मुंबई : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
दरम्यान ‘कृषी संकटा’वर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होणार आहे. पिकांच्या नुकसानीनंतर उपाययोजना आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.
राज्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.
कोकणालाही फटका
तळकोकणात सलग दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कोकम, जाभूळ पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने जाभूळ गळून मातीमोल झाली आहेत. तर अवकाळी पाऊस पडल्याने जाभूळ मध्ये जंतू तयार होणार त्यामुळे ते फेकून द्यावं लागणार आहे. आंब्यातही पावसामुळे जंतू तयार होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच जील्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यातील आंबा बागायतदार चिंतातुर झाले आहेत.