मोर्शी : सालबर्डी (Salbardi) येथील माळू नदीच्या (Malu River) पुरात महादेवाच्या दर्शनासाठी (Darshan of Mahadev) आलेल्या भाविक भक्तांच्या चारचाकी वाहनासह दोन दुचाकी वाहून गेल्याची ( two wheelers and four wheeler swept away) घटना ८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
रविवार ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजतापासून तर सोमवारी सुद्धा मोर्शी शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) उगम असलेल्या माळू नदीला सोमवारी दुपारी अचानक आलेल्या महापुरामुळे चारचाकी सुमो गाडी तसेच दोन मोटरसायकली सालबर्डी येथील गंगामेळ संगमापासून (Gangamel confluence) वाहून गेल्या आहे.
श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्याने देशभरातील अनेक भाविक भक्तगण सालबर्डी येथील शिवगुफेत असलेल्या शिवलिंगावर बेलपत्री वाहण्यासाठी येत असतात. सालबर्डी हे एक पर्यटन स्थळ (Tourist spot) असून पहाडावरील असलेली हिरवी घनदाट झाडे, खळखळाट वाहणारी नदी, महादेवाच्या भुयारासह विविध असलेली धार्मिक स्थळे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते. त्यामुळे अनेक पर्यटक व भक्तगण या ठिकाणी वाहनाने येतात. भाविक आपली दुचाकी व चार चाकी वाहने माळू नदीवर असलेल्या पुलाच्या बाजूला उभे करून दर्शनाला व मौजमस्ती करण्यास जातात.
त्यामुळे त्यांना सुद्धा अशी घटना होईल. याची माहिती नव्हती.या घटनेत सुदैवाने मात्र गाडी पुरात वाहून गेली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेवटी ही फोर व्हीलर गाडी (Four wheeler vehicle) सालबर्डी गावात जाणाऱ्या पुलाजवळ अतिशय तुटलेल्या अवस्थेत आढळून आली असून गाडीचा नंबर एम एच व्ही २८/ ३१४५ असल्याचे निष्पन्न झाले.