Photo Credit- Social Media (गंगापूर विधानसभा मतदारसंघात प्रशांत बंब विरूद्ध सतीष चव्हाण निवडणूक लढवणार)
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. सभा, बैठका, मोर्चे, दौऱ्यांनी वातावरण ढवळून निघाले आहे.महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासाठी चर्चासत्रे सुरू आहेत.
या सगळ्या महायुतीत एकाच मतदारसंघातून एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे महायुतीत जागावापावरून दावे प्रतिदावेही सुरू झाले आहेत. अशातच संभाजीनगर जिल्ह्यातमहायतीत बंडखोरीचे संकेत मिळू लागले आहेत. संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे प्रशांत बंब हे आमदार आहेत.
हेही वाचा: ‘हा तर ‘लाडक्या बहीणीं’चा राग’; देवेंद्र फडणवीसांच्या ऑफिसच्या तोडफोडप्रकरणावर विरोधकांची टीका
गेल्या काही वर्षात मतदारसंघाचा विकास झाला नाही. मतदारसंघात प्रचंड अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांचीही घुसमट होत आहे. पण जनतेलाही बदल अपेक्षित आहे. सध्या सर्वे सुरू आहे. त्यामुळे कमी-जास्त होऊ शकते. पण जनतेच्या मनात जी व्यक्ती असते, त्याचेच नाव समोर येते. सर्वेमध्ये ज्यांचं नाव येतं त्यालाच पक्षाकडून उमेदवारी मिळते, असे सतीष चव्हाण यांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे प्रशांत बंब यासंर्भात बोलताना म्हणाले, सतीष चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याची कल्पना मला आहे. मला कोणाच्यातरी विरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे ते त्यांनीही मैदानात यावे. पण माझ्य़ा आणि सतीष चव्हाण यांच्या पक्षातील वरिष्ठांना यासंदर्भात सर्व माहिती आहे. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय पक्षातील वरिष्ठ नेतेच घेतील, असेही प्रशांत बंब यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा: रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी; ‘त्या’ प्रकरणाशी आहे संबंध?