वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार(संग्रहित फोटो)
वाई : वाई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनाच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी आठ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते.
राज्य शासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेतून बाजार समितीच्या आवारातील शेतकरी भवनाच्या दुरुस्तीसाठी अनुदान दिले जाते. वाई बाजार समितीच्या शेतकरी भवनाची दुरावस्था झाली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. त्यानुसार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळाने शेतकरी भवन दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता.
हेदेखील वाचा : Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?
दरम्यान, समितीने अस्तित्वातील शेतकरी भवनाच्या दुरुस्तीसाठी ३२ लाख ३६ हजार ९१६रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच त्यासाठी राज्य शासनाकडून ८ लाख ९ हजार २२९ रुपये शासन अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला आहे. या निर्णयाचे वाई तालुक्यात सर्वत्र स्वागत होत असून, मंत्री मकरंद पाटील यांचे आभार मानले आहेत.
बाधितांना लवकरच मदत दिली जाणार
राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 251 तालुके पूर्णतः तर 31 तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत. तसेच आपद्ग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.