2.50 लाख शिक्षकांच्या वेतन देयकाचे होणार वांदे, स्वाक्षरी करण्यास नकार; नक्की काय आहे प्रकरण
बनावट शालार्थ आयडी प्रकरणात सुरू असलेल्या अटकसत्राने आता राज्यातील शेकडो अधिकाऱ्यांमध्ये असंतोष उफाळला आहे. हे अटकसत्र न थांबविल्यास यापुढे राज्यातील अडीचलाखांवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकावर स्वाक्षरीच करणार नाही, असा गर्भित इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. शासनालाशिक्षक भरतीवर बंदी असतानाही राज्यात अनेक ठिकाणी बॅक डेटेड नियुक्त्या झाल्या, तर नागपूर विभागात शेकडो शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून कोट्यवधींचे पगार अदा करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.त्यानंतर आता संस्थाचालक, शिक्षकांचेही अटकसत्र सुरू झाले आहे.या अटकसत्राच्या विरोधात आता अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व अधिकारी एकवटले आहेत.
CLAT 2026 साठी नोंदणी सुरू! सर्वोत्तम लॉ कॉलेजमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी
शुक्रवारी (दि. 1) दोनशेपेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी पुण्यात धाव घेत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेतली. शालार्थ प्रणालीची परिपूर्ण माहिती न घेता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना अटक केली जात आहे. शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय अधिकाऱ्यांना अटक करू नये, अशी मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली.
तिन्ही शिक्षण संचालकांनी कसली कंबर : शालार्थ आयडी प्रकरणात अधिकाऱ्यांच्या अटकसत्राला रोख
लावण्यासाठी राज्यातील दोनशेपेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. तसेच आयुक्त कार्यालयापुढे घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व तिन्ही शिक्षण संचालकांनी केले. प्राथमिकचे शरद गोसावी, माध्यमिकचे डॉ. महेश पालकर आणि योजना शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या आयुक्तांकडे सादर केल्या.
शासनाकडून मागितले लेखी हमीपत्र
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या मनात कोणत्याही वेळी अटक होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या अटकसत्रापासून संरक्षण देण्यासाठी शासनाने लेखी हमीपत्र द्यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने केली आहे. हे लेखी हमीपत्र न मिळाल्यास यापुढे शिक्षकांच्या वेतन देयकावर स्वाक्षरीच करणार नाही, असा आक्रमक पवित्रा या अधिकाऱ्यांनी घेतला. तसेच 8 ऑगस्टपासून सामूहिक रजा आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात अडीचलाखांपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वांद्यात येण्याची शक्यता आहे.
भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती 2025 : अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्टपर्यंत वाढवली
शालार्थ आयडी प्रकरणात अधिकाऱ्यांना विनाचौकशी तसेच विभागाच्या पूर्वपरवानगीविनाच अटक केली जात आहे. यातून शिक्षण खात्याची बदनामी केली जात आहे. याचा आम्ही निषेध करतो. तसेच कायद्यानुसार आम्हाला अटकेपासून संरक्षण मिळावे. अन्यथा यापुढे वेतन देयकांवर स्वाक्षरी किंवा प्रतिस्वाक्षरी न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
– शेषराव बडे, अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटना.