संजय शिरसाट यांच्याकडून निवृत्तीचे संकेत (फोटो- सोशल मीडिया)
शिवसेना नेते संजय शिरसाट यांचे मोठे विधान
राजकारणात कधी थांबावे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे – शिरसाट
शिरसाट यांनी 10 वर्ष नगरसेवक म्हणून देखील केले काम
मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि चार वेळा आमदार राहिलेले संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. “मी चार टर्म आमदार राहिलो, पुढे राहीन की नाही माहीत नाही,” असे त्यांनी सांगितले. राजकारणात कधी थांबावे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिरसाट यांनी पुढे म्हटले की, कोणीही अमृत पिऊन आलेला नाही. जोपर्यंत हातपाय चालतात, तोपर्यंत चांगले काम करावे. प्रत्येक वेळी आपण कायम राहू असं नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या कालच्या भाषणाचा संदर्भ देताना त्यांनी “आता बस झालं” असे म्हटले होते. दहा वर्षे नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एका प्रसंगात त्यांनी विनोदाने सांगितले की, एक आयुक्त २०४३ मध्ये मुख्य सचिव होईल, पण मी २०४३ पर्यंत थोडी राहणार आहे? इतकी वर्षे जगण्याची इच्छा नाही. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणात सतत काही ना काही सुरू असते. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणूक होण्याआधी महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने या चर्चेला उधाण फुटले आहे.
Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिनसलं? एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण
येणाऱ्या निवडणुकीत महायुती स्वतंत्रपणे लढणार की एकत्रितपणे लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान आमदारांना निधी देणे किंवा अशा अनेक कारणावरून एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे हे अचानक दिली दौऱ्यावर गेल्याचे समजते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.






