संग्रहित फोटो
पाटस : दौंड तालुक्यात शेतकरी गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात पिकवत आहेत. सध्या गहू काढणीला वेग आला असून शेतकरी गहू काढणीस मग्न आहेत. मात्र मजुराद्वारे गहू काढणं आता बंद झाले असून, मशनीद्वारे कमी वेळात जलद गतीने गहू काढण्यासाठी शेतकरी जास्त प्राधान्य देत आहेत.
दौंड तालुक्यात चार साखर कारखाने असल्याने शेतकरी ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेत असतात, ज्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ते शेतकरी उसा बरोबर फळबागाही घेत आहेत. अनेक शेतकरी या पिकांबरोबरच बाजरी, गहू, मका, कडवळ तसेच पालेभाज्या ही पिकवत असतात. पावसाचा अंदाज घेत शेतकरी आपले शेतात पिके घेतात.
सध्या तालुक्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. आणि त्यातच अनेक शेतकऱ्यांनी यंदा गव्हाचे पीके ही मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. सध्या मशीनच्या साह्याने गहू काढण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू आहे. निसर्ग कधी कोपल हे सांगता येत नाही. वरून राजा कधी हजेरी लावेल हे सांगता येत नाही. अचानक पावसाने हजेरी लावली तर काढणीस आलेला गहू पिकांचं मोठं नुकसान होईल या चिंतेत शेतकरी आहेत. त्यामुळे सध्या मशीनच्या साहाय्याने ते गहू पिकांची काढणी करीत आहेत.
मशिनमुळे मजूर वर्ग अडचणीत
गहू काढण्याच्या मशीनमुळे मजूर लावुन हाताने गहू काढणे आता बंद झाले आहे. शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल हा मशीनने गहू काढण्यासाठी जात आहे. मशीनमुळे गहू कमी वेळात होत असल्याने मजुरांना पैसे देऊन देऊन आपला वेळ खर्च करत नाहीत. परिणामी मजूरांच्या हाताला काम मिळत नाही. असे चित्र आहे. सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतात यंत्र मशीनद्वारे शेती पिके करीत आहेत. तेच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा मशीन आणि यंत्रसामग्री वापरूनच शेती करण्याकडे राहतो.