Second Day Of Agitation For Maratha Reservation On Tuesday Nrab
मंगळवेढ्यात मराठा आरक्षणासाठी आंदाेलनाचा दूसरा दिवस ; शाळा, महाविद्यालय ,बँका बंद ठेऊन आंदाेलनास दिला पाठींबा
मंगळवेढा शहराच्या दामाजी चाैकात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी मंगऴवार पासुन आंदाेलनाचा यलगार पुकारला आसुन बूधवार आंदाेलनाचा दूसरा दिवस आहे.दरम्यान शहरातील सर्व शाळा महाविद्यालय बँका तसेच शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आली असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता .
मंगळवेढा : मंगळवेढा शहराच्या दामाजी चाैकात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी मंगऴवार पासुन आंदाेलनाचा यलगार पुकारला आसुन बूधवार आंदाेलनाचा दूसरा दिवस आहे.दरम्यान शहरातील सर्व शाळा महाविद्यालय बँका तसेच शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आली असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता .
आंदाेलनाच्या दूसर्या दिवशी सकाळच्या सत्रात परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू होत्या मात्र सकल मराठा समाजाच्या बांधवांनी केलेल्या आवाहनानंतर एसटी सेवा बंद करण्यात आली
मराठा आरक्षण मागणीसाठी सरकारकडे वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनाचे मार्ग वापरून सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी लावून धरली जात आहे यामध्ये बुधवारी मंगळवेढ्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालय शाळा प्रशासनाने बंद ठेवून आपला पाठिंबा व्यक्त केला. पंचायत समिती नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी कार्यालय यांना केलेल्या आवाहनानंतर शासकीय कार्यालयाने कामकाज बंद ठेवले .पंचायत समिती आवारात नेहमी वर्दळ असते बुधवारी हा परिसर निर्मनुष्य झाला होता मंगळवेढा बस स्थानक आगारामध्ये वाहतुकीच्या एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द केल्याने सर्व बसेस आगारातील मोकळ्या पटांगणात लावण्यात आले होते सकाळी काही काळ वाहतूक सुरू होती मात्र अकरा वाजल्यानंतर वाहतूक बंद करण्यात आले अशी माहिती आगार व्यवस्थापक संजय भोसले यांनी दिली
भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र सह मंगळवेढा शहरात असणाऱ्या सर्व सहकारी पतसंस्था मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्था यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत आपल्या संस्थांचे कामकाज बंद ठेवले होते तर अण्णाभाऊ साठे उत्सव मंडळाच्या वतीने मातंग समाजाकडून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणारे पत्र देण्यात आले
श्री संत दामाजी पुतळा परिसराजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने मंडप उभारण्यात आला असून त्या ठिकाणी दिवसभर पाठिंबा देण्यासाठी विविध समाजातील लोकांची वर्दळ सुरू आहे सकल मराठा समाजाचे अनेक बांधव या मंडपामध्ये दिवसभर थांबलेले आसल्यामुऴे मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढत आसल्याचे दिसून येत आहे. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्यासह व्हाईस चेअरमन तानाजी खरात, मुरलीधर दत्तू ,औदुंबर वाडदेकर, भारत बेदरे, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, रेवणसिद्ध लिगाडे, प्राचार्य एन .बी.पवार यांनी सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलन कार्यस्थळी भेट देत साखर कारखान्याचे कामकाज बंद ठेवल्याचे पत्र दिले यावेळी शिवानंद पाटील यांनी मराठा समाजाचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असून सरकारने यावर योग्य तोडगा काढून लवकरात लवकर आरक्षण देऊन समाजाला पाठबळ द्यावे असे प्रतिपादन केले.
Web Title: Second day of agitation for maratha reservation on tuesday nrab