मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन आता चार महिने होत आहेत, परंतू शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण जोरात सुरु आहे. दरम्यान, आता भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारवर व शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टिका केली आहे. महिना १०० कोटी खंडणी वसुली करणाऱ्या, उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवणे, प्रत्येक प्रकल्पामागे १० टक्के कमिशन घेणे हे महाविकास आघाडीने केलं. पण महाराष्ट्रातील व्यापार उदीम सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा, अशी टीका भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam gore) यांच्यावर केली आहे.
[read_also content=”शिवतीर्थावरच्या “टोमणे मेळाव्यासाठी” मांडवली झाली म्हणे…मनसेची शिवसेनेवर बोचरी टिका https://www.navarashtra.com/maharashtra/mns-criticism-on-shivsena-about-dasara-melava-332370.html”]
दरम्यान, अडीच वर्षांचा हा काळाकुट्ट कालखंड संपून राज्यात शिवसेना भाजपचे भ्रष्टाचारमुक्त सरकार आले आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं आहे. आता उद्योजक भयमुक्त महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे नीलम गोऱ्हे तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा. महाराष्ट्रातील व्यापार उदीम सुरक्षित हातात आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या. आज ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार व शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली.