महाराष्ट्रातील 60 हजार कारागिरांना प्रशिक्षण देण्यात यश - नरेंद्र मोदी
केंद्र सरकारनं सुरू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेला १८ सप्टेंबर रोजी वर्ष पूर्ण झालं. या निमित्त वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (20 सप्टेंबर) वर्धा येथून पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांबरोबरच अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन व उद्घाटना पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अमरावतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेत कर्ज मंजुरी झालेल्या कारागिरांना धनादेशाचे वाटप केले. विविध राज्यातून काही प्रतिनिधींना धनादेश स्वत: मोदी यांनी दिले. एकूण ७५ हजार कारागिरांना हे कर्ज मंजूर करण्यात आहे. विदर्भातील वर्धा येथून पंतप्रधान अनेक योजनांचा शुभारंभ करण्यात आले. महाराष्ट्र निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही पंतप्रधानांचा हा विदर्भ दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या निवडणुकीत भाजप आघाडीने आघाडी घेतली होती, मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला होता.
तसेच विदर्भातील वर्धा हे उच्च प्रतीच्या कापूस उत्पादनाचे केंद्र आहे. पण इतके वर्ष काँग्रेसने आणि नंतर महाविकास आघाडी सरकारने कापूस उत्पादकांची ताकद वाढवण्याऐवजी त्यांना डबघाईला आणले. हे लोक शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण करत राहिले, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यासाठी आम्ही महाराष्ट्राची निवड केली आहे. विश्वकर्मा योजना ही हजारो वर्षांपूर्वीचे पारंपारिक कौशल्य भारतासाठीच उपयोगात आणण्याचा रोडमॅप आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
तसेच महात्मा गांधींची कर्मभूमी वर्धा विकसित भारत संकल्पनेला नवी ऊर्जा देण्याचं काम करणार, पंतप्रधान मोदींचे वर्ध्यात प्रतिपादन
वर्ध्याच्या पवित्र भूमीवरुन पीएम विश्वकर्मा योजनेचा उत्सव साजरा केला जात आहे. महात्मा गांधींची कर्मभूमी विकसित भारत संकल्पनेला नवी ऊर्जा देण्याचं काम करणार , असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी राज्यातील राजकीय तापमान वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या पक्षांमध्ये जागावाटपावरून वाद सुरू असतानाच, लोकसभा निवडणुकीचे आकडेमोड करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठीही चढाओढ सुरू आहे. एकंदरित या लढाईचा विदर्भ हा आखाडा बनला आहे. महाविकास आघाडी (एमव्हीए) विदर्भातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना, महायुतीनेही आता या भागात लक्ष्य केंद्रीत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिनाभरात तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आले आहे. वर्धा आणि अमरावती येथे आयोजित कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थित राहिले असून यावेळ राहणार आहेत. पंतप्रधान वर्धा येथून आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनाचे सुरुवात केली.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांनाही महाराष्ट्राच्या राजकारणात मजबूत स्थान आहे. सरकार कोणी बनवलं तरी त्याचा मुख्य केंद्र या दोन पक्षांपैकी एक असेल. महाराष्ट्राच्या राजकीय प्रवृत्तीमध्ये हेही वास्तव आहे की या दोन्ही पक्षांची पान महाराष्ट्रावर समान पकड नाही आणि ते एका विशिष्ट पट्ट्यापुरते मर्यादित आहेत. मुंबई-ठाणे भागात शिवसेना मजबूत आहे, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येणार, याचा निर्णय विदर्भातील मतदार घेतात. या भागात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली आहे.