एसएसआयआय मंत्राम “मेड-इन-इंडिया” सर्जिकल रोबोट यात्रा मुंबईत दाखल
मुंबई : पुण्यातील यशस्वी प्रदर्शनांनंतर, भारतातील पहिले स्वदेशी विकसित सर्जिकल रोबोटिक सिस्टम तयार करणारी कंपनी एसएस इनोव्हेशन्स इंटरनॅशनलने महाराष्ट्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. एसएसआयआय मंत्राम ‘मेड-इन-इंडिया’ सर्जिकल रोबोट यात्रा नवी मुंबई, वाशी येथील एमजीएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, कामोठे येथे पोहोचली. प्रगत आरोग्यसेवा सर्वांना उपलब्ध करण्याच्या ध्येयाने एसएस इनोव्हेशन्सने अत्याधुनिक मंत्राम युनिट विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांसमोर आणले.
दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात मंत्राम मोबाइल सिम्युलेशन बस मध्ये आयोजित हँड्स-ऑन रोबोटिक सर्जरी कार्यशाळेने झाली. या वर्कशॉपमध्ये डॉक्टर, सर्जन आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना मंत्रा ३.० सर्जिकल रोबोटिक प्लॅटफॉर्म च्या अत्याधुनिक क्षमतांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. ही भारताच्या स्वदेशी सर्जिकल रोबोटिक्समधील मोठी उपलब्धी ठरली. या उपक्रमाने केवळ वैद्यकीय समुदायालाच जोडले नाही, तर भारताच्या रोबोटिक सर्जरीतील नेतृत्वाचा प्रत्यक्ष अनुभव दिला आणि नव्या पिढीला प्रेरणा दिली.
कार्यक्रमात लाइव्ह डेमो आणि विशेषज्ञ प्रशिक्षण सत्रे झाली, ज्यामध्ये सहभागी डॉक्टरांना रोबोटिक-असिस्टेड सर्जरीतील नेमकेपणा, सुरक्षा आणि सहजता समजून घेण्याची अनोखी संधी मिळाली. कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन (सत्रात रोबोटिक सर्जरीतील प्रगतीवर प्रस्तुती आणि डॉ. जागेश्वर पांडे (सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट व जनरल सर्जन) यांचे केस प्रेझेंटेशन झाले. यात मंत्रा ३.० सिस्टिमच्या प्रत्यक्ष वापराचे दर्शन घडले व क्लिनिकल परिणामांतील सुधारणा अधोरेखित झाली.
या प्रसंगी एसएस इनोव्हेशन्स इंटरनॅशनलचे सीईओ (इंडिया) चंदर शेखर सिबल म्हणाले, “हा ऐतिहासिक क्षण उद्देश प्रेरित नवोपक्रमाची ताकद दर्शवतो. यामुळे प्रगत सर्जिकल केअर सर्वांसाठी लोकशाही मार्गाने उपलब्ध करण्याच्या दिशेने आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे, विशेषतः ज्या भागात तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे तिथे. एसएसआयआय मंत्राम ‘मेड-इन-इंडिया’ सर्जिकल रोबोट यात्रा ही केवळ डेमो नाही तर भारतभर अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणारी चळवळ आहे. आम्ही संपूर्ण आरोग्य व्यवस्थेत हाताळणीची संधी, कौशल्य विकास आणि किफायतशीर, सुलभ रोबोटिक सर्जरी आणत आहोत. या उपक्रमातून आम्ही भारताच्या गावी-गावात रोबोटिक सर्जरी पोहोचवत आहोत.”
एसएसआयआय मंत्राम ‘मेड-इन-इंडिया’ सर्जिकल रोबोट यात्रा महाराष्ट्रभर ५००+ किलोमीटर प्रवास करणार असून १००० पेक्षा अधिक वैद्यकीय व्यावसायिकांना जोडणार व प्रमुख रुग्णालये व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षण देणार आहे.