Pushkar Jog Anger Over Hardik Shubhechha Show Being Cancelled Due To Salman Khan Film
अनेकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली जाते. ही खंत फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अगदी सेलिब्रिटीही व्यक्त करताना दिसतात, शिवाय काहीवेळा राजकीय नेतेही ती खंत व्यक्त करताना दिसतात. आता अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना स्क्रिन उपलब्ध नाहीये. नुकताच देशासह परदेशात सलमान खानचा ‘सिकंदर’ सिनेमा रिलीज झाला आहे. या चित्रपटामुळे काही चित्रपटांचे शोच रद्द करण्यात आले. यामध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा ‘हार्दिक शुभेच्छा’ चित्रपटाचाही समावेश आहे. ‘सिकंदर’ चित्रपटामुळे ‘हार्दिक शुभेच्छा’चे शो काढल्याने अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे.
“ती कोणाचंही करिअर उद्ध्वस्त करू शकते”; प्रसिद्ध अभिनेत्रीचं एकता कपूर विरोधात मोठं विधान…
महाराष्ट्रामध्ये अनेकदा मराठी चित्रपटांना स्क्रिन्स उपलब्ध होत नाहीत. ही पहिल्यांदाच वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये स्क्रिन्स उपलब्ध झालेल्या नाहीत. त्याच अनुषंगाने पुष्कर श्रोत्री इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तो म्हणतो की, ” ‘सिकंदर’सारखा सुपरहिट चित्रपट आला की, आमची दुसऱ्या आठवड्यात चाललेली फिल्म काढायची. छान… खरं तर मी गुंड असतो, तर बरं झालं असतं. निदान राग काढता आला असता. यासाठी कोणी कधीच काहीच करीत नाही, याचा अभिमान वाटतो.” अभिनेत्याने #JogBolnar या हॅशटॅगचाही वापर केला असून, चित्रपटातील इतर कलाकारांनाही त्याने टॅग केले आहे.
मराठमोळी, थोडीसी साधी भोळी… रिधिमाचा Swag असा भारी, पाहता घायाळ पोरं सारी
पुष्कर जोग जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. अनेकदा त्याची चर्चा होताना दिसते. विविध विषयांवर तो चित्रपट बनवीत असतो. दरम्यान, पुष्कर जोगच्या चित्रपटांचं कौतुक मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी भरभरून कौतुक केलं होतं. ‘हार्दिक शुभेच्छा’ चित्रपटात पुष्कर जोग आणि हेमल इंगळे यांच्यासोबत पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्वीक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शिवाय, चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पुष्कर जोगने केले आहे.
महाकुंभातील मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय ?
सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘सिकंदर’ चित्रपट देशासह परदेशात ३० मार्चला रिलीज झाला आहे. ईदच्या आदल्या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला असून चित्रपटाला ईदच्या दिवशी म्हणजे ३१ मार्चला कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ए.आर. मुरुगोदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटींची कमाई केली आहे. येणाऱ्या काळात हा चित्रपट किती कमाई करतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.