Photo Credit- Social Media सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, प्राजक्ता माळी भडकली
मुंबई : बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंचे नाव घेत थेट अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या सगळ्या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्या एका निराधार वक्तव्यामुळे आपल्याला खूप मनस्ताप सहन करावा लागल्याने त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी ठाम भूमिका प्राजक्ता माळीने घेतली आहे.
प्राजक्ता माळीने काल मुंबईत पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्या दाव्यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर तिने करुणा शर्मा यांना देखील नोटीस पाठवली, असल्याचे सांगितलं आहे. प्राजक्ता माळी म्हणाली, ” महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही.कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांत जाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहे. मी परळीच नाही तर महाराष्ट्रभरात काम केलं आहे. यापुढेही करत राहील.
प्राजक्ता माळीच्या बचावासाठी मनसे पक्ष धावला; नेत्याच्या पोस्टने लगावली सुरेश धस यांना चपराक
यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांसोबत माझे फोटो आहेत पण त्याचा अर्थ तुम्ही माझे नाव कुणासोबतही जोडणार का? एक महिला कलाकार म्हणून मला हे अतिशय निंदनीय वाटतं. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. तुम्ही महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात तर महिलांच्या कर्तृत्त्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. राजकाण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्त्वावर यशस्वा होऊ शकत नाही का, असा सवालही प्राजक्ताने यावेळी उपस्थित केला. तसेच, अशा पद्धतीची वक्तव्ये करून तुम्ही स्वत:चीच मानसिकता दाखवली, अशी टीकाही तिने यावेळी केली.
प्रत्येकवेळी चित्रपट सृष्टीतील महिलांना फार सॉफ्ट टार्गेट केलं जातं. कुणीही यावं आणि नावं घेऊन जावं. तुम्ही तुमच्या राजकारणासाठी चित्रपट क्षेत्रातल्या महिलांच्या नावांचा गैरवापर करणं बंद करावं, त्यांची बदनामी करणं थांबवाव, अशी माझी विनंती आहे. प्रसारमाध्यमांसमोर कसं आणि काय बोलावं याचंही त्यांना भान राहिल नाही. माझी त्यांना इतकीच विनंती आहे, की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं जाहीरपणे माझी मागावी. आणि फक्त माझीच नाही, ज्या महिलांचा त्यांनी विनाकारण चुकीचा उल्लेख केला, त्यांचीही त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. राजकारण्यांच्या राजकारणासाठी चित्रपट सृष्टीतील महिलांच्या नावाचा गैरवापर बंद करावा. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आयोगाकडे विनंती केली आहे की तुम्ही यावर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. मीही कायदेशीर कारवाई करत राहीन”, असं प्राजक्ता माळी स्पष्ट केलं आहे.
दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात; लँडिंग करताना विमान धावपट्टीवर घसरले, 28 जणांचा मृत्यू