File Photo : Sambhaji Raje
कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी ‘स्वराज्य’ (Swarajya) या नव्या संघटनेचा अधिकृत कार्यक्रमाची घोषणा जाहीर केला आहे. ९ ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांतीदिनी (August Kranti Din) सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तुळजापूर (Tuljapur) येथील तुळजा भवानी मंदीर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
राज्यसभा निवडणुका (Rajyasabha Election) पार पडण्याच्या काही दिवस आधी संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य या संघटनेची स्थापना केली होती. राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेने (Shivsena) त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीराजेंचा फोन उचलला नाही, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर शिवसेनेच्या संजय पवार यांना राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला.
‘#स्वराज्य‘चा पहिला अधिकृत कार्यक्रम महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने…
क्रांतीदिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात…
भेटूया ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता
तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर येथे… pic.twitter.com/IY1jWVSPU2— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 8, 2022
राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांच्या मावळ्यांना एकत्रित करण्यासाठी ही संघटना काम करेल असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता ऑगस्ट क्रांतीदिनाच्या निमित्ताने या संघटनेचा पहिला अधिकृत कार्यक्रम होणार आहे.