मुंबई : मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. शिंदे सरकारला १६४ मते मिळाली, तर विरोधात ९९ मते पडली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अभिनंदनाचे तसेच शुभेच्छाचा वर्षाव होत असताना, आता मनसेनं शिवसेनेवर पुन्हा एकदा टिका केली आहे.
[read_also content=”रणवीर सिंगचे हे अस्ताव्यस्त कपडे पाहून लोक होतायेत अवाक! पहा फोटो https://www.navarashtra.com/photos/people-are-amazed-to-see-ranveer-singhs-awkward-clothes-see-photo-301158.html”]
शिवसेनेतील नाराज ४० आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील होत भाजपाबरोबर नवीन सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, आमदारांनी साथ सोडल्यानंतर आता खासदारसुद्धा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. खासदार राहुल शेवाळेंच्या पत्रावरुन मनसेनं पुन्हा शिवसेनेला डिवचलं आहे. शिंदे गटात खासदार गेल्यावर विश्वप्रवक्ते (संजय राऊत) (Sanjay Raut) कोणत्या शब्दांचा वापर करणार? असा सवाल मनसेचे नेते गजानन काळे (MNS Leader Gajanan Kale) यांनी केला आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यावर त्यांना रेडे, प्रेतं अशा शब्दांत टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता खासदार जाणार असल्यामुळं पिता पुत्र व विश्वप्रवक्ते कोणत्या शब्दाचा प्रयोग करणार असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.
आता यांचे खासदार पण म्हणतायेत आपण भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान करायला हवं.
आधी रेडे,प्रेतं,घाण आणि आता सगळे खासदार सोडून गेल्यावर पिता-पुत्र आणि विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा?
या विचारात असल्याची सूत्रांची माहिती— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 6, 2022
मनसे नेते गजानन काळे यांनी आपल्या टिव्टमध्ये म्हटलंय की, “आता यांचे खासदार पण म्हणतायेत आपण भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान करायला हवं. आधी रेडे, प्रेतं, घाण आणि आता सगळे खासदार सोडून गेल्यावर पिता-पुत्र आणि विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा? या विचारात असल्याची सूत्रांची माहिती” असं टिव्ट करत शिवसेनेवर घणाघाती टिका केली आहे, तसेच शिवसेना पिता पुत्र म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.