी नगरपालिका आहे. या नगरपालिकेवर ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी प्रदीर्घ काळ वर्चस्व ठेवताना ४३ वर्षे नगराध्यक्षपद भूषवून अनोखा विक्रम प्रस्थापित केला. या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली. २०१६च्या निवडणुकीत भाजपाने आमदार अतुल भोसले यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणत नगरपालिकेत घट्ट पाय रोवले. ही नगरपालिका कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात येते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हा मतदारसंघ. आमदार अतुल भोसले यांनी चव्हाण यांचा पराभव करीत पहिल्यांदा या मतदारसंघात कमळ फुलविले. या यशानंतर भाजपाने नगरपालिकेकडे मोर्चा वळविला.
Eknath Shinde एकनाथ शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार? राजकीय दाव्यावर ॲक्शनमधून दिलं उत्तर
‘शतप्रतिशत’ सत्ता संपादनाचा भाजपाचा मनसूबा आहे. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांसह स्थानिक आघाड्यांच्या माजी नगरसेवकांना गळाला लावले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आमदार भोसले यानी भाजपात जोरदार इन्कमिंग घडवून आणले आहे. माजी नगराध्यक्षा शारदा जाधव व अरुण जाधव यांच्या जनशक्ती आघाडीलाही त्यांनी खेचले. शहरात बाळासाहेब पाटील यांची निर्णायक ताकद आहे. त्यांच्या लोकशाही आघाडीने माजी उपनगराध्पक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या यशवंत विकास आघाडीशी युती केली आहे. स्वत: राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
माजी नगरसेवक विनायक पावस्कर भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. भाजपा नगराध्यक्षपदासह सर्व ३१ जागा स्वबळावर लढत आहे. सर्व पातळयांवर भाजपाची यंत्रणा कमालीची सक्रिय झाली आहे. त्यामुळे ‘मिशन नगरपालिका’ यशस्वी होणार का? याची उत्कंठा आहे. भाजपाला रोखण्यासाठी लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी एकवटली आहे. दुसरीकडे माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी भाजपाने फसवणूक केल्याचा आरोप करीत लोकशाही, यशवंत विकास आघाडीशी सलगी केली आहे.
यादव व पावस्कर यांच्या लढतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यानिमित्ताने राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे फडणवीस व शिंदे आमने सामने उभे ठाकले आहेत. पावस्कर यांच्यासाठी फडणवीस, तर यादव यांच्यासाठी शिंदे यांनी कराडमध्ये येऊन पायधूळ झाडली. माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी परस्परांना आव्हान दिले. या लढाईत राष्ट्रवादी शरद पवार गटाने बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून शिंदे सेनेला हात दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे रणजित पाटील अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस नगराध्यक्षपदासह १५ जागांवर स्वबळावर लढत आहे. झाकिर पठाण काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. कराडच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा अर्चना पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यासाठी पती अशोकराव पाटील किल्ला लढवित आहेत. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरले.
भाजपाचा वारु रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र प्रत्यक्षात वेगळे समीकरण आकाराला आले. पृथ्वीराज चव्हाण पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही राहिले, मात्र बाळासाहेब पाटील या प्रस्तावाला राजी झाले नाहीत. परिणामी काँग्रेस स्वबळावर रिंगणात उतरली. काँग्रेस पहिल्यांदाच हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदे गट समोरासमोर आला आहे.
जिल्हा परिषद कर्म.पतसंस्था मतमोजणीत “कपबशी “चा बोलबाला; कर्मचारी विकास आघाडीचा दणदणीत विजय
नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा पी. डी. पाटील कुटुंब निवडणूक रिंगणाबाहेर आहे. बाळासाहेब पाटील लोकशाही आघाडीचे नेतृत्व करीत असले तरी घरातील एकही सदस्य रिंगणात नाही. या निवडणुकीतील हे एक वैशिष्ट्य आहे. नव्या पिढीला मोकळी वाट करून देण्याचा पायंडा म्हणून याकडे पाहिले जाते. पालिकेच्या सभागृहात पहिल्यांदाच पी. डी. पाटील यांच्या घरातील कोणी दिसणार नाही.
रिंगणातील प्रमुख चेहरे
राजेंद्रसिंह यादव
विनायक पावस्कर
जयवंत पाटील
अर्चना पाटील
रणजित पाटील
Ans: कराडमध्ये भाजपाविरोधात शिंदे सेना व राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रणांगणात उतरल्यामुळे ही निवडणूक राज्यातील प्रतिष्ठेची लढत ठरली आहे.
Ans: कराड नगरपालिका ही राज्यातील १७० वर्षांची जुनी नगरपालिका आहे. ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी तब्बल ४३ वर्षे नगराध्यक्षपद भूषवून गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदवला आहे.
Ans: भाजप: आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वात शतप्रतिशत सत्ता संपादनाचा प्रयत्न. शिंदे सेना – राष्ट्रवादी (शरद पवार गट) युती BJP ला रोखण्यासाठी मैदानात.
Ans:






